वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी कामे

जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जन्म प्रमाणपत्र पहिले जन्म दिनांक व ठिकाण दाखविणारे महत्वाचे ओळखपत्र आहे. शासकीय विविध योजनांचा सेवा सवलतीचा फायदा घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र महत्वाचे ठरते. ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.

वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो.

वरील मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला नियमाप्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो. जन्म मृत्युची नोंद मुदतीत न केल्यास विलंब शुल्क पडते. म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण या लेखामध्ये जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:

जन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची”

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.

त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

लॉगिन
लॉगिन

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.

त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.

हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील “जन्म नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

जन्म नोंद दाखला
जन्म नोंद दाखला

त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “जन्म नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

जन्म नोंद दाखला – अर्जदाराची माहिती :

अर्जदाराची माहिती यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), जन्म तारीख, आधार क्रमांक, हि सर्व माहिती टाकायची आहे. व “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

अर्जदाराची माहिती
अर्जदाराची माहिती

समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल “तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला” आहे व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.

तसेच त्या मॅसेज मध्ये शुल्क भरा हा ऑपशन येईल, जन्म नोंद दाखला काढण्यासाठी २३.६० एवढे शुल्क आकारले जाते,ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit /Debit Card ,IMPS ,UPI या माध्यमातून भरू शकता.

शुल्क भरल्यानंतर तुम्हाला 5 दिवसातच जन्म नोंद दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.

हेही वाचा – मृत्यु नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर (Death Certificate)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.