Nano Fertilisers : नॅनो खतांसाठी MahaDBT वर अर्ज सुरु !
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी तीन वर्षाकरीता विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना नॅनो खतांचा पुरवठा केला जाणार असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नॅनो खतांसाठी MahaDBT वर अर्ज सुरु ! ! Nano Fertilisers :
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी ही योजना राबविली जात आहे. योजनेंतर्गत चालू खरिप हंगाम मध्ये नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस या निविष्ठा पुरविण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि. १२ ते ३० जून आहे. मेटाल्डीहाइड सोयाबीनचा अर्ज करण्याचा कालावधी दि. १२ ते २३ जून आहे.
या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि.१२ जून पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खालील महाडीबीटी वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
नॅनो खताच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया – MahaDBT Farmer Nano Fertilisers Scheme:
महा-डीबीटी (MahaDBT Farmer Scheme) चा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. खालील संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आधार क्रमांक टाकून MahaDBT Farmer Scheme पोर्टल वर लॉगिन करा.
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन झाल्यावर सर्व वैयक्तिक तपशील भरा आणि पुढे आपल्याला “अर्ज करा” वर क्लिक करायचे आहे.
फॉर्मर लॉगिनच्या अर्जामध्ये विविध योजनेचे पर्याय आहेत, पण आपणाला बियाणे खते वाटपाच्या अनुदानासाठी “बियाणे, औषधे आणि खते” हा पर्याय निवडून “बाबी निवडा” वर क्लिक करा.
आता अर्जदारास तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जतन करा बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
“सबमिट अप्लिकेशन” बटणावर क्लिक केल्यावर ते सबमिशनच्या पुष्टीकरणासाठी पॉप अप संदेश दर्शवितो. “ओके” बटणावर क्लिक केल्यावर ते पेमेंट वर पुनर्निर्देशित होईल जिथे अर्जदार पैसे भरण्यास सक्षम असेल.
मेक पेमेंट बटणावर क्लिक केल्यास ते पेमेंट गेटवे पोर्टलकडे पुनर्निर्देशित होईल. पेमेंट केल्यानंतर अर्जदार पेमेंट पावतीची प्रिंट आउट घेऊ शकतो.
महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप: महाडीबीटी शेतकरी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800
कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडवण्यासाठी तसेच अन्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी प्रत्यक्ष, दूरध्वनी, ईमेल अथवा एसएमएसद्वारे नोंदवून शासनाच्या गतिमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे.
हेही वाचा – Pik Spardha 2024 : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचं आवाहन !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!