महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायतीचे काम कसे चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसे ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती

आपण निवडून दिलेली माणसं व्यवस्थित काम करत आहेत की नाहीत, हे कसं कळेल? आपण आपल्या गावाच्या विकासात कशाप्रकारे हातभार लावू शकतो? आपण या लेखात आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे काम कसं चालते? (Gram Panchayat Works) ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

ग्रामपंचायतीचे काम कसं चालते? Gram Panchayat Works:

ग्रामपंचायतीच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एकूण चार प्रकार पडतात, या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे काम (Gram Panchayat Works) चालत असते.

१) पगारी कर्मचारी:

पगारी कर्मचारी मध्ये जिल्हा निवड समिती या कर्मचाऱ्यांची निवड करते आणि राज्य सरकार त्यांना पगार देतं असते. यामध्ये ग्रामसेवक जे ग्रामविकासाची काम करत असतात, तसेच तलाठी जे महसूलाशी संबंधित कामे करत असतात, यांचा समावेश पगारी कर्मचारी मध्ये होतो.

२) मानधन कर्मचारी:

मानधन कर्मचारी मध्ये कर्मचाऱ्यांना गावात ज्या काही विशिष्ट योजना राबवल्या जातात, त्यासाठी मानधन मिळते. यामध्ये अंगणवाडी सेविका, त्यांच्या मदतनीस, पोलीस पाटील, कोतवाल, यांचा समावेश होतो. आता या कर्मचाऱ्यांना त्यांचे -त्यांचे विभाग मानधन देत असते. जसे कि पोलीस पाटील यांना गृहविभाग तर कोतवालांना महसूल विभाग मानधन देत असते.

३) स्वयंप्रेरित कर्मचारी:

या मध्ये जे काम करतात त्याना पगार किंवा मानधन दिले जात नाही. गावातल्या एखाद्या कामासाठी स्वतः पुढाकाराने ते काम करत असतात, जेवढे काम तेवढा मोबदला त्यांना दिला जातो, यामध्ये आशा वर्कर, रोजगार सेवक यांचा समावेश होतो.

४) ग्रामपंचायत कर्मचारी:

यामध्ये ग्रामपंचायत मधील शिपाई, दिवाबत्ती, पाणीपुरवठा कर्मचारी, लिपिक, सफाई कर्मचारी यांचा समावेश होतो.

आता हिथे गावच्या लोकसंख्येनुसार किती कर्मचारी नेमायचे, त्यांना कोणत्या स्वरूपाचे काम द्यायचे हे निर्णय गावाने घ्यायचा असतो.

जे पगारी कर्मचारी आहेत त्यांची त्या गावात वास्तव्य करणे आवश्यक असते, त्यासाठी त्यांना प्रति महिना ११७५ रुपये घरभाडे आणि १००० रुपये प्रवास खर्च दिला जातो. पण अनेकदा अशी तक्रार केली जाते कि ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकच उपस्थित नसतात अशावेळी सामान्य माणूस काय करू शकतो, एक म्हणजे गावात कोणते कर्मचारी राहतात आणि कोणते कर्मचारी राहत नाहीत यात वर्षातून एकदा ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घ्यावा लागतो. जर एकदा कर्मचारी गावात राहत नसेल तर त्याला घर भाडे दिल जात नाही.

प्रत्येक शासकीय कार्यलयाप्रमाणे ग्रामपंचायतिचे एक हालचाल रजिस्टर असते. या रजिस्टर मध्ये ग्रामसेवक किती वाजता कार्यलयात आले ती वेळ आणि त्यामध्ये सही करणे अपेक्षित असते. मधल्या वेळेत जर ते बाहेर जाणार असतील तर ती वेळ त्या रजिस्टर मध्ये नमूद करावे लागते. समजा आपण ग्रामपंचायत मध्ये काही कामा निमित्त गेलो आणि जर तिथे ग्रामसेवक नसतील तर आपण हालचाल रजिस्टर पाहू शकतो, आणि ते नेमके कुठे गेलेत ते पाहू शकतो.

ग्रामपंचायत सदस्यांना मानधन किती?

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना प्रत्येक बैठकीसाठी बैठक भत्ता म्हणून 200 रुपये सरकार कडून दिले जातात. यासाठी जे पैसा सरकार देते तो ऍडव्हान्स म्हणून ग्रामपंचायतीना दिला जातो, म्हणजेच बैठक झाल्यानंतर बैठक भत्ता सदस्यांच्या बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असते.

