महात्मा गांधी नरेगा योजने अंतर्गत वैयक्तिक सिचंन विहीर / बागायत लागवडच्या लाभासाठी ऑनलाईन मोबाईल ॲपवर अर्ज करा !
महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत पंचवार्षीक कृती आराखडा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये मुख्यतः गरीब कुटुंबांना वैयक्तिक लाभाच्या योजनाद्वारे गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मत्ता देऊन सुविधासंपन्न करून सर्वांगीण ग्राम समृद्धी करण्याच्या ध्यास रोहयो विभागाने घेतला आहे.
मनरेगा योजना राज्यामध्ये गतीने राबविण्यासाठी प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनाच्या कामांवर भर देण्यात येईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी सिंचन विहीरी, शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. तसेच फळबाग, वृक्ष लागवड, रेशीम (तूती) लागवड व बांबू लागवड या सारख्या कामांतून गरीब कुटुंबांसाठी स्थायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे.
मनरेगा योजनेअंतर्गत जास्ती जास्त नागरिकांनी सिंचन विहिरी व बागायत लागवडच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभरीत्या अर्ज करता यावा याकरिता मोबाईल (MAHA EGS Horticulture Well App) ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे.
या मोबाईल (MAHA EGS Horticulture Well App) ॲप्लिकेशनचा वापर करून जास्तीत जास्त लोकांनी मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर व बागायत लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
अर्जासाठी मोबाईल ॲप (MAHA EGS Horticulture Well App) : मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – मनरेगा संबंधित तक्रार आणि सुचना ऑनलाईन नोंदवा ! Register MNREGA related complaints and suggestions online!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
विहीर सिंचन