वडिलोपार्जित संपत्ती बाबत मुलां-मुलींचा हक्क आणि कायदा
आपण या लेखामध्ये वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांप्रमाणे मुलींचा हक्क असतो का? असेल तर तो किती आहे? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. पूर्वी वडिलोपार्जित संपत्तीवर फक्त मुलांचाच अधिकार होता पण आता हिंदू वारसा (दुरुस्ती) कायदा आल्यामुळे मुलींना समान हक्क प्रदान करण्यात आला आहे. हा हिंदू वारसा (दुरुस्ती) अधिनियम 2005 (Hindu Succession (Amendment) Act 2005) मध्ये अस्तित्वात आला.
वडिलोपार्जित संपत्ती बाबत मुलां-मुलींचा हक्क आणि कायदा:
वडील हयात असोत किंवा नसो, मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तसेच न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना (Daughters) सुधारित कायद्याचे अधिकार लागू होतील.
मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क:
पूर्वी समाजामध्ये वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा मुलगाच मानला जातो. हिंदू कुटुंबांमध्ये मुलगा हाच घराचा कर्ता मानला जात असल्यामुळे 2005 आधी कायदा तसा होता. 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा झाली, त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे असे सांगण्यात आले.
20 डिसेंबर 2004 पूर्वी झालेली वाटणी ग्राह्य धरणार नाही:
जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी 20 डिसेंबर 2004 पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क नाही. कारण या प्रकरणात संपत्ती वाटपात जुने नियम लागू होतील. ही वाटणी रद्द करता येणार नाही.
हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजाला हा कायदा लागू:
या कायद्याचे नियम फक्त हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या समाजालाच लागू होतील असे या कायद्यामध्ये सांगण्यात आले आहे.
वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?
कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो.
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पत्नीचा हक्क:
वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पत्नीचा समान वाटा असतो. जसे कि जर कुटुंबामध्ये तीन मुलं असतील तर तिन्ही मुलांना आपल्या वारसाहक्काप्रमाणे एक तृतियांश संपत्ती मिळेल आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी होईल.
मुस्लीम समाजामध्ये वाटणी कशी होते?
मुस्लीम समाजामध्ये हिंदू समाजापेक्षा वाटणीची पद्धत जरा वेगळी आहे जसे कि जोपर्यंत त्या पिढीची अंतिम व्यक्ती जिवंत असते, तोपर्यंत त्या संपत्तीची वाटणी होत नाही.
वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे नियम पुढीलप्रमाणे:
जर आपल्याला आपली वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर त्याचे नियम खूप कडक आहेत, कारण या संपत्तीमध्ये अनेक हिस्सेदार असतात. त्यामुळे विकताना अनेक अडचणी येतात.
स्वतःच्या मर्जीने संपत्ती विकू शकत नाही:
जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी जर झाली नसेल तर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ती स्वतःच्या मर्जीने विकू शकत नाही.
कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणे गरजेचे:
जर वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणं आवश्यक आहे.जर संपत्ती विकण्यास सहमती नसेल तर ती संपत्ती आपण विकू शकत नाही.
दुसऱ्या पत्नीचा वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार असतो का?
हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करण्याची परवानगी पुरुषांना नसते. जर पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीर मानलं जातं. अशा स्थितीत दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क असतो, पण त्या व्यक्तीला वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीवर त्यांचा हक्क नसतो.
कमावलेल्या संपत्तीवर कुणाचा हक्क असतो?
जर तुमची संपत्ती वडिलोपार्जित नसेल, म्हणजेच ती तुम्हीच मेहनतीने कमावलेली असेल तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची, याचा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे. तुमच्या जिवंतपणी किंवा तुमच्या पश्चात ती संपत्ती तुम्ही कुणाच्याही नावे करू शकता.
जर मृत्युपत्र नसेल तर कायदा काय सांगतो?
यामध्ये वारसाहक्काने मिळालेली संपत्ती वगळता, जी तुम्ही कमवलेली संपत्ती आहे, त्या संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा हक्क असतो. जर त्या व्यक्तीचे आई-वडील जिवंत असतील आणि ते देखील त्यांच्यावर उपजिविकेसाठी निर्भर असतील तर त्यांना देखील त्यातून हिस्सा मिळतो.
तसेच जर माता-पितांना हिस्सा नको असेल तर त्यांची जबाबदारी स्वीकारणारा कोणताही वारसदार ती संपत्ती घेऊ शकतो. दिवाणी कायद्याच्या कलम 125 मध्ये देखभालीचा उल्लेख आहे. यानुसार त्या व्यक्तीवर अवलंबून असलेली पत्नी, आईवडील आणि मुलं त्या व्यक्तीच्या संपत्तीवर आपल्या उपजीविकेसाठी कायदेशीररीत्या दावा करू शकतात.
हेही वाचा – कुलमुखत्यार पत्र म्हणजे काय? कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे?
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
pls provide exact procedure
कायदा हा फक्त धर्मासाठी इतर धर्मा साठी नाही कायदा हा सर्व धर्मासाठी एक असावा फक्त हिंदु धर्मासाठी नसावा