वृत्त विशेषसरकारी कामे

पोलीस महासंचालक कार्यालयामधील दस्ताऐवजांची वर्गवारी ! Classification of documents in the office of the Director General of Police

महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट 2005 मधील महत्वाची तरतूद. सदर कायद्यातील 4, 8 व 9 कलमे महत्वाची आहेत. सरकारी फाईल गहाळ होणे, ती सरकारी नियमानुसार डिस्ट्रॉय न करणे हे सर्व सदर कायद्यातील कलम 9 नुसार गंभीर अपराध असून 5 वर्षे कारावास व दंड अशी शिक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालय श्री विवेक विष्णुपंत कुलकर्णी विरुद्ध Maharashtra State writ petition no 6961/ 2012 decision Dt 27 February 2015 नुसार नगर विकास मंत्रालय मुंबई येथील अधिकाऱ्यां विरुद्ध रेकॉर्ड गहाळ प्रकरणी उपरोक्त कायद्याच्या कलम 9 प्रमाणे गुन्हा दाखल करुन एफआयआर दाखल झाले पासून 6 महिन्यात तपास पूर्ण करणे बाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयामधील दस्ताऐवजांची वर्गवारी:

अ. क्र. जतन कालावधीतपशिल
1स्थायी आदेश नस्तीकायमस्वरूपी
2केंद्र शासन / राज्य शासनाने प्रसृत केलेले अधिनियमकायमस्वरूपी
3अधिनियमाचे नियम व अन्वयार्थकायमस्वरूपी
4वार्षिक पोलीस प्रशासन अहवालकायमस्वरूपी
5अखिल भारतीय परिषद/ परिषद/समिती/ बैठकांचे महत्वपूर्ण आदेशकायमस्वरूपी
6इमारतीच्या बांधकामाच्या जागाबाबतचा पत्रव्यवहारकायमस्वरूपी
7इमारतीच्या बांधकामानंतरचा हस्तांतरण पत्रव्यवहारकायमस्वरूपी
8पाच वर्षिय योजनाकायमस्वरूपी
9तपासणी / निरीक्षण बाबतचे परिपत्रकेकायमस्वरूपी
10महालेखाकारांकडील सर्व सामान्य परिपत्रकेकायमस्वरूपी
11महाराष्ट्र सिव्हिल लिस्टकायमस्वरूपी
12अखिल भारतीय सिव्हिल लिस्टकायमस्वरूपी
13विविध दर्जाच्या अधिका-यांना अधिकार बहाल करताना शासनाकडील पत्रव्यवहारकायमस्वरूपी
14कार्यकारी / लिपिक संवर्गातील संख्याबळ मंजूरीबाबतची पत्रव्यवहारकायमस्वरूपी
15विभाग / कायदा / भाषा विषयीच्या परिक्षा विषयीचा निर्णय आणि पत्रव्यवहारकायमस्वरूपी
16केंद्र व राज्य शासनाची राजपत्रेकायमस्वरूपी
17महाराष्ट्र राज्य पोलीस पत्रककायमस्वरूपी
18महत्त्वाचे आदेश / अन्वयार्थ आणि कार्यपध्दतीबाबतच्या शासन निर्णय व परिपत्रकांबाबतचा पत्रव्यवहारकायमस्वरूपी
19विविध दर्जाच्या अधिका-याच्या ज्येष्ठता सूची तसेच लिपिक वर्गीयांचा ज्येष्ठता सूचीकायमस्वरूपी
20अखिल भारतीय पोलीस सेवेतील अधिका-याचा सेवा विषयक इतिहास (केंद्र शासन प्रसृत)कायमस्वरूपी
