पोलीस शिपाई भरतीमध्ये EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग अथवा खुल्या प्रवर्गात सामावून घेण्याबाबत परिपत्रक जारी
सन २०२२-२०२३ या वित्तीय वर्षातील (Police constable recruitment update) रिक्त असलेले पोलीस शिपाई संवर्गातील पदे भरण्याकरीता दिनांक ०५.०३.२०२४ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर भरतीकरीता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांकडे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC) / इतर मागास वर्ग (OBC) या प्रवार्गाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे संबंधित उमेदवारांनी आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेले असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ज्या उमेदवाराकडे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) / इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) वर्गवारीचे प्रमाणपत्राआधारे त्यांच्या मुळ अर्जातील दावा कायम ठेवला आहे. अशा उमेदवाराबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाचे अभिप्राय मागविण्यात आले होते.
त्यास अनुसरुन शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास लेखी कळविले आहे की, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता (SEBC) आरक्षण अधिनियम, २०२४ दिनांक २६.०२.२०२४ अन्वये ज्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे (SEBC) व इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाचा (SEBC) लाभ अनुज्ञेय ठरत नाही.
त्या अनुषंगाने सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की, ज्या मराठा समाजातील उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC) ऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. अशा उमेदवारांवर खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :-
ज्या घटकांची लेखी परीक्षा होवून कागदपत्र पडताळणीचे काम सुरु आहे अशा घटकांनी मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केला आहे, अशा उमेदवारांना कार्यालयात बोलावून घेवून त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गा ऐवजी त्यांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC) व इतर मागास वर्ग (OBC) व खुला प्रवर्ग (OPEN) या तीनपैकी एका प्रवर्गाचा फायदा अनुज्ञेय ठरतो ही बाब समजावून सांगावी व त्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) / इतर मागास वर्ग (OBC) व खुला प्रवर्ग (OPEN) या तीनपैकी एका प्रवर्गाची निवड करुन त्याबाबतचे हमीपत्र त्यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे. तसेच, या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग किंवा इतर मागास वर्ग या प्रवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी १ महिन्याची मुदत द्यावी व ते प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातून नियुक्ती द्यावी.
ज्या घटकांची लेखी परीक्षा होवून कागदपत्र पडताळणी झाली आहे व त्यांची तात्पुरती निवडसूची करण्याचे प्रस्तावित आहे अशा घटकांनी मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केला आहे, अशा उमेदवारांना कार्यालयात बोलावून घेवून त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गा ऐवजी त्यांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC) व इतर मागास वर्ग (OBC) व खुला प्रवर्ग (OPEN) या तीनपैकी एका प्रवर्गाचा फायदा अनुज्ञेय ठरतो ही बाब समजावून सांगावी व त्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) / इतर मागास वर्ग (OBC) व खुला प्रवर्ग (OPEN) या तीनपैकी एका प्रवर्गाची निवड करुन त्याबाबतचे हमीपत्र त्यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे. तसेच, या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग किंवा इतर मागास वर्ग या प्रवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी १ महिन्याची मुदत द्यावी व ते प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातून नियुक्ती द्यावी.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गात यापूर्वी अर्ज केलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून नियुक्ती न देता ती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) / इतर मागास वर्ग (OBC) व खुला प्रवर्ग (OPEN) यापैकी एका प्रवर्गातून नियुक्ती देण्यात यावी. उपरोक्त नमूद कार्यवाही अंतिम निवडसूची तयार करण्यापुर्वी करण्यात येईल.
हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!