वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

आपल्या जमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळण्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं.जमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. आपण महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा, सरकारची ई-हक्क प्रणाली म्हणजे काय आहे, याचीच माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

सर्व प्रथम ई-हक्क प्रणाली म्हणजे काय आहे ते पाहूया.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने जमीनदारांना ऑनलाईन सुविधा पुरवण्याच्या हेतून ई-हक्क प्रणाली विकसित केली आहे. “ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून जमीनदार घरबसल्या 7 ते 8 प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात. यात सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे इत्यादी सेवांसाठी अर्ज करता येतो. तसंच अर्जाचं स्टेटसही चेक करता येतं.”

जमिनीचे वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:

जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खालील Property Registrationची वेबसाईट ओपन करा.

https://pdeigr.maharashtra.gov.in

आपल्या समोर ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावानं एक पेज ओपन होईल.

यावरील ‘Proceed to login‘ या पर्यायावर क्लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं login अकाऊंट सुरू करायचं आहे. त्यासाठी ‘Create new user‘ यावर क्लिक करायचं आहे.

आता ‘New User Sign Up‘ नावाचं नवीन पेज उघडेल. नवीन युजर अकाउंट Sign Up करण्यासाठी आपली सर्व Contact Information भरून सेव्ह बटन वर क्लिक करा.

त्यानंतर या पेजवर खाली ‘Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction.‘ असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला ‘Back‘ या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे.

User Login
User Login

7/12 Mutations वर क्लीक करा:

लॉगिन केल्यानंतर ‘Details‘ नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. यामध्ये जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘7/12 Mutations‘ वर क्लिक करायचं आहे.

7/12 Mutations
7/12 Mutations

तसेच तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर ‘User is Citizen‘ आणि बँकेचे कर्मचारी असाल तर ‘User is Bank‘ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर ‘Process ‘ या पर्यायावर क्लिक केल्या नंतर आपल्यासमोर ‘फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क’ नावाचे पेज ओपन होईल.

गावाची माहिती भरा:

इथे गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.

त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, “तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा,” असा मेसेज तुम्हाला दिसेल.

आपण हिथे वारस नोंद करायची असल्यामुळे आपण “वारस नोंद” हा पर्याय निवडणार आहोत.

गावाची माहिती
गावाची माहिती

टीप:- वारस फेरफार अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना आणि महत्वाच्या बाबी वाचून घ्या.

डेटा एंन्ट्रीबाबत सूचना : आपल्याला एकाच इंग्रजी कि-बोर्डच्या सहाय्याने इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत माहिती भरता येईल. वारसांची नावे भरणे किंवा नावावरुन खाते शोधणे ह्या फिल्ड मधील नावे देवनागरी लिपीतच असणे आवश्यक आहे. देवनागरी मधे माहिती भरावयाची असेल तर नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे. तसेच नावामध्ये काहीही दुरुस्ती असेल ती स्पेस बार देण्यापूर्वी करावी स्पेसबार दाबल्यानंतर दुरुस्ती करण्याकरीता संपूर्ण शब्द खोडून पुन्हा टाईप करावे लागेल. मराठी नाव भरल्यानंतर त्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग इंग्रजी नावात आपोआप येईल. आपल्याला इंग्रजी नाव पुन्हा टाईप करावे लागणार नाही.

महत्वाच्या बाबी –

१.कागदपत्रे जोडा करताना फाईल प्रकार-PDF आणि फाईल साईझ-300 KB पेक्षा कमी असावी

२.अर्जाची प्रत download करताना अर्जाची प्रत download होत नसल्यास –POP -UP -BLOCK ALWAYS ALLOW करावे

३.प्रत्येक टॅब करुन पुढे जा चे बटन दाबले कि तुमचा अर्ज जेवढा भरला गेलाय तेवढा सेव्ह होतो. कागदपत्रे जोडून झाल्यानंतर तो सबमिट बटन दाबल्यावर पूर्ण सेव्ह होतो. डॅशबोर्डवरील ‘Save as Draft’ बटनावर क्लिक केल्यास अपूर्ण अर्जांची यादी दिसेल त्यातील योग्य अर्जावर क्लिक करुन तो पूर्ण भरून सबमीट करता येईल.

