सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी हेल्पलाईन, वेब पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन !
माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी अशा गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविणे आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल सायबर क्राईम (Cyber Crime) हेल्पलाइन १९३० या नंबरचा वापर करावा, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदणी करावी.
तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘सायबर दोस्त’ (Cyberdost) या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.
सध्या देशामध्ये मोबाईल फोन तसेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे.
त्या अनुषंगाने सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता ही बचावाची प्रथम पायरी असल्याने, केंद्र शासनाच्या गृह विभागांतर्गत असलेल्या भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राने (इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर – I4C) सायबर गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
कोणत्याही आर्थिक सायबर गुन्ह्याच्या तक्रारीची नोंद करण्यासाठी तत्काळ खालील नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर वर कॉल करावा अथवा खालील नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदणी करावी.
नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर (National Cyber Crime Helpline Number): १९३०
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal) : www.cybercrime.gov.in
सायबर क्राइमबाबत ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सायबर दोस्त (Cyberdost) या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करण्याचे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.
https://www.facebook.com/CyberDostI4C
https://www.instagram.com/cyberdosti4c
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!