Post Zero Balance Account : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोस्टात झिरो बॅलन्स मध्ये खाते उघडण्याचे आवाहन !
महाराष्ट्र शासनाद्वारे घोषित करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस सेविंग बँक खाते हे शून्य रुपयांमध्ये काढून देण्यात येत आहे. तसेच या खात्याला आधार क्रमांक संलग्न करून त्यामध्ये महिला या योजनेचे पैसे जमा करून घेऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोस्टात झिरो बॅलन्स मध्ये खाते उघडण्याचे आवाहन ! Post Zero Balance Account :
या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांचे आधार संलग्न खाते असणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सदर योजनेअंतर्गत महिलांचे कोणतेही पैसे न भरता (Post Zero Balance Account), आधार संलग्न सेविंग खाते उघडता येणार आहे. यासाठी महिलांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये केवळ आपले आधार कार्ड व फोटो घेऊन जाणे आवश्यक आहे.
तसेच महिला सदर योजनेच्या लाभासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे देखील ‘शून्य’ बॅलन्स – Post Zero Balance Account’ खाते काढू शकतात. महिलांना पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा आपल्या गावातील / शहरातील पोस्टमन / शाखा डाकपाल यांचेशी संपर्क साधून आपले खाते उघडता येणार आहे.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा पोस्टमन बरोबर संपर्क साधून आपले हे खाते उघडून घ्यावे आणि या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीची पूर्तता करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे हे ‘थेट लाभ हस्तांतरण’ (Direct Benefit Transfer) सक्षम बैंक खाते उघडल्यामुळे महिलांना सरकार मार्फत ‘थेट लाभ हस्तांतरण’ योजनेअंतर्गत योजनांचे लाभ मिळू शकतील. यासाठी महिलांनी स्वतः जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये केवळ आपले आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.
तसेच ज्या खातेधारकांनी अद्याप आधार क्रमांक संलग्र केला नसेल अशा सर्व खातेदारांनी देखील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा पोस्टमन बरोबर संपर्क साधून आपले इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये उघडलेले खाते आधार संलग्न करून घ्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
सर्व पोस्ट ऑफिसेस सदर योजनेसाठी अर्ज करू इच्छीणाऱ्या महिलांचे पोस्ट ऑफिस सेविंग खाते उघडण्यासाठी सेवा देण्यास सज्ज आहे. तसेच ज्या महिलांचे पोस्ट ऑफिसमध्ये आधीच खाते आहे; परंतू खात्यास आधार क्रमांक सलग्न केलेला नाही त्यांनी या योजनेचे पैसे जमा होण्यासाठी त्वरित नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपला आधार क्रमांक खात्यास सलग्न करून घ्यावा व तो खाते क्रमांक सदर योजनेसाठी अर्ज करतांना देता येईल.
तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी पात्र असण्याऱ्या सर्व महिलांनी त्वरीत आपल्या जवळच्या पोस्टात आधार सलग्न सेविंग खाते अथवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते (Post Zero Balance Account) काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!