शबरी आदिवासी घरकुल योजना – लाभार्थी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे असे या शबरी आदिवासी घरकुल (Shabari Adivasi Gharkul Yojana) योजनेचे स्वरूप आहे.
शबरी आदिवासी घरकुल योजना – Shabari Adivasi Gharkul Yojana
लाभार्थी पात्रता:
1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील.
4. लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे.
5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :-
अ) ग्रामीण क्षेत्र – रु. 1.00 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र – रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र – रु. 2.00 लाख.
घराची किंमत मर्यादा:
घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे.
अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख
ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख
क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख
आवश्यक कागदपत्रे:
1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो.
4. 7/12 उतारा व नमुना 8-अ.
5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला.
6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र.
7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला.
8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे.
9. ग्रामसभेचा ठराव.
अर्जाचा नमुना:
शबरी आदिवासी घरकुल योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
संपर्क अधिकारी:
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
हेही वाचा – घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!