वृत्त विशेषनगरपंचायतनगरपरिषदसरकारी कामे

नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा मालमत्ता कर ऑनलाईन कसा भरायचा? जाणून घ्या सविस्तर !

मालमत्तेचे मालक होण्यासाठी एकरकमी रक्कम भरावी लागते, परंतु या मालमत्तेवर त्यांची मालकी टिकवण्यासाठी त्यांना मालमत्ता (Property Tax)  कराच्या रूपात सातत्याने लहान रक्कम भरावी लागते. म्हणून, मालमत्ता कर (Property Tax) हा मालमत्तेच्या मालकीवर लादलेला थेट कर आहे. मालमत्ता कर भरणे हे भारतातील विकास आणि नागरी संस्थांसाठी उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. अचल मालमत्तेच्या मालकांना वार्षिक आधारावर कर भरणे अनिवार्य आहे.

मालमत्तेचा मालक स्थानिक संस्था (उदाहरणार्थ, नगरपालिका) द्वारे आकारण्यात येणारा कर भरण्यास जबाबदार असतो आणि अशा कराला मालमत्ता कर म्हणतात. हा कर एका ठिकाणानुसार बदलू शकतो आणि इतर अनेक घटक आहेत जे देय मालमत्ता कराची रक्कम ठरवतात. आपण या लेखात नगरपरिषद किंवा नगरपंचायत मालमत्ता कर (Property Tax) ऑनलाईन कसा भरायचा? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नगरपरिषद किंवा नगरपंचायत मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची प्रोसेस – Property Tax Online:

नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा मालमत्ता कर (Property Tax) ऑनलाईन भरण्यासाठी खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन पेमेंट करा.

https://mahaulb.in/MahaULB/index

वरील पोर्टल ओपन केल्यानंतर सर्व प्रथम आपली मराठी भाषा निवडा.

आता ऑनलाईन पेमेंट या मुख्य मेनू वर क्लिक करून मालमत्ता बिल भरणा वर क्लिक करा.

Property Tax
Property Tax
मालमत्ता संग्रह भरणा

मालमत्ता बिल भरणा पेज ओपन होईल त्यामध्ये फ्लॅट नंबर (मालमत्ता क्रमांक) निवडा आणि सर्व माहिती तपासून घ्या आणि पुढे देय रक्कम, नाव, मोबाईल नंबर, ई – मेल आयडी, कॅप्चा कोड टाकून मालमत्ता कर (Property Tax) चे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी Pay वर क्लिक करा.

Property Bill Payment (Property Tax)
Property Bill Payment

मालमत्ता बिल भरण्यासाठी आपण नेटबँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड वापरू शकता, मालमत्ता बिल (Property Tax) भरल्यानंतर बिल भरल्याची पावती येईल ती डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर!
  2. जुना फ्लॅट, घर खरेदी केल्यास आता मालमत्ता कर थेट नावावर ; दस्त नोंदणीवेळीच सुविधा उपलब्ध !
  3. ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.