भविष्य निर्वाह निधी – पीएफ देत आहे ७ लाख रुपयांचे विमा संरक्षण, जाणून घ्या सविस्तर माहिती ! EDLI – Employees’ Deposit-Linked Insurance Scheme
एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम ही एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) द्वारे सुरू केलेली जीवन विमा योजना आहे. ही योजना EPF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना जीवन विमा संरक्षण प्रदान करते.
नोकरी करणाऱ्या व्यक्त्तीवर स्वतःसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारीही असते. अशा व्यक्तींचे अकस्मात निधन झाल्यास कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळू शकतो. अशा स्थितीत विमा पॉलिसी याचा मोठा आधार ठरतो, भविष्य निर्वाह निधीत नियमित पैसे जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून विम्याचे संरक्षण दिलेले असते. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
भविष्य निर्वाह निधी – पीएफ देत आहे ७ लाख रुपयांचे विमा संरक्षण जाणून घ्या सविस्तर माहिती ! EDLI – Employees’ Deposit-Linked Insurance Scheme:
- ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना कर्मचारी ठेव लिक्ड विमा योजना (ईडीएलआय] दिली जाते. कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्या वारसाला योजनेतून ७ लाखांपर्यंत रक्कम दिली जाते.
- यासाठी कोणत्याही प्रकारे वेगळा प्रीमियम भरावा लागत नाही. कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोफत विमा योजना ठरते. योजनेतून कर्मचाऱ्याला आजारपण तसेच अपघातातही लाभ मिळू शकतात.
नियम व अटी:
- लाभ मिळण्यासाठी ती व्यक्ती असणे बंधनकारक असते.
- लाभाची रक्कम कर्मचाऱ्याच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या पगाराच्या आधारावर निश्चित होते.
- मृत्यू झालेला कर्मचाऱ्याच्या वारसाला शेवटच्या १२ महिन्यांच्या सरासरीच्या पगाराच्या ३० पट रक्कम अधिक २० टक्के बोनस दिला जातो.
- खातेधारकाच्या विमा संरक्षणातून लाभार्थी किमान २.५ लाख रुपये आणि कमाल ७ लाख रुपयांचा दावा करू शकतो.
दावा (Claim) कसा करावा?
- सदस्याच्या मृत्यूनंतर लाभ घेण्यासाठी फॉर्म ५ आयएफ भरावा लागतो.
- अर्ज नियोक्त्याच्या स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे.
- नॉमिनी घोषित नसेल तर कुटुंबातील हयात सदस्य लाभांचा दावा करण्यास पात्र असतात .
- कुटुंबातील कोणीही हयात नसेल तर, लाभ मृत सदस्याच्या कायदेशीर वारसाद्वारे दावा केला जाऊ शकतो.
- नियोक्ता नसल्यास अर्ज राजपत्रित अधिकारी, दंडाधिकारी, ग्रामपंचायत अध्यक्ष इत्यादीकडून प्रमाणित करून घ्यावा लागतो.
कर्मचारी ठेव-लिंक विमा योजना PDF डाउनलोड : कर्मचारी ठेव-लिंक विमा योजना सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – आपले ईपीएफ पासबुक (EPF Passbook) कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!