इतर मागास बहुजन कल्याण विभागघरकुल योजनावृत्त विशेषसरकारी योजना

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपुर जिल्हयातील 3522 घरकुलांना निधी मंजूर !

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत खालील शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / (Yashwantrao Chavan Gharkul Yojana) घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, चंद्रपुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २०.०६.२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने दिनांक २४.०६.२०२४ रोजीच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील ३५२२ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.६ येथील पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना – Yashwantrao Chavan Gharkul Yojana :

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत (Yashwantrao Chavan Gharkul Yojana) सन २०२४- २५ करीता चंद्रपुर जिल्ह्यातील खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे ३५२२ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु. १.३० लक्ष प्रमाणे रु. ४५,७८,६०,०००/- (अक्षरी रुपये पंचेचाळीस कोटी अठ्याहत्तर लक्ष साठ हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु. ५२००/- प्रमाणे) रु. १,८३,१४,४००/- (अक्षरी रुपये एक कोटी त्र्याऐंशी लक्ष चौदा हजार चारशे फक्त) असा एकूण रु. ४७,६१,७४,४००/- (अक्षरी रुपये सत्तेचाळीस कोटी एकसष्ट लक्ष चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु. ९,५२,००,०००/- (अक्षरी रुपये नऊ कोटी बावन्न लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

  1. बल्लारपुर (२०२३-२४) – लाभार्थी संख्या : २९
  2. ब्रम्हपुरी (२०२३-२४) – लाभार्थी संख्या : २६२
  3. ब्रम्हपुरी (२०२४-२५) – लाभार्थी संख्या : २००
  4. सावली (२०२४-२५) – लाभार्थी संख्या : २३६५
  5. सिंदेवाही (२०२३-२४) – लाभार्थी संख्या : ६६६

लाभार्थी संख्या एकूण : ३५२२

अटी:

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ३५२२ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

१. चंद्रपुर जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त वरील नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

२. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

४. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ अथवा २०२३-२४ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील.

५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.

८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पुर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, चंद्रपुर व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपुर यांची राहील.

सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपुर यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच, सदरहू निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपुर यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना(Yashwantrao Chavan Gharkul Yojana), चंद्रपुर व सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपुर यांनी सर्व अटी व शर्तीच्या पुर्ततेशिवाय निधी खर्च करु नये. तसेच, याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

याबाबतचा खर्च सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३. मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरीता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (Yashwantrao Chavan Gharkul Yojana) (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२४-२५ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात येईल.

याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय (Yashwantrao Chavan Gharkul Yojana GR):

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत (Yashwantrao Chavan Gharkul Yojana) चंद्रपुर जिल्हयातील 3522 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर – प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.