21पोलीस अधिका-याचा सेवा विषयक इतिहास (राज्य शासन प्रसृत)कायमस्वरूपी
22अतंर जिल्हा स्पर्धेबाबतची महत्त्वाची परिपत्रकेकायमस्वरूपी
23क्रिमिनल लॉ जर्नल / इंडिया लॉ रिपोस्टर्स / मा. उच्च न्यायालयातील न्याय निवाडयाबाबतचे लॉ रिपोस्टर्सकायमस्वरूपी
24मा. राष्ट्रपतीचे पोलीस पदक / पोलीस पदक इत्यादह प्रदान करण्या विषयीचे नियमकायमस्वरूपी
25मोटार परिवहन विभागातील खरेदी, पदनिमित्ती आणि इतर सर्व महत्त्वाच्या समस्यां विषयक नियमावलीकायमस्वरूपी
26वेतन व भत्ते विषयक वेतन श्रेणी निश्चित करणेकायमस्वरूपी
27पोलीस कॅल्ब आस्थापने विषयक पत्रव्यवहारकायमस्वरूपी
28नव्याने पोलीस ठाण्याची व दूरक्षेत्राची निमित्ती अथवा पोलीस ठाणे / दूरक्षेत्रे रद्द करण्याबाबतचा पत्रव्यवहारकायमस्वरूपी
29पोलीस कल्याणकारी उपक्रमांबाबतचे महत्त्वाचे आदेशकायमस्वरूपी
30अभिलेखाची कालमर्यादा ठरवण्याबाबतचे आदेशकायमस्वरूपी
31दंगे व अशांतते बाबतच्या प्रतिबंधक योजनाकायमस्वरूपी
32मंजूर संख्याबळात वाढ करणे अथवा बदल करणेकायमस्वरूपी
33पुनर्रचनेबाबतचे आदेश आणि मनुष्य बळ व साधन सामुग्रीचा पुरवठाकायमस्वरूपी
34विहीत मागणीपत्रे आणि त्याबाबतचा पत्रव्यवहारकायमस्वरूपी
35राज्य राखीव पोलीस बल गटाच्या निमित्ती, कर्तव्ये / राज्याबाहेरील प्रतिनियुक्ती व इतर समस्याकायमस्वरूपी
36महामार्ग सुरक्षा बाबातच्या मनुष्य बळ कमी करणे / वाढविणे आणि इतर समस्याकायमस्वरूपी
37लेखन सामुग्रीबाबतची विहित मागणी पत्रे आणि त्याबाबतचा पत्रव्यवहारकायमस्वरूपी
38दुरध्वनी बसविण्याबाबतचा पत्रव्यवहारकायमस्वरूपी
39मा. राष्ट्रपती / मा. प्रतंप्रधान व इतर अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या संरक्षण विषयक पत्रव्यवहारकायमस्वरूपी
40अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या दौ-या दरमानच्या सुरक्षेतबाबतचा योजनाकायमस्वरूपी
41प्रशिक्षणाबाबतचे आदेशकायमस्वरूपी
42गणवेषांतील बदलण्याबाबतचे प्रश्नकायमस्वरूपी
43ग्रांम संरक्षक योजनाकायमस्वरूपी
44बिनतारी संदेश क्षेत्रातील मनुष्य बळ / सामुग्री खरेदी / सामुग्री वापर आणि इतर महत्त्वाच्या समस्याकायमस्वरूपी
44 अपदनिर्मिती / श्रेणी वाढ / अस्थायी पदाना मुदत वाढ घेणे/ अस्थायी पदांचे स्थायीकरण करणे / पुनर्रचना इ. बाबतच्या नस्तीकायमस्वरूपी
45लिपिक वर्गीयांची गैरहजर विवरण पत्रे२ वर्ष
46लेखा संकिर्ण पत्र व्यवहार३ वर्षे
