कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी कामे

E-Peek Pahani FAQ : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे !

आपण या लेखात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या (E-Peek Pahani FAQ) प्रश्नांची उत्तरे सविस्तर पाहणार आहोत.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे – E-Peek Pahani FAQ:

१. प्रश्न: ई-पीक पाहणी ॲप काय आहे?

उत्तर :- शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पिकाचा अहवाल स्मार्टफोन द्वारे सादर करण्याची संगणकीय प्रणाली आहे.

२. प्रश्न: ई-पीक पाहणी ॲप चा वापर करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास कोणाशी संपर्क साधावा?

उत्तर :- तांत्रिक मदतीसाठी हेल्पलाईन क्र. ०२०-२५७१२७१२ या दूरध्वनी क्रमाकाशी संपर्क साधावा, तसेच मोबाईल ॲप मध्ये मदत बटन देण्यात आले आहे यामध्ये ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पीक पाहणी कशी नोंदवावी याबाबत यूट्यूब व्हिडिओ लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

३. प्रश्न: ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरण्यासाठी काय माहिती आवश्यक आहे ?

उत्तर :- ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे:

  • अद्यावत प्रणाली एन्ड्रोईड ४.४ किंवा त्यावरील
  • सेन्सर A-GPS
  • इंटरनेटः ३G, ४G किंवा वायफाय
  • मेमरी कमीतकमी २ GB रॅम
  • कीबोर्ड गुगल इंडिक कीबोर्ड (मराठी साठी)

४. प्रश्न : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप कसे स्थापित करावे ?

उत्तर : स्मार्टफोन मध्ये इंटरनेट सुरु करून प्लेस्टोअरवर epeek असा शब्द टाईप करा व ई-पीक पहाणी (ई-पीक पहाणी महसूल विभाग, महाराष्ट्र शासन) https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait epeek निवडावे व स्थापित करावे.

५. प्रश्न : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यानंतर काय करावे ?

उत्तर :- ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यानंतर ‘install’ (इंस्टाल) वर क्लिक करावे, ॲप परमिशन विचारले असता ‘allow’ वर क्लिक करावे.

६. प्रश्न : ई-पीक पहाणीच्या नोंदी मोबाईल द्वारे करण्यासाठी कोणत्या प्रकारचा मोबाईल वापरण्यात यावा ?

उत्तर :- ई-पीक पहाणीच्या नोंदी मोबाईल द्वारे करण्यासाठी एन्ड्रोईड प्रकारचा मोबाईल वापरण्यात यावा.

७. प्रश्न : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप नाव नोंदणी कशी करावी ?

उत्तर :- ॲप सुरु केल्यानंतर प्रथम आपला “मोबाईल क्रमांक” प्रविष्ट करा व पुढे जा बटनवर क्लीक करा. त्यानंतर महुसल विभाग, जिल्हा, तालुका व गाव निवडा व नंतर खातेदार निवडा या खाली दिलेल्या ५ पर्यायांपैकी एक पर्याय निवडून नाव शोधा व पुढे जा यावर क्लिक करा नंतर आपणास ४ अंकी संकेताक प्राप्त होईल तो प्रविष्ट करा.

८. प्रश्न : खाता क्रमांक माहित नसल्यास खातेदाराचे नाव कसे शोधायचे ?

उत्तर :- खाता क्रमांक माहित नसल्यास आपण आपल्या नावातील पहिले नाव, मधले नाव, आडनाव अथवा गट क्रमांकाने नाव शोधू शकता.

९. प्रश्न : एका मोबाईल वरून किती खातेदारांची नावनोंदणी करू शकतात ?

उत्तर :- एका मोबाईल वरून १०० खातेदारांची नाव नोंदणी करू शकतात.

१० प्रश्न : एका मोबाईल वर मोबाईल क्रमांक बदलून १०० पेक्षा जास्त खातेदारांची नाव नोंदणी करता येऊ शकते का ?

उत्तर :- एका मोबाईल वर मोबाईल क्रमांक बदतून १०० पेक्षा जास्त खातेदारांची नाव नोंदणी करता येऊ शकत नाही.

११. प्रश्न : नाव नोंदणी मोबाईल क्रमांक बदलता का ?

उत्तर :- नाव नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक बदलता येतो.

१२. प्रश्न : एकाच मोबाईल वरून एक पेक्षा जास्त नाव नोंदणी कशा प्रकारे करावी ?

उत्तर :- एकाच मोबाईल वरून एक पेक्षा जास्त नाव नोंदणी करण्याकरिता नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायाचा वापर करावा.

१३. प्रश्न : नवीन नाव नोंदणी केलेला खातेदाराचा मोबाईल क्रमांक बदलता येतो का ?

उत्तर :- नवीन नाव नोंदणी केलेल्या खातेदाराचा मोबाईल क्रमांक बदलता येऊ शकतो.

१४. प्रश्न : एखादया खातेदाराकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल तर त्याने ई-पीक पाहणी नोंदणी कशी करावी ?

उत्तर :- त्यावेळी त्यांनी सहज उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन वापरावा.

१५. प्रश्न : संकेतांक विसरल्यास काय करावे ?

उत्तर :- संकेतांक विसरल्यास आपण संकेतांक विसरलात? हा पर्याय निवडावा आपणास संकेतांक व मोबाईल क्रमांक दिसेल, तो संकेतांक क्रमांक प्रविष्ट करून पुढे जा हा पर्याय निवडा.

१६. प्रश्न : एक खाता क्रमांकात एक पेक्षा जास्त खातेदार असल्यास काय करावे?

उत्तर :- एक खाता क्रमांकात एक पेक्षा जास्त खातेदार असल्यास खातेदारांची माहीती या पर्याया अंतर्गत सर्व खातेदारांची नावे दिसतील. या यादीतून स्वतः चे नाव निवडावे व पुढे जा यावर क्लिक करावे.

