छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना – Chhatrapati Shivaji Maharaj krishi yojana
कृषी विभागामार्फत मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे योजनेस ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना’ असे नाव देण्यात येत आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
2023 -24 आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग, ठिबक/ तुषार सिंचन, शेततळे शेततळेच्या अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित योजनेस मान्यता देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त योजनेस नाव देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना – Chhatrapati Shivaji Maharaj krishi yojana:
राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणारा घटक / बाब त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठया प्रमाणावर फायदा होऊ शकतो. त्यामुळे मा. वित्त मंत्री महोदयांनी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेनुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येऊन मागेल त्याला फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देण्याबाबत मागेल त्याला शेततळे या योजनेच्या विस्तारित योजनेस संदर्भाधिन शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपुर्ती निमित्त मागेल त्याला फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे या विस्तारित योजनेस “छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना” असे नाव देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
कृषि विभागामार्फत सन २०२३ २४ करिता राबविण्यात येणाऱ्या “मागेल त्याला फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) आणि कॉटन श्रेडर देणे” या विस्तारित योजनेस या शासन निर्णयाव्दारे “छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना” असे नाव देण्यात येत आहे.
या शासन निर्णयाव्दारे फक्त मुळ योजनेस “छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना” असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे लागू राहतील.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय : सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता घोषित करण्यात आलेल्या मागेल त्याला फळबाग /ठिबक/ तुषार सिंचन/ शेततळे/शेततळयाचे अस्तरीकरण/ शेडनेट/ हरितगृह/आधुनिक पेरणीयंत्र (BBF) /कॉटन श्रेडर देणे या विस्तारित योजनेस छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना असे नाव देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!