वृत्त विशेषसरकारी योजना

पर्यावरणपूरक वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत ई रिक्षा वाटप लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरल्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल – Free eRickshaw) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक १०.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.

प्रस्तुत योजनेकरिता एकूण ४५,३८९ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावर करण्यात आले असून दिनांक १०.०६.२०१९ व दिनांक २७.०९.२०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणारे म्हणजेच १००% दिव्यांगत्वाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून ६६७ दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज वर्ग करण्यात येत आहे.

मोफत ई रिक्षा वाटप लाभार्थी यादी पहा ऑनलाईन ! Free eRickshaw:

पर्यावरणपूरक वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल – Free eRickshaw) मोफत ई रिक्षा वाटप लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी खालील पोर्टल ओपन करा.

https://evehicleform.mshfdc.co.in/

पोर्टल ओपन केल्यानंतर See Beneficiaries List पर्यायावर क्लिक करा.

पुढे check your beneficiary status मध्ये तुमचा विभागजिल्हा निवडून तुमचे नाव लाभार्थी यादी मध्ये तपासा.

हेल्पलाइन क्रमांक: +918035742016
हेल्पलाइन ईमेल: evehiclehelpdesk@gmail.com

पुढील लेख देखील वाचा!

  1. दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आता महा-शरद पोर्टलवर नोंदणी सुरु – Mahasharad Portal
  2. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप; कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार !
  3. दिव्यांगांच्या उपक्रम अनुदानासंबंधी शासनाचे धोरण जाहीर !
  4. UDID Card : दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य !
  5. मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन !
  6. पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना
  7. विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.