१७. प्रश्न : ॲप मध्ये voice to text feature/वैशिष्ट्य देण्यात आले आहे काय ?

उत्तर :- ॲप मध्ये voice to text feature/वैशिष्ट्य देण्यात आले आहे.

१८. प्रश्न : ई-पीक पाहणी ॲपद्वारे किती पीक वर्ग नोंदवता येतील ?

उत्तर :- खालील ४ पिकांचे वर्ग नोंदवता येतील-

  • निर्भेळ पीक
  • मिश्र पीक
  • पॉलीहाऊस पीक
  • शेडनेटहाऊस पीक

१९. प्रश्न: पीक पेरा कसा भरावा ?

उत्तर :- होम पेजवरील ‘पिकाची माहिती नोंदवा’ हा पर्याय निवडावा व योग्य माहिती यात प्रविष्ट करावी.

२०. प्रश्न : खातेदाराने आपल्या गटावर पिकाची माहिती कशी भरावी ?

उत्तर :- पिकाची माहिती नोंदवा या पर्याय अंतर्गत आपण आपला खाता क्रमांक निवडून गट क्रमांक निवडावा. गट क्रमांक निवडल्यावर आपणास आपल्या गटावरील क्षेत्र दिसेल, त्यानंतर योग्य त्या पिकाची माहिती भरावी.

२१. प्रश्न: निर्भेळ पीक म्हणजे काय ?

उत्तर :- निर्भेळ पीक म्हणजे एका क्षेत्रावर एकावेळी एकच पीक घेतले असल्यास त्याला निर्भेळ पीक म्हणतात.

२२. प्रश्न: मिश्र पीक म्हणजे काय?

उत्तर :- मिश्र पीक म्हणजे एकाच वेळी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके एका आड एक रांगेमध्ये किंवा एकत्रीत घेणे याला मिश्र पीक पद्धती असे म्हणतात.

२३. प्रश्न : पिकाची माहिती कशी नोंदवावी ?

उत्तर :- खालील प्रमाणे क्रमवार माहिती भरावी.

  • खाते क्रमांक निवडा
  • भूमापन क्रमांक निवडा
  • जमिनीचे क्षेत्र दिसेल
  • योग्य हगाम निवडा
  • पिकाचा वर्ग निवडा
  • पिकाचा प्रकार निवडा
  • पिकाचे नाव निवडा
  • पिकाचे क्षेत्र हे. आर. मध्ये भरा
  • जलसिंचित चा योग्य पर्याय निवडा व सिंचनाची योग्य पद्धत निवडावी.
  • पीक पेरणीचा/लावल्याचा योग्य दिनांक भरा.
  • गटाच्या हद्दीपासून ५० मीटरच्या आत येणे.
  • पिकाचा फोटो काढा व अपलोड करा.

२४. प्रश्न : पीक पाहणी चे क्षेत्र कसे नोंदवावे ?

उत्तर :- पीक पाहणी चे क्षेत्र हे. आर. मध्ये नोंदवावे.

२५. प्रश्न : पीक पहाणी एकर मध्ये नोंदता येईल काय ?

उत्तर :- नाही, पीक पाहणी चे क्षेत्र हे. आर. मध्येच नोंदवावे.

२६. प्रश्न : पीक पहाणी एकर मधील क्षेत्र हे. आर. मध्ये कसे नोंदवावे ?

उत्तर :- खालील प्रमाणे एकर मधील क्षेत्र हे. आर. मध्ये नोंदवावे १ एकर = ४० आर किंवा ०.४० हे.

२७. प्रश्न : पीक पहाणी १ बिगे क्षेत्र हे आर. मध्ये कसे नोंदवावे ?

उत्तर :- खालील प्रमाणे एकर मधील क्षेत्र हे. आर. मध्ये नोंदवावे

१ बिगे = ३० आर किंवा ०.३०हे. आर

२८. प्रश्न : पिकांच्या कोणत्या अवस्था समाविष्ठ कराव्यात अथवा पीक नोंदणी कधी करावी ?

उत्तर :-

  • पीक पेरणी नंतर २ आठवडे
  • पिकाची वाढलेली अवस्था
  • कापणी पूर्वी अवस्था

२९. प्रश्न : ई-पीक पाहणी या ॲप द्वारे पडीक क्षेत्र नोंदवता येते का ?

उत्तर :- होय, या ॲप द्वारे पडीक क्षेत्र नोंदवता येते.

३०. प्रश्न : या ॲप द्वारे पडीक क्षेत्र कसे नोंदवावे ?

उत्तर :- लागवडी लायक पडीक क्षेत्र असल्यास कायम पड / चालू पड या पर्याया मध्ये ‘पड क्षेत्र’ हा पर्याय निवडावा.

३१. प्रश्न : ‘कायम पडणे म्हणजे काय ?

उत्तर :- ‘कायम पड’ म्हणजे असे क्षेत्र ज्यावर कायमस्वरूपी कुठल्याही प्रकारचे पीक घेतले जात नाही.

३२. प्रश्न: ‘कायम पड कसे नोंदवावे ?

उत्तर :- ‘कायम पड’ या पर्याय अंतर्गत कायम पड़ जमीन माहिती मध्ये जमीन माहिती निवडून यादीतील योग्य तो कायम पड प्रकार निवडून त्याखालील क्षेत्र भरा व माहिती साठवा.

३३. प्रश्न : कायमपड अंतर्गत फोटो बंधनकारक आहे का ?

उत्तर :- ठराविक कायमपड प्रकारासाठी फोटो घेणे आवश्यक आहे उदा. विहीर, शेततळे, घरपड, पोल्ट्री फार्म, इ. करिता फोटो बंधनकारक आहे. जो कायम पड प्रकार निवडल्यावर कॅमेराचे ऑयकॉन दिसेल त्या कायम पड प्रकारासाठी फोटो बंधनकारक आहे असे समजावे.

