MIDH 2024-25 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान !
केंद्र शासनाने दिनांक १ एप्रिल २०१४ पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (NHM), उत्तर पूर्व आणि हिमालयीन राज्यासाठी फळबाग अभियान (HMNEH), राष्ट्रीय बागवानी मंडळ (NHB), नारळ विकास मंडळ (CDB) व केंद्रीय फलोत्पादन संस्था (CIH) या सर्व योजनांचे एकत्रिकरण करुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (Mission for Integrated Development of Horticulture) राज्यात राबविण्याबाबत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाने पत्रान्व्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२४-२५ चा वार्षिक कृति आराखडा (AAP) तयार करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार वार्षिक कृति आराखडा (AAP) शासनास प्राप्त झाला. मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली दि. ०३ मे, २०२४ रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीच्या बैठकीत कृषि उन्नती योजनेअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) योजनेच्या रु.२०८.३३ कोटी रक्कमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने कृषि उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन २०२४-२५ मध्ये राज्यात राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे –
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान – MIDH 2024-25:
कृषि उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन २०२४-२५ मध्ये राज्यात राबविण्यासाठी रुपये २०८३३.३३ लाख (रुपये दोनशे आठ कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार फक्त) एवढ्या निधीच्या कार्यक्रमास पुढीलप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
तपशील | केंद्र हिस्सा (६०%) | राज्य हिस्सा (४०%) | एकूण (रु. लाख) |
नवीन कार्यक्रम २०२४-२५ | १०५९६.४७ | ७०६४.३१ | १७६६०.७८ |
स्पील ओव्हर कार्यक्रम/दायित्व २०२३-२४ | १९०३.५३ | १२६९.०२ | ३१७२.५५ |
एकूण | १२५००,०० | ८३३३.३३ | २०८३.३३ |
२) MIDH अंतर्गत सन २०२४-२५ मधील अर्थसंकल्पिय तरतुद व प्रशासकीय मान्यतेचा प्रवर्गनिहाय तपशील खालीलप्रमाणे राहील.
प्रवर्ग | हिस्सा | अर्थसंकल्पीय तरतुद | प्रशासकीय मान्यता |
सर्वसाधारण (८१%) | केंद्र | १४५८०. | १०१२५. |
राज्य | ९७२०. | ६७५०. | |
एकूण | २४३००. | १६८७५. | |
अनु. जाती (१०%) | केंद्र | १८००. | १२५०. |
राज्य | १२००. | ८३३.३३ | |
एकूण | ३०००. | २०८३.३३ | |
अनु. जमाती (९%) | केंद्र | ११२५. | ११२५. |
राज्य | ७५०. | ७५०. | |
एकूण | १८७५. | १८७५. | |
एकूण | केंद्र | १७५०५. | १२५००. |
राज्य | ११६७०. | ८३३३.३३ | |
एकूण | २९१७५. | २०८३३.३३ |
कृषि उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविणेसाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे हे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यान्वित राहील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी.
राज्य शासन सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त (कृषि) तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना BDS प्रणालीद्वारे निधी वितरित करेल. सदर निधीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांना PFMS प्रणालीद्वारे वितरण करावे व त्यांनी लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे अनुदान जमा करावे.
सन २०२४-२५ करिता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मंजूर कृति आराखडा या शासन निर्णयासोबत “परिशिष्ट-अ” म्हणून जोडला आहे. या कृति आराखड्यातील मंजूर घटकानुसार अभियानाची अंमलबजावणी करावी. यामध्ये मागील दायित्व प्राधान्याने पूर्ण करावे.
सदर योजनेसाठी उपलब्ध होणारा अर्थसंकल्पीत निधी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी पुढील लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
या अभियानाकरिता वितरित करण्यात येणारा निधी कोषागारातून आंहरित करण्याकरिता लेखाधिकारी, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना आंहरण व संवितरण अधिकारी म्हणून आणि आयुक्त (कृषि) तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
सदर योजनेंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) यांनी शासनास सादर करण्यात येईल.
या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणारा निधी जिल्हा स्तरावरुन खर्च करण्यात येणार आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय :
कृषि उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2024-25 मध्ये राज्यात राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – Phalbag Lagwad Yojana 2024 : फळबाग लागवड योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!