दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !
दुचाकीची विक्री करताना शोरूम चालकांनी ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. आरटीओचे तसे निर्देश आहेत. मात्र, शोरूम चालक ग्राहकांना एकच हेल्मेट देत आहेत. तर ग्राहकांना दोन हेल्मेट मिळत नसतील तर त्यांनी तक्रार करावी, असे आरटीओ अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले.
दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !
आरटीओच्या निर्देशानुसार दुचाकी शोरूम चालकांना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. मात्र, दुचाकी खरेदी केल्यानंतर शोरूम चालकांनी दोन हेल्मेट दिली नाहीत, तर नागरिकांनी थेट आरटीओ कार्यालयात तक्रार करावी. संबंधित शोरूम चालकावर कारवाई केली जाणार आहे.
दोन हेल्मेट देणे बंधनकारक
शहर आणि जिल्ह्यातील शोरूममध्ये दुचाकी विकत घेतल्यानंतर ग्राहकाच्या सुरक्षेसाठी दोन हेल्मेट देण्याचे शोरूम चालकाना आरटीओचे निर्देश आहेत. मात्र, त्याला केराची टोपली दाखवून एकच हेल्मेट शोरूम चालकांकडून दिले जात आहे.
‘ग्राहकाला याबाबतची माहिती नसते’
शोरूममध्ये हप्त्यावर १ आणि काही जण रोख रक्कम घेऊन दुचाकीची खरेदी करतात. मात्र, दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकाला शोरुमकडून दोन हेल्मेट दिली जातात, याबाबतची माहिती नसते, असे शोरूम चालकांनी सांगितले.
२ दुचाकी खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट द्यायची आहेत. हे बंधनकारक असले तरी ते शोरूमधारकांना परवडण्यासारखे नाही. एखाद्या ग्राहकाने मागणी लावून धरल्यास दोन हेल्मेट दिली जातात. मात्र, बहुतेक ग्राहकांना एकच हेल्मेट दिले जाते, असे शोरूम चालकांचे म्हणणे आहे.
नियम पाळला जातो का?
शहरातील शांतीनगर येथील दुचाकी शोरूमची पाहणी केली असता, दुचाकी खरेदीनंतर एकच हेल्मेट दिले जाते, अशी कबुली शोरूम व्यवस्थापकांनी स्वतः दिली. या प्रकाराने आरटीओनी घालून दिलेल्या दोन हेल्मेट देण्याच्या नियमाला शोरूम चालकच केराची टोपली दाखवत असल्याचे उघड झाले. आहे.
शांतीनगर परिसरातील दुसऱ्या शोरूममध्येही एकच हेल्मेट दिले जाते, असे शोरूम चालकांचे म्हणणे आहे. आरटीओचा दोन हेल्मेट देण्याचा नियम त्यांना माहीत आहे, मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, बहुतांश ग्राहकांकडूनही तशी मागणी होत नाही.
पुढील लेख देखील वाचा!
- केंद्र सरकारच्या वाहन 4.0 (Vahan 4.0 Portal) पोर्टलवर RTO च्या विविध सेवांचा घरबसल्या ऑनलाईन लाभ घ्या!
- राज्यात RTO च्या सहा सेवा ऑनलाईन आणि फेसलेस; वाहन चालकांना फायदा होणार!
- लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस
- नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी !
- CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे !
- या वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!