३४. प्रश्न : चालू पड नोंद करताना फोटो बंधनकारक आहे का ?

उत्तर :- चालू पड नोंद करताना फोटो बंधनकारक नाही.

३५. प्रश्न : बहुवार्षिक पिकांची नोंद कशी करावी ?

उत्तर :- बहुवार्षिक पीक हे पिकांची नोंद करा या पर्याययात हंगाम संपूर्ण वर्ष निवडून पिकाचा प्रकार निवडावा व पिकाची निवड करून योग्य ते क्षेत्र भरावे व खाली कैलेंडर मध्ये ज्या दिनांकास लागवड केली असेल तो दिनांक, महिना व वर्ष निवडून फोटो काढून सबमिट करावे.

३६. प्रश्न : कोकणात फळबाग नोंदवता येईल काय ?

उत्तर :- नाही फळबाग नोंद संपूर्ण वर्ष हंगामात करता येईल.

३७. प्रश्न : फळबाग नोंद कशी करावी ?

उत्तर :- फळबाग नोंद करण्यासाठी पिकांची नोंद करा या पर्यायात संपूर्ण वर्ष हंगाम निवडून पिकाचा प्रकार यात फळबाग निवडावे व योग्य ते क्षेत्र भरावे व खाली कैलेंडर मध्ये पीक ज्या दिनांकास लागवड केली तो दिनांक, महिना, व वर्ष निवडून फोटो काढून सबमिट करावे.

३८. प्रश्न : जुनी फळबाग कशी नोंदवावी ?

उत्तर :- जुनी फळबाग नोंद करण्यासाठी पिकांची नोंद करा या पर्यायात योग्य हंगाम निवडून पिकाचा प्रकार यात फळबाग निवडावे व योग्य ते क्षेत्र भरावे व खाली कैलेंडर मध्ये पीक ज्या दिनांकास लागवड केली तो दिनांक महिना वर्ष निवडून फोटो काढून सबमिट करावे. कैलेंडर मध्ये आपणास १५ वर्षा पर्यत मागे जाता येईल.

३९. प्रश्न : मी माझ्या शेतात भात व आंबा हे पीक स्वतंत्रपणे घेतले आहे तर याची नोंद कशी करावी ?

उत्तर :- ई-पीक पाहणी मध्ये पिकांची माहिती या पर्यायात आधी योग्य हंगामाची निवड करून भात पिकाची योग्य महिती भरून फोटो सबमिट करावा व त्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी आंबा पिकाची संपूर्ण वर्ष निवडून योग्य दिनांक भरून फोटो सबमिट करा या प्रकारे शेतात भात व आंबा पिकाची यशस्वीरीत्या नोंद करता येईल.

४०. प्रश्न : सिंचन पद्धत कशी निवडावी?

उत्तर :- पिकांची नोंद करा पर्यायात आधी जल सिंचनाचे साधन निवडावे त्या नंतर सिंचन पद्धत निवडावी.

४१. प्रश्न : ई-पीक पाहणी ॲप हँग होत असल्यास काय करावे ?

उत्तर :- ॲप हँग होत असल्यास चालू असलेले इतर ॲप बंद करावे आणि ई-पीक पाहणी ॲप पुन्हा सुरु करावे.

४२. प्रश्न : सामाईक खातेदारांनी नोंदणी कशी करावी ?

उत्तर :- सामाईक खातेदारांची नोंदणी करताना सर्वांच्या वतीने एकाने अथवा प्रत्येकाने स्वतःपुरता आपापली नोंदणी करावी

४३. प्रश्न : संयुक्त खातेदाराने नोंदणी कशी करावी ?

उत्तर :- संयुक्त खातेदाराने आपापली नोंदणी स्वतंत्रपणे करावी.

४४ प्रश्न : खातेदाराने स्वतःचा खातेक्रमांक निवडला परंतु त्या खाता क्रमांक वर स्वतः चे नाव न दिसता वेगळे नाव दिसत आहे अशा वेळेस काय करावे ?

उत्तर :- अशा वेळेस नोंदणी करू नये व संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क करावा.

४५. प्रश्न : इंटरनेट आवश्यक आहे असा संदेश येत आहे ?

उत्तर :- कृपया आपले इंटरनेट (मोबईल डाटा) ऑन करा रेंज आहे का ते तपासून पहा.

४६. प्रश्न : जिपिएस (GPS) मिळवण्यासाठी काय करावे ?

उत्तर :- मोबईल सेटिंग्स मध्ये लोकेशन (location) अलाउ करा, जिपिएस (GPS)) ऑन करा व जिपिएस (GPS) सेटिंग्स मध्ये गुगल इमर्जनसी सर्विस आणि लोकेशन अक्युरसी सर्विस बंद करा.

४७. प्रश्न : जर एकाद्या खातेदाराचे एकापेक्षा जास्त गावात शेती असल्यास नाव नोंदणी करता येते का ?

उत्तर :- होय, जर एकाद्या खातेदाराचे एकापेक्षा जास्त गावात शेती असल्यास नाव नोंदणी करता येते.

४८. प्रश्न : एकाद्या खातेदाराचे एकापेक्षा जास्त गावात शेती असल्यास नाव नोंदणी कशा प्रकारे करावी?

उत्तर :- एकाद्या खातेदाराचे एकापेक्षा जास्त गावात शेती असल्यास त्या त्या गावाकरिता नवीन खातेदार नोंदणी करा हा पर्याय वापरून योग्य जिल्हा, तालुका व गाव निवडून करता येते.

४९. प्रश्न : जर एकाद्या खातेदाराचे एकापेक्षा जास्त गावात शेती असल्यास एकाच क्रमांकावरून नाव नोंदणी करता येते का ?