47महत्वपुर्ण वस्तुचा पुरवठा व मागणी पत्राबाबतचा साजसरंजाम५ वर्ष
48कायम स्वरूपी मनुष्य बळात तात्पुरती वाढ३० वर्ष
49मुंबई पोलीस कायद्याअन्वये शिक्षापाठ५ वर्ष
50इतर राज्याचे वार्षिक पोलीस प्रशासन अहवाल५ वर्ष
51इतर खात्याचे व जिल्ह्या पोलीस प्रशासन वार्षिक प्रशासन अहवाल३ वर्षे
52विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केलेले वार्षिक पुर्नविलोकन३ वर्षे
53विविध प्रकारचे अग्रीम५ वर्ष
54भविष्य निर्वाह निधीची मंजूरी३ वर्षे
55अखिल भारतीय परिषद / आयोग / समिती/ बैठकांबाबतचा संकिर्ण व्यवहार३ वर्षे
56शस्त्रे दारू गोळा यांचे मागणी पत्रक आणि पत्र व्यवहार५ वर्ष
57शस्त्रे दारू गोळा यांचे संकिर्ण संदर्भ१ वर्ष
58लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि गुप्तवार्ता यांचे संकिर्ण पत्रव्यवहार५ वर्ष
59बडतर्फीी, पदावनती, निलंबन व दंड इ. बाबतचे अपिल५ वर्ष
60कार्यकारी व मंत्रालयीन कर्मचारी यांचे अर्ज१ वर्ष
61हत्यारांच्या पुरवठ्याबाबतचा पत्रव्यवहार१० वर्ष
62हत्यारांचे वापराबाबतचा तपशिल व पत्रव्यवहार१० वर्ष
63हत्यारांचे मागणीपत्र व पत्रव्यवहार५ वर्ष
64पोलीसांच्या हत्याराबाबतचा पत्रव्यवहार१० वर्ष
65अनुक्रमांक ६१ ते ६४ बाबतचा संकिर्ण पत्रव्यवहार२ वर्ष
66शस्त्रे व दारू गोळा नियतकालीन विवरण पत्र व पत्र व्यवहार२ वर्ष
67पुस्तकांविषयीचा पुरवठा व पत्र व्यवहार२ वर्ष
68पुस्तकांविषयीची नोंदवही१ वर्ष
69पोलीसांविषयीची अंदाज पत्रकाचे प्रस्ताव व परिशिष्ठे५ वर्ष
70घटक प्रमुखाने अंदाज पत्रकाविषयीचे पत्रव्यवहार१ वर्ष
71अंदाज पत्रकीय अनुदानाची मागणी१ वर्ष
72मंजूर अनुदानाविषयीचा महालेखाकाराची विवरण पत्रे३ वर्षे
73राज्य शासनाचे नागरी अंदाज पत्रक व त्यावरील टिपणी३० वर्ष
74गौण व प्रमुख बांधकामाविषयीचे (पुर्ण झाल्यानंतर)१० वर्ष
75किरकोळ बांधकाम / डागडुजी विषयी३ वर्षे
76इमारती अथवा खोल्या भाडेतत्वावर देण्याविषयी (करारानंतर )३ वर्षे
77रेल्वे प्रशासनाच्या इमारती रेल्वे पोलीसांच्या ताब्यात असल्याबाबतचा पत्रव्यवहार१० वर्ष
78नैमित्तिक रजा नोंदवही व त्याबाबतची कागद१ वर्ष
79पोलीस निरीक्षक / सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उप निरीक्षक यांना सेवामुक्त / सेवानिवृत्त / खात्यातून काढून टाकल्यानंर त्यांच्या मुळ नियुक्तीची प्रमाणपत्रेकार्यवाही नंतर ताबडतोब नाश करावी
80कापड पुरवठ्याची मागणी व पत्रव्यवहार५ वर्ष