४.एकदा ‘Submit’ झालेला अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार नाही

वारस फेरफार अर्ज भरा:

वारस नोंद” या पर्यायावर क्लिक केल्यावर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून ‘पुढे जा‘ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

वारस फेरफार अर्ज
वारस फेरफार अर्ज
  1. स्क्रीनवर आपला अर्ज मसूदा जतन केला आहे असा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल, या मेसेजखालील ‘ओके‘ बटनावर क्लिक करायचं आहे.
  2. त्यानंतर पुढे मयताचे नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे, सातबाऱ्यावरील खाते क्रमांक टाकायचा आहे.
  3. पुढे ‘खातेदार शोधा‘ या पर्यायावर क्लिक करून मयताचे नाव निवडायचं आहे.
  4. एकदा ते नाव निवडलं की संबंधित खातेदाराच्या नावे असलेला गट क्रमांक निवडायचा आहे.
  5. नंतर मृत्यू दिनांक टाकायचा आहे.
  6. त्यानंतर ‘समाविष्ट करा‘ या पर्यायावर क्लिक करून निवडलेल्या खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळेल.
  7. त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न तिथं विचारण्यात येईल. तुम्ही वारसांपैकी असाल तर होय, नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करून वारसांची नावे भरा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आता आपल्याला वारस म्हणून जी नावं लावायची आहेत, त्यांची माहिती भरायची आहे. यात नाव, वडील किंवा पतीचं नाव, आडनाव लिहायचं आहे. पुढे धर्म निवडायचा आहे, आपल्या धर्मानुसार वारस कायद्याचे नियम पाळले जातात. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहायचं आहे आणि मग जन्मतारीख टाकून आपले वय आपोआप तिथं येईल. पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल.

तसेच पोस्ट ऑफिस निवडून तालुका, गाव, घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाकून पुढे मयताशी असलेलं नातं निवडायचं आहे.

मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून – जे नातं असेल ते निवडायचं आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि मग वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता.

वरील सगळी माहिती भरून झाली की, साठवा या पर्यायावर क्लिक करा.

आता खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसासंदर्भात भरलेली माहिती तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचं नाव नोंदवायचं असेल तर तिथं असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आपल्या सगळ्या वारसांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि सर्व कागदपत्रे जोडायची आहे.

इथं तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे . ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहितीसाठी रेशन कार्ड जोडा. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारेही तुम्ही जोडा.

त्याचप्रमाणे एका कागदावर एक शपथपत्रं लिहून ते इथं जोडणं अपेक्षित असतं. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावं, त्यांचा पत्ता नमूद करणं गरजेचं असतं.

आपण सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तिथे फाईल अपलोड झाली असा मेसेज येईल. तसेच तुम्हाला तिथे एक स्वयंघोषणपत्र दिसेल.

“अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक / कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत.”

वरील आशयाचं हे पत्र असतं. सर्वात शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे/Agree या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वारस नोंदीसाठाचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केला जाईल. त्यानंतर तिथं या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नावं नोंदवली जातात.

हेही वाचा – गाव नमुना ६-क (वारसा प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6K

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • मंगलाबाई

    साहेब, माझे वडील अजून हयात आहे त्यांची वय शंभर आहे मी त्यांची मुलगी आहे त्यांना मुलगा नाही माझे पती वारले आहेत मी माझे वडील आणि आई यांचे देखरेख करत आहे आणि आमचे रेशन कार्ड पण वेगळे झालेले आहे तर मला वारस कसे लागता येईल कृपया मला माहिती देण्यात यावी

    Reply
    • मनोहर पांडे

      १) तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुम्ही वारस नोंद अर्ज तलाठ्याकडे करून तुमचे आणि तुमच्या आईचे नाव ७/१२ उताऱ्यावर लावून घ्यावीत.
      २) त्यांच्या जिवंतपणी सातबारा उतारा तुमच्या नावावर करायचा असेल तर त्यांच्याकडून तहसील किंवा कोर्टातून वाटप करून घ्यावे.
      ३) वरील दोन्ही पर्याय योग्य ठरतील. अन्यथा बक्षीस पत्र करू शकता.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.