MahaJyoti Financial Assistance Scheme : महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना; या विद्यार्थ्यांना मिळणार २५,००० रुपये आर्थिक सहाय्य !
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेले आहेत अश्या विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेकरिता (MahaJyoti Financial Assistance Scheme) ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना ! MahaJyoti Financial Assistance Scheme :
केंद्रीय लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक सहाय्य (MahaJyoti Financial Assistance Scheme) महाज्योती मार्फत देण्यात येईल.
योजनेच्या लाभासाठी पात्रता :-
1. विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गा पैकी असावा.
2. विद्यार्थी हा दि. 01/07/2024 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेला असावा.
3. ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था सारथी, पुणे कडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनाच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही.
अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे :-
1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
2. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
4. पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र
5. पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश (आधारकार्ड लिंक असावा)
6. पूर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैठक क्रमांक ठळक करून देण्यात यावा)
अटी व शर्ती :-
1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 20/07/2024 राहील.
2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
4. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास तो/ती कायदेशीर कार्यवाईस पात्र राहील.
5. ज्या अर्थी शासन निर्णय क्र. सान्यावि-2023/प्र.क्र.60(4) दि.30/10/2023 मध्ये असे नमूद आहे की, 66 एक विद्यार्थी / उमेदवार अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, इत्यादींचा एकदाच लाभ घेण्यास पात्र राहील.” त्याअर्थी विद्यार्थ्याने यापूर्वी महाज्योतीच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला असल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘सारथी ‘या संस्थेकडून सदर योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही.
6. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करण्याऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल. त्याकरिता विभाग किंवा कार्यालय जबाबरदार राहणार नाही.
7. विद्यार्थाचे बैंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा :
खालील महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत वर नमूद केलेली कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.
ऑनलाईन अर्ज (MahaJyoti Financial Assistance Scheme Apply Online) :
महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य (MahaJyoti Financial Assistance Scheme) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचणी आल्यास महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा किंवा ईमेलवर संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:- ०७१२-२८७०१२०/०७१२२८७०१२१
ईमेल:- mahajyotihelpdesk@gmail.com
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; युवकांना दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!