MFS Admission : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25
तरुण व होतकरु तरुण उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक/अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पाठयक्रम (MFS Admission) दरवर्षी आयोजित करतात. अग्निशामक पाठयक्रम (कालावधी ०६ महिने) व अधिकारी पाठयक्रम (कालावधी ०१ वर्ष हे दोन्ही पाठ्यक्रम निवासी असून या पाठयक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टीकोनातून हे पाठयक्रम आयोजित करण्यांत येतात.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25 – MFS Admission :
अग्निशमन सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टीप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक / अधिकारी यांची मोठया प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात.
एकूण जागा: 40+ जागा
अ. क्र. | कोर्सचे नाव | पद संख्या | कालावधी |
1 | अग्निशामक कोर्स (Fireman Course) | — | 06 महिने |
2 | उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स – Sub-Officer & Fire Prevention Officer Course | 40 | 01 वर्षे |
एकूण जागा | 40+ |
शैक्षणिक पात्रता:
- अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
- उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
शारीरिक पात्रता:
खाली नमूद केल्याव्यतिरिक्त अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे व त्यास मराठी भाषा येणे गरजेचे आहे. सदर बाब शैक्षणिक व कागदपत्रांची पडताळणीच्या वेळी बघितली जाईल).
कोर्सचे नाव | उंची | वजन | छाती |
अग्निशामक (फायरमन) | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
वयाची अट: 15 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट]
- अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
- उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे
फी:
कोर्सचे नाव | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग |
अग्निशामक (फायरमन) | ₹600/- | ₹500/- |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | ₹750/- | ₹600 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 23 सप्टेंबर 2024 पासून
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
जे प्रशिक्षणार्थी उप अग्निशमन अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी तसेच अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रमात उत्तीर्ण होतील त्यांना महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीमार्फत पाठयक्रमाचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका देण्यांत येतील. पाठयक्रमाचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका परीक्षा झाल्यापासून ६० दिवसांच्या आत देण्यांत येईल.
अधिक माहितीसाठी Maharashtra Fire Services संकेतस्थळावर भेट देणे आणि टोल फ्री क्रमांक ९६०४४०७४०० येथे संपर्क साधू शकता.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, हंस भुग्रा मार्ग, विदयानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०० ०९८ येथे भेट देणे.