राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र होणार सुरु!
केंद्र शासनाच्या CSC २.० योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र (Aapale Sarkar Seva Kendra) स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून, सदर आपले सरकार सेवा केंद्राचे स्थापन, सनियंत्रण व प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविले आहे.
तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन क्र.२ येथील पत्रान्वये अहमदनगर जिल्ह्यातील १० तालुक्यामधील १५ महाविद्यालयांत प्रायोगिक तत्वावर आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र होणार सुरु! Aapale Sarkar Seva Kendra:
शासनाचा सदर निर्णय हा राज्यामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला असून, अशा प्रकारे महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र (Aapale Sarkar Seva Kendra) सुरु करण्याबाबत राज्यातील इतर ठिकाणांवरुनही मागणी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यास्तव, सदर निर्णय राज्यभर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील ज्या ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र (Aapale Sarkar Seva Kendra) सुरु करण्याबाबतची मागणी करण्यात येईल, त्या त्या महाविद्यालयांना दि.१९.०१.२०१८ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीस अनुसरुन आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्रास मंजूरी देतांना संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सदरील कार्यवाही करतांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या. (महाआयटी), मुंबई यांचेशी तांत्रिक सहाय्याकरीता समन्वय साधावा.
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय – Aapale Sarkar Seva Kendra GR:
राज्यातील महाविद्यालयांत आपले सरकार सेवा केंद्र (Aapale Sarkar Seva Kendra) सुरु करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!