सरपंच उपसरपंच मानधन:

सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनातील 75 टक्के रक्कम राज्य सरकार तर 25 टक्के रक्कम ग्रामपंचायतीने स्वनिधीतून देणे अपेक्षित असते. ग्रामपंचायतीची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंच यांना खालीलप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारीसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये)सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कमउपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती६,०००/-२,०००/-४,५००/-१,५००/-
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती८,०००/-३,०००/-६,०००/-२,२५०/-
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती१०,०००/-४,०००/-७,५००/-३,०००/-

विकास कामात कसं सहभागी व्हायचं?

गावातील ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात (Gram Panchayat Works) स्वतः सहभागी होणे अपेक्षित असते.

1) गावात वर्षभरात किमान ४ ग्रामसभा घेतल्या जातात. ग्रामसभेला नियमितपणे उपस्थित राहून तुम्ही गावाच्या विकासासंदर्भातील तुमच्या संकल्पना, मतं मांडू शकता.

2) गावात वेगवेगळ्या ग्रामविकास समित्या असतात, जसं कि रेशन दक्षता समिती, शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम आरोग्य समिती, ग्राम पाणीपुरवठा, स्वछता, पोषण आहार समिती इत्यादी असतात. तुम्ही या समित्यांमध्ये भागीदारी करू शकता आणि गावाच्या विकासकामांत लक्ष घालू शकता.

3) नियमितपणे पाणीपट्टी, घरपट्टी असे कर भरून गावाच्या विकासात हातभार लावता येऊ शकतो.

विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं?

ग्रामपंचायतीमध्ये कर भरला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही गावातल्या विकासकामांवर लक्ष (Gram Panchayat Works) हि ठेवू शकता, त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

1) ग्रामसभेच्या दोन दिवस आधी तुम्ही आपला लेखी स्वरूपातील प्रश्न ग्रामपंचायतीला देऊन, त्याची पोचपावती घेऊ शकता. ग्रामसभेत लेखी स्वरूपात प्रश्न विचारलेत, तेंव्हाच तो प्रश्न आणि त्याच उत्तर प्रोसिडिंगमध्ये किंवा सभेच्या नोंदवहीमध्ये नोंदवला जातो. तोंडी विचारलेला प्रश्न प्रोसिडिंगमध्ये घेतला जात नाही.

2) जर गावातील कुठल्या कामाविषयी शंका किंवा प्रश्न आल्यास, तुम्ही माहितीचा अधिकार म्हणजेच RTI चा वापर करून त्या कामसंबंधीची माहिती मागवू शकता.

3) तुम्ही नियमितपणे कर भरत असाल तर दरवर्षी ग्रामपंचायतीला जमाखर्चाचे पत्र मागू शकता. वर्षभरात ग्रामपंचायतिकडे किती पैसा आला, तो कुठून आला आणि ग्रामपंचायतीने तो कशावर खर्च केला, याबाबतच्या जमाखर्चाचे पत्र ग्रामपंचायतीने कर भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला देणे बंधनकारक असते.

4) आपल्या गावाचे रिपोर्ट कार्ड तुम्ही केंद्र सरकारच्या “ई-ग्राम स्वराज” या मोबाईल अप्लिकेशनद्वारे किंवा वेबसाईटद्वारे पाहू शकता. यामध्ये सरकारने वेगवेगळ्या योजनांसाठी आपल्या गावाला किती निधी दिला आणि ग्रामपंचायतीने तो कुठे खर्च केला, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

हेही वाचा – आपल्या गावासाठी सरकारने दिलेला निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर लक्ष कसं ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “ग्रामपंचायतीचे काम कसे चालते? सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मानधन किती? ग्रामस्थ म्हणून गावच्या विकास कामात कसं सहभागी व्हायचं आणि विकासकामांवर लक्ष कसे ठेवायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • औटी श्रीराम महादेव

    ग्रामपंचायत कर्मचारी यांची कामे काय आहेत माहीती पाठवा दीवाबत्ती पाणीपुरवठा शिपाई यांचा जी पी एफ कसा जमा केला जातो माहीती द्या.

    Reply
    • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य; कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती आणि पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे पाहायचे? सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

      Reply
  • सुनील

    ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच असू शकतात का

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.