उत्तर :- होय, एकाद्या खातेदाराचे एकापेक्षा जास्त गावात शेती असल्यास एकाच मोबईल क्रमांकावरून नाव नोंदणी करता येते.

५०. प्रश्न : पिकाचा फोटो अपलोड करताना खातेदाराचा फोटो अपलोड करावा काय ?

उत्तर :- नाही, पिकाचा फोटो अपलोड करताना फक्त पिकाचाच फोटो अपलोड करावा.

५१. प्रश्न : एका घरात एका पेक्षा जास्त खातेदार आहेत उदा. आई, पत्नी, मुलगा, भाऊ, इतर या सर्वांची पीक पाहणी एकाच व्यक्तीच्या मोबईल वरून करता येईल काय ?

उत्तर :- होय, एका घरात एका पेक्षा जास्त खातेदार आहेत जसे खातेदाराची आई, पत्नी, मुलगा, भाऊ तर या सर्वांची पीक पाहणी एकाच व्यक्तीच्या मोबईल वरून करता येईल. यासाठी नवीन नाव नोंदणी करा हा पर्याय वापरून प्रत्येकाची स्वतंत्रपणे नाव नोंदणी करावी व संपूर्ण माहिती अपडेट करावी.

५२. प्रश्न : अन्य गटावरून शेतीसाठी पाणी वापरत असल्यास त्याची नोंद कशी करावी ?

उत्तर :- अन्य गटावरून शेतीसाठी पाणी वापरत असल्यास त्याची नोंद पिकाची माहिती या अंतर्गत जल सिंचनाचे साधन यात अन्य गटावरील विहीर हा पर्याय निवडावा.

५३ प्रश्न : पीक पाहणी यशस्वीरीत्या नोंदविल्यानंतर किती दिवसांनी ७/१२ वर दिसेल ?

उत्तर :- पीक पाहणी यशस्वीरीत्या नोंदविल्यानंतर ४८ तासानंतर ७/१२ वर दर्शविण्याची प्रक्रिया सुरू होते व गांव नमूना १२ मध्ये दर्शविण्यात येते.

५४. प्रश्न : संकेताक कायमस्वरूपी आहे कि बदलता येईल ?

उत्तर :- संकेताक कायमस्वरूपी आहे बदलता येणार नाही.

५५ प्रश्न : एका खातेदाराची नाव नोंदणी एक हेडसेट वरून एका मोबाईल क्रमांका वरून केली आहे. तर दुसऱ्या हेंडसेट वरून दुसरा मोबाईल क्रमांक वापरून पुन्हा नाव नोंदणी करता येईल काय ?

उत्तर : होय एका खातेदारांची नाव नोंदणी एक हेंडसेट वरून एका मोबाईल क्रमांका वरून केली आहे तर दुसऱ्या हेंडसेट वरून दुसरा मोबाईल क्रमांका वापरून पुन्हा नाव नोंदणी करता येईल

५६. प्रश्न : ई-पीक पाहणी नोंद करताना प्रथम काय नोंदवावे ?

उत्तर :- जर गटात पडीत क्षेत्र असेल तर अगोदर पड नोंदणी पर्याय वापरुन पडीत जमिनीची नोंद करावी तद्नंतर पिकांची नोंद करावी बांधावर झाडे असल्यास बांधावरील झाडे पर्यायाचा वापर करावा व पीक पाहणी अपलोड करावी.

५७. प्रश्न : एका खातेदाराच्या खात्यावरील सर्व गट / भूमापन क्रमांक दिसतील का ?

उत्तर :- एका खातेदाराच्या खात्यावरील संबंधित गावातील त्याच्या नावे असलेली सर्व गट / भूमापन क्रमांक दिसतील.

५८. प्रश्न : एका खातेदाराच्या दुसऱ्या गावातील गट एकाच वेळी दिसतील काय ?

उत्तर :- नाही, एकाद्या खातेदाराचे एकापेक्षा जास्त गावात शेती असल्यास त्या त्या गावाकरिता नवीन खातेदार नोंदणी करा हा पर्याय वापरून योग्य जिल्हा, तालुका व गाव निवडून त्या त्या गावातील खाता क्रमांक निवडून तेथील भूमापन क्रमांक/गट क्रमांक दिसतील व पीक पाहणी नोंदवता येईल.

५९. प्रश्न : एकत्रित पेरणी केलेल्या एका पेक्षा जास्त पिकांची नोंद करता येईल काय ?

उत्तर :- होय, मिश्र पीक पर्याय वापरून एका पेक्षा जास्त पिकांची नोंद करता येईल.

६०. प्रश्न : जमिनीचे क्षेत्र बदलता येईल काय ?

उत्तर :- नाही, जमिनीचे क्षेत्र हे ७/१२ प्रमाणे आहे ते बदलता येणार नाही.

६१. प्रश्न : एकदा अपलोड केलेली पीक पाहणी बदलता येईल काय ?

उत्तर :- पीक पाहणी पूर्ण भरून जर अपलोड केली असेल तर मोबाईल ॲप मध्ये ४८ तासांपर्यंत दुरुस्त अथवा नष्ट करा पर्याय वापरुन बदलता येईल. परंतु ४८ तासां नंतर अपलोड केलेली पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये बदलता येणार नाही.

६२. प्रश्न: ई-पीक पाहणी बदलता येईल काय ?

उत्तर :- पीक पाहणी पूर्ण भरून जर अपलोड केली असेल तर माहिती बदलता येणार नाही. जर माहिती ई-पीक पाहणी ॲप मध्ये भरली आहे परंतु अपलोड केली नाही अथवा साठवा केली नाही तर माहिती बदलता येईल.

६३. प्रश्न : जर शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे तर जल सिंचन प्रकार काय निवडावा ?

उत्तर :- जर शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे तर अजलसिंचित (जिरायत/कोरडवाहू) हा पर्याय निवडावा.

