बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
सरकारी लाभ आणि सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी, लाभार्थ्यांला त्याचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. बँक खाते उघडण्याच्या वेळी तुम्ही तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक केले नसल्यास, तुम्ही खालील प्रोसेस नुसार बँक खाते आधार (Bank Account Aadhar Link) लिंक करू शकता.
बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
बँक खात्यासह आधार सीडिंग एकतर बँकेच्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे केले जाऊ शकते. तथापि, सुविधेचा लाभ घेण्यासाठी, वापरकर्त्याने सेवेसाठी बँकेकडे नोंदणी केली पाहिजे. बँक खात्याशी आधार कार्ड कसे लिंक केलेले आहे का ते ऑनलाईन कसे चेक करायचे? व बँक खाते आधार नंबरला लिंक करण्याची प्रोसेस काय आहे ? याची सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये पाहूया.
बँक खाते आधार लिंक केलेले आहे का ते ऑनलाईन तपासा ! Bank Account Aadhar Link Status:
बँक खाते आधार नंबरला लिंक करण्यापूर्वी आपण आपले बँक खाते आधार लिंक केलेले आहे का ते ऑनलाईन तपासूया, त्यासाठी खालील UIDAI च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
https://resident.uidai.gov.in/bank-mapper
वरील UIDAI ची अधिकृत पोर्टल ओपन केल्यानंतर Login वर क्लिक करा.
Login वर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ अंकी आधार नंबर, कॅप्चा कोड टाका व Send OTP या ऑप्शन वर क्लिक करा नंतर रजिस्टर मोबाइल नंबर वर जो OTP नंबर येईल तो टाकून Login ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
लॉगिन केल्यानंतर Bank Seeding Status या वरती क्लिक करायचे आहे.
आता येथे आपण पाहू शकतो “Congratulations! Your Aadhaar-Bank Mapping has been done.” असा मॅसेज दिसत आहे, व Bank Seeding Status मध्ये Active दिसत आहे म्हणजेच बँक खाते आधार नंबरला लिंक केलेले आहे.
जर तुमचे Bank Seeding Status Active दिसत नसेल तर तुम्हाला बँक खाते आधार नंबरला लिंक करणे गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही खालील ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रमाणे प्रोसेस करू शकता.
बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन लिंक करण्याची प्रोसेस – Bank Account Aadhar Link Online Process:
विविध सरकारी योजनांद्वारे प्रदान केलेले थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्राप्त करण्यासाठी आधार सीडिंग आवश्यक आहे. आधार सीडिंगची प्रक्रिया प्रवाह खालीलप्रमाणे आहे.
आपले बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन लिंक करण्यासाठी खालील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
https://www.npci.org.in
पोर्टल ओपन केल्यानंतर Consumer टॅबवर क्लिक करा व Bharat Aadhaar Seeding Enabler पर्यायावर क्लिक करून Request for Aadhaar Seeding फॉर्म मध्ये आधार नंबर, बँकेचे नाव, सिडींग टाईप, बँक खाता नंबर, व कॅप्चा कोड टाकून Aadhaar Seeding करू शकता.
बँक खाते आधार नंबरला ऑफलाईन लिंक करण्याची प्रोसेस – Bank Account Aadhar Link Offline Process:
आपले बँक खाते आधार नंबरला ऑफलाईन लिंक करण्यासाठी ग्राहकाने ज्या बँकेच्या शाखेत खाते आहे तिथे भेट द्यावी आणि रीतसर भरलेला संमती फॉर्म सबमिट करावा.
बँकेचे अधिकारी फॉर्म तपशील, दस्तऐवज आणि स्वाक्षरीवर आधारित ग्राहकाची सत्यता पडताळल्यानंतर आधार सीडिंग संमती फॉर्म स्वीकारतील आणि ग्राहकाला पोचपावती देतील.
बँकेचे अधिकारी नंतर आधार क्रमांक ग्राहकाच्या खात्याशी आणि NPCI मॅपरमध्ये देखील लिंक करतील.
खालील लेख देखील वाचा!
- या तारखेपर्यंत तुमचे आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करा !
- आपल्या बंद झालेल्या बँक खात्यातूनही पैसे काढू शकता; पाहा त्यासाठीचे नियम आणि प्रक्रिया !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Bank of india ke liye to option nahi hai isme
offline kara
एक नंबर माहिती देतात सर आपले ग्रुप.. इ loved
धन्यवाद!
Maharashtra Garamin bank ka options nahi SBI ka bhi nahi
ऑफलाईन करा
laxmi wankhede
बोला