Right To Give Up Scholarship : चुकून राईट टू गिव्ह अपचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार शिष्यवृत्ती !
शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरतांना महाडीबीटी पोर्टलवरील Right To Give Up Scholarship चा Option या पर्यायाचे बटन अनावधानाने किंवा चुकीने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पोर्टलवर प्रिन्सिपल लॅागिनवरून भरण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. असा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यांशी संपर्क साधून नव्याने फेरअर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी MahaDBT पोर्टलवर आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करावा! Right To Give Up Scholarship:
महाडीबीटी पोर्टलवरील Right To Give Up Scholarship Option या पर्यायाचे बटण नजरचुकीने अथवा अनावधानाने निवडलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रिन्सिंपल लॉगिनला महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
त्या अनुषंगाने अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्याकडून पोर्टलवर नजर चुकीने अथवा अनावधानाने Right To Give Up Scholarship पर्याय निवडला गेला आहे, असा विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगिन मधून REVERT RIGHT TO GIVE UP APPLICATION या पर्यायाचा वापर करुन आपला अर्ज दिनांक 30 जून पुर्वी Revert Back करुन घेणे आवश्यक आहे.
तसेच Revert Back झालेला अर्ज देखील विहीत वेळेत म्हणजेच दि. 30 जून पुर्वी विद्यार्थ्याने त्याच्या लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीनेच फेरसादर करणे आवश्यक आहे.
विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज फेरसादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी अथवा त्याच्या महाविद्यालयाची राहील, याची महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!