MSKVIB Schemes : खादी ग्रोमोद्योग मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन !
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सनमान योजना व मधमाशापालन उद्योगाकरीता मध केंद्र योजना अशा विविध (MSKVIB Schemes) योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
खादी ग्रोमोद्योग मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ! MSKVIB Schemes :
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना :
ही योजना केंद्रीय सुक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारच्यावतीने राबविण्यात येत असून योजनेंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी व विशेषगटामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अल्पसंख्यांक, तृतीयपंथी, इतर,मागासवर्गीय, महिला माजी सैनिक, अंपग लाभार्थ्यांना स्वत:चा उद्योग सुरु करण्याकरीता मार्जीन मनी सवलत देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना :
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना स्वत:चा उद्योग सुरु करण्याकरीता बँकेने मंजुर केलेल्या कर्जावर राज्य शासनाच्या स्वहिस्सा भरणार आहे. दोनही योजनेंतर्गत 50 लाख मर्यादा व सेवा उद्योग व्यवसासाठी 20 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य मर्यादा आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना :
या योजनेंतर्गत पारंपारिक 18 उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. या उद्योगांतर्गत रजिस्टेशन मान्यता प्राप्त ऑनलाईन सेंटर कडून केल्या जाते. कारागिरांना त्यांच्या पारंपारिक उत्पादने आणि सेवांच्या विस्तारासाठी आवश्यक ते सर्व अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. योजनेंतर्गत नोंदणीकृत कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण, टूलकिटकरीता 15 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जातात. तारणमुक्त व्यवसायीकता विकास कर्ज बँकेमार्फत पहिला हप्ता 1 लाख रुपये 18 महिन्याच्या परतफेडीसाठी आणि 2 हप्ता 2 लाख रुपये 30 महिन्याच्या परतफेडीसाठी दिला जातो. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
मध केंद्र योजना:
या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत (MSKVIB Schemes) मध उद्योगाचे प्रशिक्षण दिल्या जाते. तसेच मधपेट्या व इतर साहित्याच्या खरेदीकरीता लाभार्थ्यांना 50 टक्के स्वगुंतवणूक व मंडळाचे अनुदान 50 टक्के असे एकुण 100 टक्के वस्तुस्वरुपात साहित्य वितरीत करण्यात येते. या योजनेंतर्गत मध खरेदी करण्याची मंडळाने हमी घेतली आहे. ही योजना शेतक-यांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने फायदेशिर आहे. यासाठी मध उद्योग प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षणार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!