कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ऑनलाईन चेक कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे.
कापूस -सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस – Kapus Soybean Farmers Beneficiary Status:
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर पीक निहाय व गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी (Prefilled data) देण्यात आलेली आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा.
सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर “Disbursement Status” वर क्लिक करा.
पुढे Disbursement Status पेज मध्ये आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP क्लिक करा
त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) स्टेट्स विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल.
हेल्पलाइन क्रमांक: तांत्रिक सहाय्यासाठी, हेल्पलाइन क्रमांक ०२२- ६१३१ ६४०१ कार्यालयीन कामकाजाची वेळ: सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६:१५ वा.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:
राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाच्या दि. ११ जुलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
- सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला रु.4194.68 कोटी निधी पैकी रु.2516.80 कोटी निधी सन २०२४-२५ मध्ये वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- कापूस-सोयाबीन अनुदानासाठी अशी करा ई-केवायसी !
- शेतकऱ्यांना कापूस-सोयाबीन अनुदान वितरण सुरू !
- कापूस-सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट शिथिल!
- कापूस-सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !
- कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये मिळणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!