महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना eKYC प्रलंबित लाभार्थी यादी जाहीर !
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता, त्यानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण (MJPSKY Protsahanpar Anudan KYC) झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांची eKYC प्रलंबित लाभार्थी (MJPSKY eKYC Pending List) यादी जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.
शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना eKYC प्रलंबित लाभार्थी यादी जाहीर ! MJPSKY eKYC Pending List:
आपण इथे फक्त रत्नागिरी जिल्ह्याची eKYC प्रलंबित लाभार्थी यादी उपलब्ध करून देणार आहोत, बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटर/आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत भेट देऊन यादी मध्ये नाव आहे का ते तपासा आणि आधार प्रमाणीकरण करून घ्या.
आपले प्रमाणीकरण सहज व सोपे होण्यासाठी वरील प्रसिध्द केलेल्या यादीमधील शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र/बँक शाखा मध्ये जावून प्रमाणीकरण करुन घ्यावे.
- आधार कार्ड.
- कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक.
- यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद असलेला विशिष्ट क्रमांक ( स्वत: लिहून न्यावा).
आधार प्रमाणीकरण करण्याची शेवटची तारीख: १८ सप्टेंबर २०२४.
पुढील लेख देखील वाचा!
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : 50 हजार प्रोत्साहनपर लाभासाठी कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करा!
- आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस पहा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!