दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध !
भारत निवडणूक आयोगाने जे ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग आहेत, अशा व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या ‘सक्षम – Saksham ECI App’ ॲपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham ECI App:
या ‘सक्षम – Saksham ECI App’ ॲपवर दिव्यांग मतदारांसाठी खालील विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
- दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध.
- नवीन मतदार नोंदणीसाठीची सुविधा उपलब्ध.
- मत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करणेची सुविधा उपलब्ध.
- मतदान केंद्र बदलाची सुविधा उपलब्ध.
- व्हील चेअरची विनंती करणेची सुविधा उपलब्ध.
- मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध.
- मतदान केंद्र जाणून घेणेची सुविधा उपलब्ध.
- तक्रारी नोंदविणेची सुविधा उपलब्ध.
- मतदान अधिकारी शोधणेची सुविधा उपलब्ध.
- बूथ लोकेटर स्थिती तपासणेची सुविधा उपलब्ध.
इतर सुविधा:
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व ठिकाणी मतदान केंद्र तळमजल्यावर असतील. तेथे पिण्याचे पाणी, प्रतिक्षा शेड, वैद्यकीय किट, सुलभ शौचालय, मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युत रोषणाई, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड. असतील.
मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध असणार आहे. अंध आणि अशक्त मतदारांच्या मतांची नोंद करण्यासाठी ईव्हीएम वर ब्रेल लिपीची व मदतनीसाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
सक्षम ॲपवर कोणती व्यक्ती नोंदणी करू शकतात?
सक्षम (Saksham ECI App) ॲपवर अंधत्व, अल्प दृष्टी, बहिरेपणा, कमी श्रवणशक्ती, शारीरिक व्यंग, मानसिक आजार (मानसिक सामाजिक अपंगत्व), कुष्ठरोग, बौद्धिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, बौनेत्व, मस्कुलर डिस्ट्रोफी, अॅसिड हल्ल्यातील बळी, भाषण आणि भाषेतील अपंगत्व, विशिष्ट शिकण्याची अक्षमता, ऑटिझम, स्पेक्ट्रम विकार, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि पार्किन्सन रोगासह क्रॉनिक न्यूरोलॉजिकल विकार, हिमोफिलिया, थैलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमियासह रक्त विकार आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती नोंदणी करू शकतात.
सक्षम ॲप (Saksham ECI App): सक्षम ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
खालील लेख वाचा !
- आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ !
- आचारसंहितेचे (Aachar Sanhita) उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा !
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर !
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- अंतिम मतदार यादी वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
- मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन !
- निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता…!
- निवडणूक उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड पूर्ववृत्तांसाठी Know Your Candidate ॲप सुरू !
- मतदारकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- जेष्ठ नागरिकांसाठी आता घरबसल्या मतदान करण्याची सुविधा !
- आता देशात कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी आरव्हीएम मतप्रणाली – RVM
- “एक देश, एक निवडणूक” च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !
- मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन !
- मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी 17+ वयोगटातील तरुणांना आगाऊ नोंदणीची सुविधा!
- घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ – Government Services Online
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!