हरितगृह/शेडनेटगृह उभारणी योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा !
आपण या लेखात हरितगृह/शेडनेटगृह उभारणी (Shednetgruh Yojana) योजने विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-र्भातील पाणी साठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतःच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
हरितगृह/शेडनेटगृह उभारणी योजना – Shednetgruh Yojana:
फलोत्पादन क्षेत्रात संरक्षित शेती पध्दतीचा अवलंब केल्याने फुलपिके व भाजीपाला पिकाचे अधिक उत्पादन, उत्पादकता व उच्च दर्जाचे उत्पादन मिळून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते. फुलपिके ,भाजीपाला व रोपवाटीकांसाठी शेतकरी हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह (Shednetgruh Yojana) इत्यादींचा वापर करतात. हरितगृह व शेडनेटगृहाच्या (Shednetgruh Yojana) वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे योग्य गुणवतेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये अधिक चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह (Shednetgruh Yojana) शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतात.
योजनेचा उद्देश:
I. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या 15 जिल्ह्यातील निवडलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
II. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक सहाय्य करणे .
III. ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
IV. फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासाठी व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
लाभार्थी निवडीचे निकष:
1. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी (एकूण भूधारणा २.०० हे. पर्यंत ) या घटकासाठी पात्र राहतील.
2. यापूर्वी शासनाच्या इतर योजनामधून या घटकाचा लाभ घेतलेला असल्यास एकत्रित लाभ ४० गुंठ्याच्या मर्यादेत देता येईल.
अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या:
लाभार्थी शेतकरी
1. इच्छूक शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर किंवा DBT APP द्वारे नोंदणी करून ऑनलाईन अर्ज सादर करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
2. ग्राम कृषी संजीवनी समितीची (VCRMC) मान्यता असलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांमधील अनु. जाती, अनु. जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड झालेल्या लाभार्थ्याने राष्ट्रीय काढणीपश्चात हाताळणी प्रशिक्षण संस्था, तळेगाव दाभाडे, जि. पुणे (NIPHT) येथे नियोजित प्रशिक्षण घेऊन त्या बाबतचे प्रमाणपत्र अनुदान मागणीकरणेपूर्वी प्राप्त करणे अनिर्वाय राहील.
3.अपवादातमक परिस्थितीत पूर्व संमती प्राप्त शेतकरी स्वत: प्रशिक्षण प्रदीर्घ आजारपण, वयोरुद्ध ,अपंगत्व यांसारख्या गंभीर कारणामुळे जाऊ शकत नसल्यास त्याने प्राधिकृत केल्यास इतर सक्षम व्यक्तीस प्रशिक्षणासाठी पाठवता येईल.
4. मार्गदर्गक सूचनेनुसार दिलेल्या आराखड्याप्रमाणे (Design) व तांत्रिक निकषाप्रमाणे BIS मानांकनाचे साहित्य वापरुन अंदाजपत्रक तयार करून घेणे. व त्यानुसार उभारणी करणे बंधनकारक राहील. पूर्वसंमती पत्रामध्ये दिलेल्या मॉडेलनिहाय अनिवार्य साहित्य वापरणे बंधनकारक राहील.
5. पूर्वसंमती दिलेल्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत काम पूर्ण करावे.
6. उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादाराकडून मार्गदर्गक सूचनांमधील आराखड्यानुसार व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्याचा वापर करुन उभारणी केलेली असल्याबाबत प्रमाणपत्र घ्यावे व ऑनलाईन अपलोड करावे.
7. पायासाठी खड्डे खोदकाम झालेनंतर व उभारणी साहित्य प्रकल्प स्थळी पुरवठा झाल्यानंतर संबंधीत कृषी सहाय्यक /समूह सहाय्यक याना कळविणे बंधनकारक राहील.
8. प्रकल्प उभारणी/लागवड झाल्यानंतर ऑनलाईन अनुदान मागणी करून सेवा पुरवठादाराकडील मूळ बिले , प्रशिक्षण प्रमाणपत्राची छायांकित प्रत शेतकऱ्याने स्वत:ची स्वाक्षरी करुन साक्षांकीत करून संकेतस्थळावर अपलोड करावीत.
9. प्रकल्प स्थळी कायम स्वरुपी लोखंडी फलक लावून त्यावर “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अर्थसाहाय्याने ”असे नमूद करुन शेतकऱ्याचे नाव, गाव , सर्वे नं., हरितगृह /शेडनेटगृहाचे (Shednetgruh Yojana) आकारमान, योजना, वर्ष , एकूण खर्च रक्कम, अर्हसहाय्याची रक्कम, इत्यादी तपशील नमूद करावा.
हरितगृह/शेडनेटगृह उभारणी (Shednetgruh Yojana) योजनेच्या अधिक माहिती करिता इथे क्लिक करा.
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!