उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
शासनाकडून महिलांना स्वतः च्या पायावर उभे राहता यावे, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यांपैकी एक उद्योगिनी योजना (Udyogini Scheme) आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे, यासाठी शासनाच्या वतीने उद्योगिनी योजना (Udyogini Scheme) ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जात आहे. या माध्यमातून स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वः कर्तृत्वावर खासगी व्यवसाय उभारण्याची संधी मिळणार आहे. इतर महिलांना या योजनेतून मिळणाऱ्या कर्जाला अत्यल्प व्याजदर लागत असल्याने त्यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनस्तरावर महिलांनी वेगवेगळ्या योजना लागू करण्यात आल्या आहेत. महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे, यासाठी हा प्रयत्न आहे
उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान ! Udyogini Scheme:
उद्योगिनी (Udyogini Scheme) योजनेंतर्गत महिलांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. १८ ते ५५ वयोगटातील महिला उद्योजक, शेती, किरकोळ आणि अशा प्रकारच्या लघुउद्योगामध्ये कर्जाची सोय केली गेलेली आहे. उद्योगिनी (Udyogini Scheme) योजनेंतर्गत महिलांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन करुन त्यांना व्यवसाय उभारणीसाठी मदत करण्याची गरज आहे. जेणे करुन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना या योजनेची माहिती उपलब्ध होऊन उद्योग उभारणीाठी मदत होईल. शासनाने या योजनांची माहिती ग्रामीणस्तरावर पोहचविण्याची गरज आहे.
पात्रता:
- अर्जदार एक महिला असावी.
- अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न सर्वसाधारण आणि विशेष श्रेणीतील महिलांसाठी ₹ 1,50,000/- पेक्षा कमी असावे, विधवा किंवा अपंग महिलांसाठी कौटुंबिक उत्पन्नावर मर्यादा नाही.
- अर्जदाराचे वय सर्व श्रेणींसाठी १८ ते ५५वर्षांच्या दरम्यान असावे.
- र्जदाराने मागील कोणत्याही आर्थिक कर्जावर डिफॉल्ट केलेले नसावे.
आवश्यक कागदपत्रे :
खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- योजनेच्या पात्र लाभार्थीना पासपोर्ट आकाराचे फोटो,
- आधार कार्ड,
- जन्म दाखला,
- उत्पन्नाचा दाखला,
- रेशन कार्ड,
- जात प्रमाणपत्र,
- बँक पासबुक झेरॉक्स.
योजनेंतर्गत प्राधान्य:
- अत्यंत गरीब, निराधार, विधवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना प्राधान्य देऊन योजनेतंर्गत बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. इतर महिलांना मात्र यासाठी अत्यल्प व्याज द्यावे लागणार आहे.
- उद्योगिनी (Udyogini Scheme) योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला तीन लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यासाठी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १,५०,०० पेक्षा जास्त नसावे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, लाभार्थीला कर्जामध्ये ३० टक्के अनुदान देण्यात येते.
कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज?
या योजनेअंतर्गत कोणत्याही उद्योगासाठी कर्ज मिळू शकते. त्यात बेकरी, सौंदर्य प्रसाधन केंद्र, दुकान, साडी, अगरबत्ती उत्पादन, रास्त भाव दुकान, पिठाची गिरणी, स्टेशनरी स्टोअर आदी व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच उद्योगिनी (Udyogini Scheme) योजना लघुव्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक, स्वयंरोजगार, व्यावसायिक, व्यापारासाठी अधिकाधिक ३ लाखांपर्यंतचे कर्ज पुरविले जाते. या कर्ज योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिला १८ ते ५५ या वयोगटातील असाव्यात. पात्रतेनुसार संबंधित योजनेचा लाभ दिला जातो.
उद्योगिनी योजनेंतर्गत अर्ज प्रक्रिया – (Udyogini Scheme Application):
व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँकेला भेट देऊ शकतो. कर्जाचा अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात किंवा थेट पुरवठादाराच्या खात्यात यंत्रसामग्री, उपकरणे किंवा इतर कोणत्याही भांडवली खर्चासाठी वितरित केली जाते. सारस्वत बँक, बजाज फायनान्स सारख्या खाजगी वित्तीय संस्था देखील उद्योगिनीसाठी (Udyogini Scheme) कर्ज देतात.
खालील लेख देखील वाचा!
- नवीन उद्योजकांसाठी मोफत एमएसएमईच्या उद्यम नोंदणी ऑनलाईन कशी करायची? जाणून घ्या सविस्तर.
- FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- घरबसल्या शॉप एक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Shop Act Licenses)
- कृषी सेवा केंद्र परवाना (बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme
- कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना
- डेल्हीवरी कुरिअर कंपनी सोबत तुमचा व्यवसाय सुरु करा आणि महिना कमवा हजारो रुपये !
- ॲमेझॉन IHS सोबत व्यवसाय करा आणि कमवा हजारो रुपये (Amazon IHS Registration)
- शून्य क्रेडिट आणि १००% रिकव्हरी राखण्यासाठी व्यवसाय धोरण !
- बटण मशरूम व्यवसाय संकल्पना!
- शेतमाल तारण कर्ज योजना – Shetmal Taran Karj Yojana (MSAMB)
- पीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांनी उद्योग कर्जासाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
उद्योगिनी योजना साठी अर्ज कुठे करावा काही काँटॅक्ट नंबर आहे का
व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँकेला भेट देऊ शकतो.
Bank yachi dakhal ghet. Nahit tolva tolvi krtat कोणतीही बँक सहकार्य करत नाहीत