ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची ? जाणून घ्या सविस्तर माहिती!
आपण या लेखामध्ये आपल्या गावातील ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन (Gram panchayat Beneficiary Report) कशी पाहायची त्याची सविस्तर माहिती घेऊया. ग्रामपंचायत लाभार्थी यादी (Gram panchayat Beneficiary Report) पाहायला तुम्हाला पंचायत समिती मध्ये किंवा ग्रामपंचायती मध्ये जाण्याची गरज नाही, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती पाहू शकता.
ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस – Gram panchayat Beneficiary Report:
ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन (Gram panchayat Beneficiary Report) पाहण्यासाठी सर्व प्रथम खालील नरेगाची वेबसाइट ओपन करा. हे तुम्ही मोबाईल मध्ये क्रोम वेबब्राउजर मध्ये ही करू शकता.
https://nrega.nic.in/Homepanch_new.aspx
वेबसाइट ओपन केल्यानंतर Panchayats(GP/PS/ZP) या ऑपशन वर क्लिक करा.
आता तुम्हाला खालील Panchayats मध्ये ग्रामपंचायती (Gram Panchayats), पंचायत समिती / ब्लॉक पंचायत / मंडळ(Panchayat Samiti/ Block Panchayat/ Mandal), जिल्हा पंचायत(Zilla Panchayats) पर्याय दिसतील त्यामध्ये ग्रामपंचायत वर क्लिक करा.
- ग्रामपंचायती (Gram Panchayats)
- पंचायत समिती / ब्लॉक पंचायत / मंडळ(Panchayat Samiti/ Block Panchayat/ Mandal)
- जिल्हा पंचायत(Zilla Panchayats)
ग्रामपंचायत (Gram Panchayat):
ग्रामपंचायत या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खालील विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये Generate Reports हा पर्याय निवडा.
- Data Entry – डेटा एंट्री
- Generate Reports -अहवाल तयार करा
- Authorize WageList By Panchayat Development Officer/Panchayat Secretary – पंचायत विकास अधिकारी / पंचायत सचिव यांनी वेजलिस्ट अधिकृत करा.
- Send WageList To Bank/PostOffice By Gram Pradhan/President – ग्राम प्रधान / अध्यक्षांद्वारे बँक / पोस्ट ऑफिसला वेजलिस्ट पाठवा.
त्यानंतर तुम्हाला आपलं राज्य निवडायचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या (MAHARASHTRA) नावावर क्लिक करा.
ग्रामपंचायत लाभार्थी अहवाल – Gram Panchayat Report:
राज्य निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी पाहिजे ते वर्ष निवडा, नंतर तुमचा जिल्हा, तालुका व गावाचे नाव निवडून Prossed या ऑपशनवर क्लिक करायचे आहे.
आता आपल्याला Gram Panchayat Reports मध्ये विविध पर्याय दिसतील त्यामध्ये ज्या योजनेची माहिती पाहिजे त्यावर क्लिक करा. आपण येथे R5 IPPE टॅब मध्ये List of work पर्यायावर क्लिक करून ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन (Gram panchayat Beneficiary Report) पाहू शकता.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Grampanchayt.pathrgav