गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा
गांडूळ खत (Gandul Khat Yojana) /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजने बाबत सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-र्भातील पाणी साठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतःच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये निसर्ग संवर्धन करणे , पीक उत्पादनाचा खर्च कमी करणे, रासायनिक खते,कीटकनाशके ,तणनाशके व संप्रेरके या सारख्या घातक रसायनांचा पर्यायी अशा सेंद्रिय व जैविक निविष्ठाचा वापर वाढविणे हि काळाची गरज आहे. गांडूळ खत किंवा व्हर्मी कंपोस्ट हे शेतीतील काडी कचरा,वनस्पतीजन्य पदार्थ ,शेण यांच्यापासून गांडुळादवारे बनविले जाते. गांडूळ खतामध्ये विविध जिवाणू ,संजीवके व्हिटॅमिन आणि इतर उपयुक्त रसायने गांडूळ खतामध्ये असल्याने त्याच्या पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो .
याच बरोबर शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंग द्वारा प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने ,सूक्ष्म जीव तसेच गांडुळादवारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्यूमस सारखे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते. या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणात केला गेल्यास जमिनीचे आरोग्यात विशेष सुधारणा होऊन, कृषी उत्पादनात फार मोठी भर पडेल. शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रिय खत तयार करून,परत शेतात टाकणे हि काळाची गरज आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस व जलधारणा शक्ती वाढून पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. या अनुषंगाने सदरची बाब विचारात घेऊन गांडूळ खत उत्पादन युनिट आणि नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट हे वैयक्तिक लाभाचे घटक राबविणे प्रस्तावित आहे.
गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट योजना – Gandul Khat Yojana:
उद्दिष्टे:
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गावसमूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
- पौष्टिक अन्नधान्याचे उत्पादन करणे.
- नैसर्गिक घटकांना हानी न पोहोचविता त्यांचा योग्य वापर करून शेती करणे.
- जमिनीची सुपीकता वाढविणे व ती दीर्घकाळ टिकविणे.
- स्थानिक स्त्रोताचा पुनर्वापर शेतीमध्ये करणे.
- शेतीचा उत्पादन खर्च कमी करुन शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ करणे.
लाभार्थी निवडीचे निकष:
- प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/जमाती, महिला , दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात यावा.
- ज्या शेतकऱ्याकडे गांडूळ खत उत्पादन युनिट , नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट उभारण्याकरिता जागा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
- ज्या शेतकऱ्याकडे गांडूळ खत उत्पादन युनिट, नॅडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट उभारल्यानंतर ते व्यवस्थित सुरु राहण्यासाठी किमान दोन पशुधन उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा.
- इतर कोणत्याही योजनेतून या घटकाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ देण्यात येऊ नये.
पोकरा अंतर्गत ऑनलाईन अर्ज करा – Apply Online Gandul Khat Yojana:
इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
अर्थसहाय्य:
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणाऱ्या गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट हे वैयक्तिक लाभाचे घटकासाठी अनुज्ञेय अनुदानाचा तपशील माहिती करिता इथे क्लिक करा.
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!