६४. प्रश्न : लागवडीचा दिनांक माहित नसल्यास काय निवडावे ?

उत्तर :- लागवडीचा दिनांक माहित नसल्यास त्या हंगामातील अंदाजित दिनांक निवडावा.

६५. प्रश्न : एकापेक्षा जास्त बांधावरची झाडे नोंदता येतात काय ?

उत्तर :- होय. एकापेक्षा जास्त बांधावरची झाडे नोंदता येतात

६६. प्रश्न : बांधावरची झाडांचे क्षेत्र निवडता येते काय ?

उत्तर :- नाही, बांधावरची झाडांचे क्षेत्र निवडता येत नाही.

६७. प्रश्न : एकापेक्षा जास्त प्रकारची बांधावरची झाडे असल्यास नोंदवता येतात काय ?

उत्तर :- होय, एकापेक्षा जास्त प्रकारची बांधावरची झाडे असल्यास नोंदवता येतात या साठी बांधावरची झाडे हा पर्याय वापरून आधी झाडाचे नाव निवडून त्याची संख्या नमूद करा व साठवा / सबमिट करा नंतर पुन्हा वरील प्रमाणे दुसऱ्या झाडाची माहिती नोंदवा.

६८. प्रश्न : एकापेक्षा जास्त विहिरी नोंदवता येतात काय ?

उत्तर :- होय एकापेक्षा जास्त विहिरी असल्यास कायम पड या पर्यायात ४ सामायिक विहीर पड नोंदवता येतात.

६९ प्रश्नः एक विहीर व एक बोर/ट्यूबवेल नोंदवता येते काय ?

उत्तर :- होय, एक विहीर व एक बोर/ट्यूबवेल नोंदवता येते या करिता कायम पड या पर्यायात आधी विहीर नोंदवावी व साठवून होम पेज वर क्लिक करून पुन्हा कायम पड या पर्याय निवडून बोर/ट्यूबवेल नोंदवावी.

७०. प्रश्न : कायम पड प्रत्येक हंगामात किती वेळा नोंदवता येईल ?

उत्तर :- कायम पड कृषी वर्षासाठी एकच वेळा नोंदवता येईल.

७१. प्रश्न : सामाईक विहीर नोंदवता येईल काय?

उत्तर :- होय, सामाईक विहीर कायम पड हा पर्याय वापरून नोंदवता येते.

७२. प्रश्न : गावात इंटरनेट नाही तर पीक पाहणी नोंदवता येईल काय ?

उत्तर :- होय, गावात इंटरनेट नसल्यास रेंज आहे अश्या ठिकाणी जाऊन नाव नोंदणी करावी त्या नंतर शेतात येऊन पीक पहाणी ची सर्व माहिती भरावी फोटो काढावा व रेंज मध्ये येऊन माहिती अपलोड करावी. इंटरनेट सुविधा ही फक्त नाव नोंदणी व माहिती अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे.

७३. प्रश्न : जर खातेदाराकडून चुकून ॲप डीलिट झाले तर नोंदणीकृत माहिती मिळवता येईल काय ?

उत्तर :- जर खातेदाराकडून चुकून ॲप डीलिट झाले तर नोंदणीकृत मोबाईल हेंडसेट वर प्लेस्टोर वरून ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करा व नोंदणीकृत मोबईल क्रमांक वरून खातेदार निवडून संकेतांक टाकून पुढे गेल्यावर आपणास आपली नोंदणीकृत माहिती पुन्हा पाहता येईल

७४. प्रश्न: ई-पीक पाहणी ॲप बाबत माहिती हवी असल्यास काय करावे ?

उत्तर :- ई-पीक पाहणी ॲप बाबत माहिती हवी असल्यास मदत हा पर्याय वापरावा.

७५. प्रश्न : खातेदार शोधा पर्याय वापरल्यास माहिती उपलब्ध नाही असा संदेश प्राप्त होत आहे काय करावे ?

उत्तर :- असा संदेश येत असल्यास कृपया पोट हिस्से सह गट क्रमांक टाकून शोधा

७६. प्रश्न : खातेदाराची माहिती इंग्रजीमध्ये भरल्यास नाव शोधता येईल काय ?

उत्तर :- नाही, मराठीत माहिती भरणे आवश्यक आहे त्यासाठी मराठी गुगल इंडीक किबोर्ड वापरावा. मराठी किबोर्ड नसल्यास स्वागत स्क्रीन वर मराठी किबोर्ड वर क्लिक करून प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून मराठीत माहिती भरावी.

७७. प्रश्न : चुकीचा पीक पेरा नोंदविल्यास काय करावे ?

उत्तर :- चुकीचा पीक पेरा नोंदवल्याचे माहिती अपलोड करण्यापूर्वी लक्ष्यात आल्यास स्वयांघोषनेपुर्वी रद्द हे बटन निवडून आवश्यक ती दुरुस्ती करावी. अपलोड केल्यानंतर ४८ तासांत कधीही खातेदारास ती दुरुस्त करता येईल. मात्र त्यानंतर दुरुस्तीसाठी तलाठी यांच्याशी संपर्क साधावा व या बाबत माहिती द्यावी. सदर दुरुस्ती तलाठी लॉगीन ला करून घ्यावी.

७८. प्रश्न : जल सिंचन चुकीचा नोंदवल्यास काय करावे?

उत्तर :- जल सिंचन चुकीचा नोंदवल्यास तलाठी यांच्याशी संपर्क साधावा व या बाबत माहिती द्यावी. सदर दुरुस्ती तलाठी लॉगीन ला करून घ्यावी.

७९. प्रश्न : चुकीचा पीक पेरा नोंदवला असेल व तलाठी यांनी तो स्वीकृत केला असेल तर काय करावे ?

उत्तर :- चुकीचा पीक पेरा नोंदवला असेल व तलाठी यांनी तो स्वीकृत केला असेल तर सदर पीक पाहणी मंडल अधिकारी यांच्या लॉगीन ने दुरुस्त करून घ्यावी.

