महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुदान योजना
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुदान योजना (MPBCDC Yojana), बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध अनुदान (MPBCDC Yojan) योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 20,000 ते जास्तीत जास्त रु. 50,000/- पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये बँकेचे कर्ज 50% व महामंडळाचे अनुदान 50% (किमान मर्यादा रु. 10,000/- पर्यंत)
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध अनुदान योजना – MPBCDC Yojana:
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय (PM-AJAY) योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेंतर्गत प्रति लाभार्थी/प्रति प्रकरण देण्यात येणारी अनुदान रक्कम 10 हजारवरुन 50 हजार रुपये करण्यात आहे.
या योजनेसाठी लाभार्थ्याकरिता उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मात्र ज्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असे नमूद केलेले आहे.
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या (MPBCDC Yojana) अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी या योजनेअंतर्गत अनुदानाची मर्यादा 10 हजारावरुन जास्तीत जास्त 50 हजारापर्यंत करण्यात आलेली आहे.
या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या खालील संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी.
अर्जदाराने ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह (तीन प्रती) आपले कर्जचे अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., गृहनिर्माण भवन, तळमजला रूम नं 35, कलानगर, बांद्रा (पूर्व), मुंबई-51 या ठिकाणी सादर करावेत.
अर्ज स्वत:दाखल करणे आवश्यक आहे.त्रयस्थ तसेच मध्यस्थामार्फत अर्ज स्विकारले जाणार नाही, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
महामंडळामार्फत सदर योजना राबविताना पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याकडून घेतली जातात व त्यानुसार योग्य प्रस्ताव बँकेला पाठविले जातात. बँकेकडून अशा प्रकरणांत कर्ज मंजूरी प्राप्त झाल्यानंतर महामंडळामार्फत रु. 10,000/- किंवा यापेक्षा जी रक्कम कमी असेल अशा अनुदान रकमेचा धनादेश संबंधित बँकेला पाठविला जातो व तद्नंतर अर्जदाराला बँकेमार्फत कर्ज वितरीत केले जाते. अशाप्रकारे विशेष घटक योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाची कार्यवाही करण्यात येते. कर्ज स्वीकारताना व बँकेला पाठविताना घ्यावयाच्या कागदपत्रांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
- व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते.
- अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते.
- तद्नंतर प्राप्त कर्ज प्रकरणे मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत प्रकरणांची छाननी करुन मान्यता प्रदान केली जाते.
- जिल्हा लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर झालेली कर्ज प्रकरणे संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीयीकृत बँकेकडे मंजूरीस्तव शिफारस करण्यात येतात.
- राष्ट्रीयीकृत बँकांकडून अशा प्रकरणांना मंजूरी प्राप्त झाल्यानंतर अनुदानाची रक्कम महामंडळाकडून संबंधित बँकांकडे वितरणाकरिता पाठविली जाते.
या योजनेअंतर्गत रु. 50,000/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये जास्तीत जास्त रु. 10,000 ते 50,000 (मर्यादेसह) बँककडून कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये रु. 10,000 अनुदान महामंडळाकडून व उर्वरीत रक्कम बँकेकडून त्यांच्या व्याजदराने दिले जाते.
ऑनलाईन अर्ज (Apply Online MPBCDC Yojana): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे बीज भांडवल अनुदान योजना !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!