81कार्यालयीन शिपायांना गणवेश पुरवठा५ वर्ष
82नेमबाजी स्पर्धा विषयीचे वार्षिक अहवाल१ वर्ष
83नेमबाजी स्पर्धा विषयीचे निकाल पत्रक आणि नेमबाजी स्पर्धे विषयीचा पत्रव्यवहार२ वर्ष
84पोलीस अधिकां-याविषयीच्या तक्रारी२ वर्ष
85पोलीस अधिका-यांविरुध्दची गोपनीय पत्रे६ महिने आणि मोठ्या अथवा शिक्षेच्या घटनामध्ये १० वर्ष
86इतर संकिर्ण गोपनीय पत्रे३ वर्षे
87आकस्मिक खर्च व त्या विषयीचे देयके, नोंदवह्या आणि प्रमाण५ वर्ष
88करार अनुदानाची निश्चिती१ वर्ष
89गुन्ह्याच्या तपासविषयक अर्ज१ वर्ष
90मासिक गुन्हें अहवाल४ वर्ष
91हजेरीपट व हजेरी अहवाल२ वर्ष
92स्थायी अग्रीम व इतर रोजकिर्द५ वर्ष
93जडसंग्रह वस्तुबाबतचे वार्षिक अहवाल व यादी आणि त्या विषयीचा पत्रव्यवहार१ वर्ष
94जडसंग्रह वस्तुची कालब्राह्मता५ वर्ष
95जडसंग्रह वस्तुबाबतची परिक्षेत्राकडून प्राप्त झालेली वार्षिक प्रमाणपत्रे१ वर्ष
96शासकिय रकमेची अफरातफर, लबाडी आणि नुकसानीबाबतची प्रकरणे३० वर्ष
97परकीय सेवेतील प्रतिनियुक्तीबाबतचा पत्रव्यवहार३० वर्ष
98जावक पुस्तक२ वर्ष
99पोलीस खात्यातील बडतर्फी बाबतची प्रकरणे५ वर्ष
100पोलीस ठाणे / दुरक्षेत्रातील मनुष्यबळाचे वाटप२ वर्ष
101कवायत व निशानबाजी बाबतची प्रकरणे२ वर्ष
102विशिष्ठ प्रकारची साधन सामुग्रीचा वापर१० वर्ष
103विशिष्ठ प्रकारची साधन सामुग्रीचा वापराबाबतचा संकिर्ण पत्रव्यवहार व नियतकालीके२ वर्ष
104पोलीस संरक्षण व पहारा बाबतची नियमावली१० वर्ष
105पोलीस संरक्षण व पहारा बाबतच्या नियमावलीचा संकिर्ण पत्रव्यवहार२ वर्ष
106लिपिक वर्गीयांची नियुक्ती / नेमणूक / बदली / पदोन्नती / पदान्ती इ. आस्थापना मूळ पत्र व्यवहार५ वर्ष
107लिपिक वर्गीयांची रजा मंजूरी१ वर्ष
108लिपिक वर्गीयांची वेतन वाढी प्रमाणपत्रे६ वर्ष
109लिपिक वर्गीयांच्या विविध परिक्षा५ वर्ष
110लिपिक वर्गीयांना परिक्षेतून सुट मिळण्याचा पत्रव्यवहार३० वर्ष
111मुदत वाढीबाबतचे अर्ज३ वर्षे
112जत्रे विषयीचा पत्रव्यवहार२ वर्ष
113भविष्य निर्वाह निधी, अनुकंपा निधी इ. बाबत पत्रव्यवहार५ वर्ष
114इतर राज्यांचे पोलीस राजपत्र१ वर्ष
115विविध अग्रीमांबाबतची शासनातर्फे प्रसृत केलेली परिपत्रके व निर्णय५ वर्ष
116अंदाजपत्रकीय अनुदानाच्या पुनर्विनियोजना बाबतची शासन परिपत्रके व निर्णय३ वर्षे
117परदेशी नागरीकांना देशाबाहेर घालविणे, त्यांच्या शिक्षा व सुटकेबाबतचा पत्रव्यवहार५ वर्ष
118बाल सुधारगृहातुन सुटका५ वर्ष
119पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे प्रसृत करण्यात येणा-या सेवाज्येष्ठता याद्या व त्याविषयीचा पत्रव्यवहार२ वर्ष
120या कार्यालयामार्फत करण्यात येणारी निरीक्षण५ वर्ष
121अंतरजिल्हा व्यायाम क्रीडा स्पर्धेविषयीचा संकिर्ण पत्रव्यवहार५ वर्ष
122आवक नोंदवह्या३० वर्ष
123स्थावर मालमत्तेविषयीचे नियतकालीके व पत्रव्यवहार१० वर्ष
124पदके आणि सन्माना विषयीचा संकिर्ण पत्रव्यवहार५ वर्ष
125या यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या बाबी विषयक कमी महत्त्वाच्या असलेल्या प्रकरणाचा संकिर्ण पत्रव्यवहार२ वर्ष
126मोटार परिवहन व वाहनाबाबतचा संकिर्ण पत्रव्यवहार२ वर्ष
127विविध अनुदानांविषयक५ वर्ष
128वेतन देयके३० वर्ष
129महालेखकाराकडून उपस्थित केलेल्या आक्षेपाबाबत५ वर्ष
130निवृत्ती वेतन / उपदान आणि असाधारण निवृत्ती वेतन५ वर्ष
131रूग्णता निवृत्ती वेतन२५ वर्ष
132पोलीस राज्यपत्राविषयीचा पत्रव्यवहार१ वर्ष
133पोलीस अधिनियमाविषयीचा पत्रव्यवहार ( पुनरावृत्तीनंतर )१ वर्ष
134शिक्षा विषयक नियतकालीक अहवाल३ वर्षे
135शिक्षा विषयक नियतकालीक अहवाल५ वर्ष
136औषध विषयक मागणीपत्रे५ वर्ष
137मुद्राकाबाबतच्या नोंदवह्या५ वर्ष
138मुंद्राक मागणी व्यवहार१ वर्ष
139निश्चित केलेल्या विहित प्रपत्रामधील सुधारणा इत्यादि५ वर्ष
140विहित प्रपत्राची पुरवठा मागणी१ वर्ष
141पुर्नरचनेबाबतचा संकिर्ण पत्रव्यवहार५ वर्ष
142महामार्ग सुरक्षा / राज्य राखीव पोलीस बलाविषयीचा संकिर्ण पत्रव्यवहार३ वर्षे
143लेखन सामुग्रीच्या वाटपाविषयीची नोंदवही५ वर्ष
144अतिरिक्त मागणीपत्र व त्या विषयीचा पत्रव्यवहार१ वर्ष
145बेड्या व तत्सम वस्तुचा पुरवठा५ वर्ष
146संप व टाळेबंदीबाबतचा पत्रव्यवहार२ वर्ष
147सेवानिवृत्तांबाबतची विवरणपत्रे५ वर्ष
148 मा. राष्ट्रपती / मा. प्रतंप्रधानाच्या नेहमीच्या दौ-याचे कार्यक्रम१० वर्ष
149मा. राज्यपालांचा दौरा२ वर्ष
150 इतर उच्च अधिका-यांचे दौरे२ वर्ष
151प्रशिक्षणाबाबतचा संकिर्ण पत्रव्यवहार३ वर्षे
152प्रवास भत्ते देयके व त्या बाबतचा पत्रव्यवहार३ वर्षे
153भटक्या टोळ्याबाबतचा पत्रव्यवहार२ वर्ष
154कल्याणकारी योजनाबाबतचे संकिर्ण पत्रव्यवहार३ वर्षे
155बिनतारी संदेश कार्यालयाबाबतची संकिर्ण पत्रव्यवहार३ वर्षे
156पो.ठा. निमित्ती/ स्थंलातर/ रूपातर/पद निमित्ती करणे बाबतची नस्ती मान्यतेनंतर) १५७२ वर्ष
157लिपिक वर्गीय सेवापुस्तक / सेवापट३० वर्ष