८०. प्रश्न : कोल्ड स्टोरेज नोंद कशी करावी ?

उत्तर :- कायम पड हा पर्याय अंतर्गत कोल्ड स्टोरेज पड नोंद करावी.

८१. प्रश्न : जनावरांचा गोठा नोंद कशी करावी ?

उत्तर :- कायम पड हा पर्याय अंतर्गत जनावरांचा गोठा पड नोंद करावी.

८२. प्रश्न : कांदाचाळ पड नोंद कशी करावी ?

उत्तर :- चालू पड हा पर्याय अंतर्गत कांदाचाळ पड नोंद करावी.

८३. प्रश्न : गोटफार्म नोंद कशी करावी ?

उत्तर :- कायम पड हा पर्याय अंतर्गत गोटफार्म पड नोंद करावी.

८४. प्रश्न : मत्स्यशेती नोंद कशी करावी ?

उत्तर :- कायम पड हा पर्याय अंतर्गत मत्स्यशेती पड नोंद करावी.

८५. प्रश्न : सार्वजनिक विहीरिची नोंद कशी करावी ?

उत्तर :- कायम पड हा पर्याय अंतर्गत सार्वजनिक विहीर पड नोंद करावी.

८६. प्रश्न : मसाले पीक नोंदवतात काय ?

उत्तर :- होय पिकाची माहिती या पर्याय अंतर्गत पिकांची झाडांची नावे यात नोंद करता येते.

८७. प्रश्न : फुलझाडे यांची नोंद करता येते काय ?

उत्तर :- होय, पिकाची माहिती या पर्याय अंतर्गत पिकांची/झाडांची नावे यात नोंद करता येते.

८८. प्रश्न : भाजीपाला याची नोंद करता येते काय ?

उत्तर :- होय पिकाची माहिती या पर्याय अंतर्गत पिकाची/झाडांची नावे यात नोंद करता येते.

८९. प्रश्न : शेतात पोलीहाउस आहे त्यातील पिकांची नोंद करता येते काय ?

उत्तर :- होय पोलीहाउसची नोंद पिकाची माहिती या पर्याय अंतर्गत नावे यात नोंद करता येते.

९०. प्रश्न : मोबाईल हरवल्यास काय करावे ?

उत्तर :- आपला मोबाईल हरवल्यास नवीन मोबाईलवर आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून रिस्टोर करू शकता.

९१. प्रश्न : नवीन मोबाईल क्रमांक वापरून जुनी माहिती पुन्हा प्राप्त करता येईल काय ?

उत्तर :- नवीन मोबाईल क्रमांक वापरून जुनी माहिती पुन्हा प्राप्त करता येईल.

९२. प्रश्न : एकदा माहिती साठवा केल्यावर माहिती बदलता येईल काय ?

उत्तर :- एकदा माहिती साठवा केल्यावर माहिती बदलता येत नाही.

९३. प्रश्न : एकदा एका हंगामात माहिती साठवा केल्यानंतर पुढील हंगामात पीक पहाणी करता पेईल काय ?

उत्तर :- होय एकदा एका हंगामात माहिती साठवा केल्यानंतर पुढील हंगामात पीक पहाणी करता येईल.

९४. प्रश्न : प्रत्येक हंगामात नव्याने नाव नोंदणी करावी लागेल काय ?

उत्तर :- नाही, प्रत्येक हंगामात नव्याने नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आपण आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून पुढील हंगामाची पीक पाहणी यशस्वीरीत्या करू शकता.

९५. प्रश्न : एका शेतात काही पीक खरीप हंगामातील आहेत व काही पीक बहुवार्षिक आहेत तर एकाच शेतात अशी पीक पाहणी करता येईल काय ?

उत्तर :- होय, एका शेतात खरीप हंगामातील पीक व बहुवार्षिक पीक यांची पीक पाहणी करता येऊ शकते.

९६. प्रश्न : एकाच शेतात खरीप हंगामातील पीक व बहुवार्षिक पीक यांची नोंद कश्या प्रकारे करावी ?

उत्तर :- ई-पीक पाहणी मध्ये पिकांची माहिती या पर्यायात आधी खरीप हंगामाची पीक पाहणी भरून फोटो सबमिट करावा व त्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी बहुवार्षिक पिकांची माहिती या पर्यायात संपूर्ण वर्ष निवडून पीक पाहणी योग्य रित्या भरून फोटो सबमिट करावा.

९७. प्रश्न : एकाच शेतात खरीप हंगामात एका पेक्षा जास्त निर्भेळ पीक नोंदवता येतील का ?

उत्तर :- होय, एकाच शेतात खरीप हंगामात एका पेक्षा जास्त निर्भेळ पिके नोंदवता येतील.

९८. प्रश्न : एकाच शेतात खरीप हंगामात एका पेक्षा जास्त निर्भेळ पीक नोंद कशी घ्यावी?

उत्तर :- ई-पीक पाहणी मध्ये पिकांची माहिती या पर्यायात आधी एका निर्भेळ पिकाची खरीप हंगामाची पीक पाहणी भरून फोटो सबमिट करावा व त्यानंतर उर्वरित क्षेत्रात दुसऱ्या निर्भेळ पिकाची पिकांची माहिती या पर्यायात निर्भेळ पीक निवडून पीक पाहणी योग्य रित्या भरून फोटो सबमिट करावा अशाप्रकारे एका पेक्षा जास्त निर्भेळ पिकाची नोंद करता येते.

९९. प्रश्न : एकावेळी किती मिश्र पिकांची नोंद करता येते ?

उत्तर :- एका समारंभात एक मुख्य पीक व ३ तीन दुय्यम पिकांची मिश्र पीक म्हणून नोंद करता.

