Cold Room (Staging) MahaDBT Yojana : शीतखोली (स्टेजीँग) अनुदान योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. याअंतर्गतच फलोत्पादन पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी Cold Room (Staging) प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे.
शीतखोली (स्टेजीँग) महाडीबीटी अनुदान योजना – Cold Room (Staging) MahaDBT Yojana
फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी Cold Room (Staging) प्रकल्पांच्या उभारणीसाठी शासनाकडुन अर्थसहाय्य देण्यात येते. उत्पादित फलोत्पादन, औषधी, सुगंधी मालाची साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजार मुल्य शेतकऱ्यांना कमी मिळते या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी इ. प्रकल्पांना प्रेात्साहन व अर्थसहाय्य दिले जाते.
पात्र लाभार्थी:
शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, शासन मान्य संस्था, सहकारी संस्था यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. वैयक्तिक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.
भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबाबत चे पुरावे सादर करावे लागतील.
काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमान निहाय देय अनुदान:
१. पॅक हाऊस (Pack House) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 4.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मी. X 6 मी.असे राहील. देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 % (रु. 2.00 लाख) असे असेल.
२.एकात्मिक पॅक हाऊस कन्व्हेअर बेल्ट,संकलन व प्रतवारी केंद्र, वॉशिंग व ड्राईंग यार्ड आणि भारत्तोलन, इ. सुविधांसह (Integrated pack house with facilities for conveyer belt, sorting, grading units, washing) या साठी अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 50.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मी. x 18 मी.,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 17.50 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 25.00 लाख) असे असेल.
३.पुर्व शितकरण गृह (Pre-cooling Unit)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 25.00 लाख / प्रति युनिट,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण, 35 टक्के (रू. 08.75 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 12.50 लाख) असे असेल.
४. शितखाली (स्टेजिंग)Cold Room (Staging)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रु. 15.00 लाख प्रति युनिट,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 05.25 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 07.50 लाख) असे असेल.
५. नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळी आधुनिकीकरण (Technology induction and Modernization of cold-chain) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 250.00 लाख,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 87.50 लाख)डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 125.00 लाख) असे असेल.
६. शितवाहन (Refrigerated Transport Vehicles)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू.26.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता 9 मे. टन ,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के (रू. 09.10 लाख),डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के (रू. 13.00 लाख) असे असेल.
७. रायपनिंग चेंबर (Ripening Chamber)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 1.00 लाख प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता 300 मे. टन,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण, 35 टक्के, डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के असे आहे.
८. शितगृह (नविन) (Cold Storage Unit- New Construction)
अ) नविन शितगृह युनिट प्रकार- 1 (एक सारख्या तापमानात राहण्याऱ्या उत्पादनासाठी) (प्रति चेंबर 250 टन),अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 8000 प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण, 35 टक्के जास्तीत जास्त रु. 140.00 लाख, डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र 50 टक्के जास्तीत जास्त रु. 200.00 लाख असे आहे.
ब) शितगृह युनिट प्रकार- 2 (एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी) कमीत कमी 6 चेंबर्स पेक्षा जास्त (प्रति चेंबर 250 टन) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 10,000 प्रति मे.टन, बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी ,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण,35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र,50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख असे आहे.
क) शितगृह युनिट प्रकार-२ (नियंत्रण वातावरणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे) अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू. 10,000 प्रति मे.टन,बांधकाम क्षेत्र / क्षमता रू. 5000 मे.टन प्रति लाभार्थी,देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण 35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख,डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र,50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख असे आहे.
९. एकात्मिक शीतसाखळी कार्यपध्दती (Integrated Cold Chain supply System)अधिकतम ग्राह्य प्रकल्प रक्कम रू.600.00 लाख,बांधकाम क्षेत्र / क्षमता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी घटक क्र. 1 ते 8 मधील किमान 2 घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे.देय अनुदान (ग्राह्य भांडवली खर्चाच्या) सर्वसाधारण 35 टक्के (रू. 210.00 लाख)डोंगराळ व अधिसुचित क्षेत्र, 50 टक्के (रू. 300.00 लाख) आहे.
शीतखोली (स्टेजीँग) अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! Cold Room (Staging) MahaDBT Yojana :
शीतखोली (स्टेजीँग) – Cold Room (Staging) अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.
शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.
ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.
अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा. कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये फलोत्पादन या मुख्य घटकाखाली प्रकल्प आधारित घटक/ इतर घटक मध्ये पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली , शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी Cold Room (Staging) अनुदानासाठी व्यवस्थित आवश्यक तपशील अर्जा मध्ये भरा आणि त्यानंतर जतन करा बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
अप्लिकेशन सबमिट केल्यावर ते सबमिशनच्या पुष्टीकरणासाठी पॉप अप संदेश दर्शवितो. “ओके” बटणावर क्लिक केल्यावर ते पेमेंट वर पुनर्निर्देशित होईल जिथे अर्जदार पैसे भरण्यास सक्षम असेल.
मेक पेमेंट बटणावर क्लिक केल्यास ते पेमेंट गेटवे पोर्टलकडे पुनर्निर्देशित होईल. पेमेंट केल्यानंतर अर्जदार पेमेंट पावतीची प्रिंट आउट घेऊ शकतो.
शीतखोली (स्टेजीँग) अर्जाचे स्टेटस पहा (Cold Room (Staging) MahaDBT Yojana Application Status):
महा डीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्या.
तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.
छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही शीतखोली (स्टेजीँग) साठी (Cold Room (Staging)) अर्ज सादर करू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप: महाडीबीटी शेतकरी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका: शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
पुढील लेख देखील वाचा!
- सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप” वर – MahaDBT Farmer App
- शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
- महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
- महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!