 

अ. क्र.विषयदस्ताऐवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, व्हाउचर इ.प्रमुख बाबींचा तपशीलसुरक्षित ठेवण्याचा कालावधी
1नोंदपुस्तक१. आवक नोंदवही

२. जावक नोंदवही

३. सरकारी तिकीट हिशोब नोंदवही

नोंदणी शाखेत प्राप्त होणारे सर्व आवक / जावक टपालांची नोंदपुस्तिकांत नोंद केली जाते. तसेच पोस्टामार्फत पाठविण्यात येणा-या टपालाकरिता लावण्यात येणा-या स्टॅम्प हिशोबाची नोंद स्वतंा नोंदवहीत ठेवली जाते. आवक टपालांची नोंद नोव्हेंबर २००४ पासून संगणकावर केली जात असून त्याविषयीच्या आणखी नोंदवहया ठेवण्यात येत नाहीत. संगणकावर नोंद केलेल्या टपालाचे वाटप त्या त्या कार्यासनाकडे करण्यात येते व प्रस्तुत सर्व नोंदी सर्व संगणकावर उपलब्ध असतात.३० वर्ष आवक नोंदवहयांचे जतन करणे, कार्यालयीन कार्यपध्दती नियम, पोलीस महासंचालक मुंबई प्रकरण बारा, परिच्छेद ५३ (तीन) नुसार आवश्यक आहे मात्र जावक नोंदवहीचा जतन कालावधी विहित करण्यात आलेला नाही तसेच सरकारी तिकीटांचा साठयाच्या हिशोब नोंदवहीचे जतन ५ वर्षापर्यंत केले जाते.

कलम ४ (१) (b) (xv)

पोलीस महासंचालक कार्यालयातील उपलब्ध सुविधांचा तक्ता :-

अ.क्र.पोलीस अधिका-याचे पदनामभेटण्याची वेळ
1पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.मंगळवार ते शुक्रवारी १५.०० ते १६.००
2अपर पोलीस महासंचालक (का.व सु.), महाराष्ट्र राज्य, मुंबई.कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत
3अपर पोलीस महासंचालक (आस्था.), महाराष्ट्र राज्य, मुंबई.कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत
4विशेष पोलीस महानिरीक्षक (नि.व.स.), महाराष्ट्र राज्य, मुंबई.कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत
5विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशा.), महाराष्ट्र राज्य, मुंबई.कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत
6पोलीस उप महानिरीक्षक (प्रशा.), महाराष्ट्र राज्य, मुंबईकामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत
7पोलीस उप महानिरीक्षक (का.व सु.), महाराष्ट्र राज्य, मुंबई.कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत
8पोलीस उप महानिरीक्षक (आस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई.कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत
9सहायक पोलीस महानिरीक्षक (नि.व स.) / सर संपादक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत
10पोलीस अधीक्षक, राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, मुंबई.कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत

अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधा –

कार्यालयीन अभिलेखाचे संबंधीत वरिष्ठाकडून अभिलेख तपासण्याची कार्यपध्दती प्रचलित आहे. मात्र पोलीस खात्या सारख्या संरक्षणाशी निगडीत असलेल्या गोपनीयतेची बाब लक्षात घेवूनच पुढील कार्यवाही करण्यात येते.

नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती –

गोपनीय नसलेले नमुने जनता संबंधीत माहिती अधिका-याकडून उपलब्ध करून घेवू शकते.

सुचना फलकाची माहिती-

महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम, २००२ अन्वये आवश्यक तो फलक हया कार्यालयात प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागात लावण्यात आलेला आहे. केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार त्या फलकात बदल करून संबंधीत अधिका-यांच्या नावाचा फलक लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

ग्रंथालया विषयी माहिती –

जनतेसाठी या कार्यालयात ग्रंथालय कार्यरत नाही. मात्र कार्यालयीन अभिलेख व कार्यालयीन कामकाजाशी निगडीत बाबींचा / पुस्तकांचा, गोपनीयता लक्षात घेवून, त्याप्रमाणे आवश्यकता भासल्यास जनतेस त्या पुस्तकांचे अवलोकन करता येईल.

“अभिलेख कायदा तरतुदी”

महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट 2005 मधील महत्वाची तरतूद.

सरकारी फाईल गहाळ होणे, ती सरकारी नियमानुसार डिस्ट्रॉय न करणे, हे सर्व सदर कायद्यातील, कलम 9 नुसार गंभीर अपराध असून 5 वर्षे कारावास व दंड अशी शिक्षा आहे.

हेही वाचा – लोकाभिमुख प्रशासनच्या दृष्टीने जनतेच्या तक्रारींची दखल घेणे, त्यांचे वेळेत निराकरण करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणेबाबत शासन नियम

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.