१००. प्रश्न : एका गटावर किती मिश्र पिकांची नोंद करता येते?

उत्तर :- एका गटावर एकावेळी एक मुख्य पीक व ३ तीन दुय्यम पिकांची मिश्र पिकांची नोंद करता येते या पेक्षा जास्त दुय्यम पिके असल्यास आधी ३ मिश्र पिकांची नोंद करून फोटो सबमिट करावे व पुन्हा वरीलप्रमाणे उर्वरित क्षेत्रासाठी मिश्र पिकांची नोंद करावी.

१०१. प्रश्न : एका गटावर एकाच वेळी निर्भेळ पीक व मिश्र पीक यांची नोंद करता येते का ?

उत्तर:- होय, ई-पीक पाहणी मध्ये पिकांची माहिती या पर्यायात आधी निर्भेळ पिकाची खरीप हंगामाची पीक पाहणी भरून फोटो सबमिट करावा व त्यानंतर उर्वरित क्षेत्रात मिश्र पिकाची पीक पाहणी पिकांची माहिती या पर्यायात मिश्र पीक निवडून पीक पाहणी योग्य रित्या भरून फोटो सबमिट करावा अशाप्रकारे एका गटावर निर्भेळ पीक व मिश्र पीक या पिकाची नोंद करता येईल.

१०२. प्रश्न : बिनशेती पड नोंदवता काय ?

उत्तर :- कायम पड हा पर्याय अंतर्गत बिनशेती पड नोंद करावी.

१०३. प्रश्न : एका गटात शेततळ आहे तर याची नोंद करता येईल काय ?

उत्तर :- होय गटात शेततळ असल्यास कायम पड या पर्याय अंतर्गत शेततळ पड़ निवडून नोंद करता येईल,

१०४. प्रश्न : आपल आय फोन (Apple/i-phone) वरून पीक पाहणी करता येईल काय ?

उत्तर :- नाही, ॲपल / आय-फोन Apple/i-phone) वरून पीक पाहणी करता येणार नाही.

१०५. प्रश्न : शेतात पिकांना मोकळे पाणी सोडले आहे / सारी पद्धत तर जल सिंचन पद्धत कोणती निवडावी ?

उत्तर :- यासाठी प्रवाही सिचन हा पर्याय निवडावा.

१०६. प्रश्न: जिओ-फेंसिन्ग म्हणजे काय ?

उत्तर :- जिओ-फेंसिन्ग हि इ-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये दिलेली एक सुविधा आहे, जी आपल्याला आपण निवडलेल्या गटाची पीकपाहणी करतांना आपण गटाच्या हद्दी पासून निर्धारित अंतरावर आहोत किंवा नाही याबाबत सूचना देतो.

१०७. प्रश्न : जिपीएस अचूकता मिळवणेसाठी वारंवार अद्यावत करावे काय ?

उत्तर :- जिपीएस अचूकता मिळवणेसाठी वारंवार अद्यावत बटनचा वापर करणे आवश्यक नाही जसे गटाजवळ चालत जाल तसे गटापासूनचे अंतर कामी होईल व जिपीएस अचूकता बदलत जाईल.

१०८. प्रश्न : मोबाईल ॲप मध्ये आपण आपल्या गटाच्या निर्धारित अंतरापासून दूर आहात असा संदेश आल्यास काय करावे ?

उत्तर- आपण पीक पाहणी निवडलेल्या गटाच्या जवळ जाऊन पुन्हा लोकेशन आणि फोटो घेण्याचा प्रयत्न करावा.

१०९. प्रश्न : शेताच्या बांधावर उभा आहे तरी देखील मोबाईल ॲप मध्ये “आपण आपल्या गटाच्या निर्धारित अंतरापासून दूर आहात” असा संदेश आल्यास काय करावे ?

उत्तर :- आपण पीक पाहणी साठी निवडलेल्या गटाच्या जवळ चालत जावे त्याप्रमाणे गटापासूनचे अंतर आपोआप कमी होत जाईल एकदा गटापासून निर्धारित अंतराजवळ आले कि फोटो काढणे साठी पुढे जा वर क्लिक करून पिकाचा फोटो काढावा.

११०. प्रश्न : अक्षांश / रेखांश मिळवतांना दर्शवलेली अचूकता म्हणजे काय ?

उत्तर :- आपण आपल्या शेतात ज्या ठिकाणी उभे आहेत ते स्थान आणि उपग्रहामार्फत दर्शविलेले स्थान यामधील संभाव्य फरक म्हणजे अचूकता.

१११. प्रश्न : शेताच्या हद्दी पासून फोटो घेण्याचे स्थान यामधील अंतर अचूक येण्यासाठी किमान अचूकता किती असणे आवश्यक आहे ?

उत्तर :- अचूक अंतर येण्यासाठी किमान अचूकता १५ मीटर किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

११२. प्रश्न : किमान अचूकता मिळविण्यासाठी काय करावे ?

उत्तर :- अ) ॲप मध्ये दिलेल्या सुचनेप्रमाणे आपले मोबाईल मधील GPS सेटिंग करून घ्यावीत.

ब) “अक्षांश / रेखांश घेतांना मोवाईल flite mode/aeroplane mode मध्ये ठेवावा किंवा

क) लोकेशन सेटिंग्स मध्ये गुगल इमर्जनसी सर्विस व अक्युरसी सर्विस बंद करावी म्हणजे किमान अचूकता प्राप्त होईल.

११३. प्रश्न : किमान आधारभूत योजने अंतर्गत शेतकऱ्याना ई-पीक पाहणी मोबाईल अँपद्वारे नाव नोंदणी करता येईल काय ?

