महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (MGNREGA Phalbag Lagwad Yojana) वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक शेतजमीनीवर फळबाग लागवड केली जाते.
मनरेगा योजनेंतर्गत फळबाग लागवड – MGNREGA Phalbag Lagwad Yojana:
लाभार्थी पात्रता:
- अनुसुचित जाती (Schedule Caste)
- अनुसुचित जमाती (Schedule Tribes)
- भटक्या जमाती (Nomadic Tribes)
- भटक्या विमुक्त जमाती (De-notified Tribes)
- दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे (Families below the poverty line)
- महिला प्रधान कुटुंबे (Women-headed households)
- शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे (physically handicapped headed households)
- भु-सुधार योजनेचे लाभार्थी ( benificiaries of land reforms)
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी (benificiaries under the Pradhan Mantri Awaas Yojana)
जे”अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार” पात्र व्यक्ती. (benificiaries under Schedule Tribes and other Traditionl Forest Dwellers )
उपरोक्त प्रवर्गामधील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, , कृषि कर्ज माफी योजना,2008 नुसार लहान शेतकरी [1 हेक्टरपेक्षा जास्त पण 2 हेक्टर (5 एकर) पर्यंत जमीन असलेले शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] व सीमांत शेतकरी [1 हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)]
कलमे / रोपे खरेदी कोठून करावीत:
1. कृषि विभागाच्या रोपवाटिका
2.कृषि विद्यापिठांच्या रोपवाटिका
3.खाजगी शासन मान्यता प्राप्त (पंजीकृत) रोपवाटिका
4.सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभाग रोपवाटिका.
5.शेतकऱ्यांनी कलमे / रोपे खरेदी करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.
योजनेत समाविष्ट फळपिके/वृक्ष:
1) आंबा रोपे 2) आंबा कलमे 3) आंबा कलमे (5 x 5) 4)काजू कलमे 5) काजू कलमे 6) चिकू कलमे 7) पेरु कलमे (6 x 6) 8) डांळिब कलमे 9) डांळिब कलमे (4.5 x 3) 10) संत्रा /मोसंबी/ कागदी लिंबू कलमे 11) संत्रा कलमे (3 x 3) 12) नारळ रोपे (बाणवली) 13) नारळ रोपे (टी.डी.) 14) बोर रोपे (5 x 5) 15) बोर रोपे (7 x7) 16) सिताफळ रोपे 17) सिताफळ कलमे 18) कागदी लिंबू रोपे 19 )आवळा रोपे 20)आवळा कलमे 21) चिंच कलमे विकसीत जाती 22) चिंच, कवठ व जांभुळ रोपे 23) कोकम रोपे 24) कोकम कलमे 25) फणस रोपे 26) फणस कलमे 27) अंजीर कलमे 28) सुपारी 29) पेरु कलमे(3 x 2) 30) बांबू रोपे 31 ) करंज व औषधी वनस्पती 32) साग रोपे 33) गिरीपुष्प रोपे 34) सोनचाफा 22) कडीपत्ता 35) कडूलिंब रोपे 36) सिंधी रोपे 37) शेवगा रोपे 38) हदगा रोपे (*औषधी वनस्पती – अर्जुन, असन, अशोका, बेहडा, बेल, हिरडा, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइरन, शिवण, गुग्गुळ, वावडिंग, बिब्बा रोपे इ.)
फळपिेनिहाय प्रती हेक्टरी मापदंड (मजूरी रु. 238/-) सोबत – मापदंड सोबत सहपत्रित करण्यात येत.
लागवड कालावधी – जून ते नोव्हेंबर.
अर्ज कुठे करावा– अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालयात करावा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!