स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना – Swami Vivekananda Student Assistance Scheme
विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय/विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमास ( विद्यापीठ परिपत्रक ३३/२०२४ मा क्र. सीबी/२५. वि. २१/०२/२०२४ अन्वये घोषित व्यावसायीक अव्यावसायीक अभ्यासक्रमाप्रमाणे प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत उपरोक्त शिष्यवृत्ती /अर्थसहाय्य योजना सुरू केलेल्या आहेत. सदर योजनांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात प्रवेशित विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्याकडून संबंधित महाविद्यालय/विद्यापीठ विभाग यांच्यामार्फत ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना – Swami Vivekananda Student Assistance Scheme:
विद्यार्थ्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते अशावेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून नव्याने सदर योजना सुरू केलेली आहे.
नियम व अटी:
१ सदर योजना व्यवसायिक व अव्यवसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार लागू राहील.
२. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या चारही विद्याशाखेतील प्रत्येकी आठ हजार विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार १,०००/- प्रमाणे एकूण ३२,००० विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
३. महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
४. विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील.
५. पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्नीग्रस्त भागातील विद्यार्थी म्हणून मा. प्राचार्य/विद्यापीठ विभागप्रमुख यांनी शिफारस करणे आवश्यक राहील.
६. विद्यार्थ्यांस या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही.
७. विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
८. विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे, उदा. बँकेचे नाव,पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
९. विद्यार्थ्यांनी आणि संबंधित प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :
वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनाकरीता विहित नियम व अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन (Online) पध्दतीने http://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक असून आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत Upload करावीत.
हेही वाचा – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना – Kranti Jyoti Savitribai Phule Financial Assistance Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!