विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त करून वीजपुरवढा चालू करण्यासाठी अशी करा ऑनलाईन तक्रार !
एखाद्या विद्युत् मंडलातील विद्युत् दाब बराच मोठा (कित्येक हजार व्होल्ट) व प्रवाही (बराच काही हजार अँपिअर) असल्यास त्यातील विद्युत प्रवाहाचे, दाबाचे आणि शक्तीचे मापन करण्यासाठी वापरावयाची उपकरणे त्या मंडलाशी विशिष्ट रोहित्राच्या द्वारे जोडतात, अशा रोहित्राला उपकरण रोहित्र म्हणतात. रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास (Transformer Power Failure Complaint) तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
वीजपुरवढा चालू करण्यासाठी अशी करा ऑनलाईन तक्रार ! Transformer Power Failure Complaint:
रोहित्र जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त रोहित्र (Transformer Power Failure Complaint) बसविण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. यामुळे माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत बिघडलेले रोहित्र बदलले जात आहे. तथापि, नादुरुस्त रोहित्राबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी महावितरण ॲपच्या माध्यमातून त्वरित माहिती (Transformer Power Failure Complaint) देऊन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळालेल्या रोहित्राच्या जागी दुरुस्त रोहित्र (Transformer Power Failure Complaint) बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त रोहित्राचा साठा तयार करणे, असे विविध उपाय केले आहेत. रोहित्र बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर रोज घेण्यात येत आहे.
या मोहिमेला यश आले असून महावितरणला रोहित्र बिघडल्याची (Transformer Power Failure Complaint) माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात रोहित्र बदलण्यात येत आहे. तथापि, रोहित्र जळाले आहे, हेच उशिराने समजले, तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे ग्राहकांनी ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती त्वरीत महावितरण ॲपवर द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्तीसाठी तक्रार करा! Transformer Power Failure Complaint:
विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त करून वीजपुरवढा चालू करण्यासाठी (Transformer Power Failure Complaint) खालील लिंक वरून महावितरण मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा पोर्टलला भेट द्या आणि तक्रार करा.
महावितरण ॲप – Mahavitaran App: महावितरण मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महावितरण ॲप किंवा महावितरण पोर्टल वरून तक्रार (Transformer Power Failure Complaint) करण्यासाठी आपल्याला लॉगिन असणे गरजेचं आहे, नसेल तर खालील ॲप किंवा पोर्टल वर जाऊन नोंदणी करणे गरजेचं आहे.
https://wss.mahadiscom.in/wss/wss
सर्व प्रथम खालील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट द्या, नंतर तुम्हाला इथे प्रवेश (Login) ऑप्शन दिसेल, प्रवेश (Login) वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचा अकाउंट असेल तर थेट लॉगइन करू शकता जर, तुमचा अकाउंट नसेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा डाव्या साईडला नवीन सदस्य नोंदणी (New User Registration) या नावावरती इथे क्लिक करायचे आहे आणि नोंदणी करा.
करताना तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे जो लाईट बिला वरती तुमच्या असेल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल, लॉगिन नाव आणि पासवर्ड टाकून सबमिट करायचा आहे.
नवीन सदस्य नोंदणी (Registration) झाल्यानंतर लॉग इन (Login) बटन वर क्लिक करायचे त्यांनतर Login Name, Password आणि Captcha टाकून Login करायचे आहे.
Login केल्यानंतर Add connection to my account मध्ये आपला ग्राहक प्रकार, ग्राहक क्रमांक, आणि बिलिंग युनिट नंबर कनेक्शन add करू शकता.
आता विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त करून वीजपुरवढा चालू करण्यासाठीची तक्रार करण्यासाठी होम पेज वर
मोबाईलवर महावितरण हे ॲप उघडा ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा (Report Transformer Failure)’ या बटणावर क्लिक करा.
पुढे “जोडणी निवडा” किंवा “निवड न करता पुढे” वर क्लिक करा. आपण इथे जोडणी निवडा वर क्लिक करून तक्रार (Transformer Power Failure Complaint) नोंद करणार आहोत.
आता आपल्याला ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर क्लिक करा-ट्रान्सफॉर्मरजवळची खूण कोणती आहे, कधीपासून रोहित्र बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची (Transformer Power Failure Complaint) माहिती भरा.
संबंधित ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा. नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा.
ट्रान्सफॉर्मरची तक्रार (Transformer Power Failure Complaint) नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्व्हरमध्ये होईल. तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल- ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाईल.
महाराष्ट्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची संपर्काची माहिती PDF फाईल:
महाराष्ट्र महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांची संपर्काची माहिती PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- राष्ट्रीय टोल-फ्री: १९१२ / १९१२०
- महावितरण टोल-फ्री: १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५
- ऊर्जा मंत्री हेल्पडेस्क: 9833717777 / 9833567777
- ईमेल: customercare@mahadiscom.in / helpdesk_pg@mahadiscom.in
या लेखात, आम्ही विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त करून वीजपुरवढा चालू करण्यासाठी ऑनलाईन (Transformer Power Failure Complaint) तक्रार कशी करायची? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- पीएम सूर्यघर योजना : मोफत वीज योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- टपाल विभागाच्यावतीने ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’साठी नोंदणी मोहीम सुरू !
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
- मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; ऑनलाईन अर्ज सुरु !
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना; घरगुती वीज जोडणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
- विद्युत पारेषण वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देणे बाबत शासन नियम !
- राष्ट्रीय/राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करण्याची कार्यपध्दत निश्चित !
- वीज बिल जास्त आले असेल तर काय करायचे? खराब मीटर बदलून नवीन मीटर कसा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे अधिकार
- महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करा आणि दरमहा वीजबीलामध्ये 10 रुपये वाचवा – MSEDCL Go Green Ebill Application
- महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती – Online Name Change Application MSEB
- महावितरणच्या वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? – Online Address Correction Application MSEB
- थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!