महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसार्वजनिक आरोग्य विभाग

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी 10 लाख, अपंगत्वासाठी 5 लाख !

आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी साठी नियमित गृहमेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उपजिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रु.१०.०० लक्ष व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लक्ष इतके सानुग्रह अनुदान (Asha Gatpravartk Sanugrah Anudan) देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू ! Asha Gatpravartk Sanugrah Anudan:

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लक्ष व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह ((Asha Gatpravartk Sanugrah Anudan)) अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

१ ) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु. १.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजुर करण्यात आला आहे.

२ ) प्रस्तावित वाढ ०१ एप्रिल, २०२४ पासुन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

३ ) यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय – Asha Gatpravartk Sanugrah Anudan GR:

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह ((Asha Gatpravartk Sanugrah Anudan) अनुदान लागू करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे!
  2. अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती!

हेही वाचा – आशा स्वयंसेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, प्रशिक्षण, मानधन आणि जबाबदाऱ्या/कामे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.