Anganwadi Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी मदतनीस १४ हजार जागांसाठी भरती !
राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे (Anganwadi Bharti) लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी मदतनीस १४ हजार जागांसाठी भरती ! Anganwadi Bharti 2024 :
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत.
शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत महाराष्ट्र राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत.
एकूण जागा : १४ हजार ६९० जागा.
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
१ | अंगणवाडी मदतनीस | ग्रामीण | १३९०७ |
शहरी | ७८३ | ||
एकूण जागा | १४,६९० |
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र राज्य.
अर्ज करण्याची तारीख : नंतर कळविण्यात येईल.
अंगणवाडी मदतनीस भरती (Anganwadi Bharti) बाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.
हेही वाचा – अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती – नियुक्ती प्रक्रिया, पात्रता, अटी व शर्ती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!