उत्तर :- होय, किमान आधारभूत योजने अंतर्गत समाविष्ठ पिकांच्या बाबतीत शेतकऱ्याला सदर योजने अंतर्गत नाव नोंदणी करण्यास इच्छुक असल्यास मोबईल ॲप द्वारे पिकांची विक्री करण्यास संमती देऊन मोबाईल ॲप द्वारे नाव नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

११४. प्रश्न : किमान आधारभूत योजने अंतर्गत पिकांच्या विक्रीस कशाप्रकारे नाव नोंदणी करावी ?

उत्तर :- आपण किमान आधारभूत योजने अंतर्गत येणाऱ्या पिकांपैकी एखादे पीक निवडल्यास आपणास “सदर पिकाची किमान आधारभूत योजने अंतर्गत विक्री साठी नोंदणी करावयाची आहे?” काय असा प्रश्न दिसेल. होय पर्याय निवडून आपली संमती देऊन नाव नोंदणी करता येईल.

११५. प्रश्न : किमान आधारभूत योजने अंतर्गत विक्री साठी संमती का नोंदवावी ?

उत्तर :- खातेदाराने या ॲप द्वारे किमान आधारभूत योजने अंतर्गत विक्री साठी संमती नोंदविल्यास सदर खातेदाराची किमान आधारभूत योजने अंतर्गत नोंदणीची (रेजिस्ट्रेशन) प्रक्रिया पुरवठा विभागाकडून सुरु करण्यात येईल. त्यासाठी संमती नोंदविणे आवश्यक आहे.

११६. प्रश्न : स्वयं घोषणापत्र कोणत्या कोणत्या बाबींसाठी देणे आवश्यक आहे ? 

उत्तर :- कायमपड क्षेत्र नोंदणीसाठी, बांधावरची झाडे नोंदणीसाठी व पिकांच्या नोंदणीसाठी स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

११७. प्रश्न: ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये, ॲप बाबत अभिप्राय नोंदविण्याची सोय आहे काय ?

उत्तर :- होय, ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये “अभिप्राय नोंदवा” बटनचा वापर करून अभिप्राय नोंदवू शकता.

११८. प्रश्न : पिकांचे किती फोटो काढावे ?

उत्तर :- पिकांचे दोन फोटो काढणे बंधनकारक आहे.

११९. प्रश्नः हंगामादरम्यान खात्यामध्ये / अधिकार अभिलेखात बदल (mutation) झाले असल्यास उदा. खरेदी, विक्री, वारस नोंद, हक्कसोड, इ. बदललेल्या अधिकार अभिलेखाप्रमाणे पिक पाहणी कशी करता येईल?

उत्तर :- ज्या खातेदाराच्या खात्यामध्ये / अधिकार अभिलेखात बदल झाले आहेत त्या खातेदाराची पिक पाहणी करताना होम पेज वर ” खाते अपडेट करा ” हे बटन दिसेल त्यावर क्लिक करावे जेणेकरून खात्याची माहिती अद्यावत होईल. या प्रक्रियेसाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.

१२०. प्रश्न : संपुर्ण गावाचे खातेदारांची पीकपाहणी पाहता येते काय ?

उत्तर :- होय, तुम्ही त्या गावामध्ये ॲप मध्ये खातेदार म्हणून नोंदणी केली असल्यास, होम पेज वरील “गावाचे खातेदारांची पिक पाहणी” या बटनावर क्लिक करून गावातील इतर खातेदारांनी नोंदवलेली पिक पाहणी पाहू शकता.

१२१. प्रश्न : पिकाची माहिती भरून पुढे गेल्यानंतर गटा पासूनचे निर्धारित अंतर मिळवण्यासाठी काय करावे ?

उत्तर : गटा पासून निर्धारित अंतर मिळवण्यासाठी आपली GPS अचूकता १५ मीटरच्या आत असणे आवश्यक आहे.

१२२. GPS अचूकता १५ मीटरच्या आत आणण्यासाठी काय करावे ?

उत्तर : आपल्या मोबाईल मधील Settings मधील Location वर क्लिक करून खालील स्क्रीन शॉट मध्ये दाखविलेल्या “Emergency Location Services” व “Google Location Accuracy” बंद (off) करावे.

१२३. प्रश्न : नकाशा मध्ये गटापासूनचे अंतर लाल रंगात का दर्शविण्यात आले आहे ?

उत्तर : पिकांची माहिती भरल्यानंतर पुढे जा वर क्लिक करावे, क्लिक केल्यावर चित्रात दर्शविलेल्या स्क्रीन वर प्रविष्ट व्हाल त्यामध्ये निवडलेल्या गट क्रमांका पासूनचे अंतर ५० मीटर पेक्षा जास्त असल्यास लाल रंगात दर्शविले जाईल अश्यावेळेस आपणास पिकाचा फोटो घेता येणार नाही. आपण गटाच्या हद्दी पासून ५० मीटरच्या आत असणे आवश्यक आहे.

१२४. प्रश्न : इंटरनेट उपलब्ध नसल्यास गटाचा नकाशा दर्शविण्यात येईल काय ?

उत्तर : इंटरनेट उपलब्ध नसल्यास गटाचा नकाशा समोरील चित्राप्रमाणे दर्शविण्यात येईल गटाच्या हद्दीपसून निर्धारित केलेल्या अंतर (५० मीटर पेक्षा कमी) पर्यंत आल्यास गटा पासूनचे अंतर हिरव्या रंगात दर्शविण्यात येईल, त्यावेळी फोटो काढण्यासाठी पुढे जा वर क्लिक करून पिकाचा फोटो काढता येईल.

ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा (E Peek Pahani App): ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

ई-पीक पाहणी संबंधीत खालील महत्वपूर्ण लेख वाचा !

  1. ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  2. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार !
  3. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  4. ई-पीक पाहणी ॲपद्वारे कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  5. ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  6. ई-पीक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल ऑनलाईन कसा पाहायचा? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
  7. पिकांची नोंद करतानाच आता मिळणार जीआयएस नकाशा, एकाच ॲपमधून होणार नोंदणी !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.