माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना
मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे ,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे ,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे यासाठी दिनांक 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आलेली “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना अधिक्रमित करुन “ माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना “ दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7.50 लाख (सात लाख पन्नास हजार फक्त ) पर्यत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर योजना राबविताना येणा-या अडचणी विचारात घेऊन सदर योजनेच्या काही शर्ती /अटीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
“माझी कन्या भाग्यश्री” सुधारित नवीन योजना:
माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7.50 लाख (सात लाख पन्नास हजार फक्त ) पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर योजना राबविताना येणा-या अडचणी विचारात घेऊन सदर योजनेच्या शर्ती /अटीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मंजुरी देणार आहे. उर्वरित शर्ती /अटी दिनांक 1 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयात नमुद केल्यानुसार कायम राहणार आहेत.
नवीन शासन निर्णयान्वये करण्यात येत असलेली सुधारणा
१. मातेने/पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक राहील. मात्र विधवा महिलेने पती निधनाचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर केल्यास योजनेचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे. कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची मागणी करण्यात येऊ नये.
२. योजनेचा अंतिम लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होणे तसेच तिने 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहणार आहे. इयत्ता 10 वी पास किंवा नापास असली तरी तीला योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे. वयाच्या टप्यानुसार वेळोवेळी देय होणारे व्याज तीला अनुज्ञेय राहणार आहे.
३. माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून लागु करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबाना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी 1 मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता/पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला रुपये 25,000/- इतका योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे. मात्र दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर मुलीचा जन्म झाला असल्यास परंतु दुस-या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुली योजनेच्या लाभास पात्र राहणार आहेत.
४. एका मुलीच्या जन्मानंतर माता /पित्याने 2 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण/नागरी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही. तसेच दोन मुलींनंतर 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणाऱ्या कुटुबांनाच या योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार आहे.
५. सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 19 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णयान्वये बंद केली असल्यामुळे लाभार्थ्यांकडून या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्राची मागणी करण्यात येऊ नये.
६. आयुक्तालयाकडुन योजनेचा निधी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागास उपलब्ध करुन न देता तो महिला व बाल विकास अधिकारी (जि .प.) यांच्या खात्यास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महिला व बाल विकास अधिकारी( जि .प.) यांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चालु खाते उघडण्यास आयुक्त ए.बा.वि .सेवायोजना, नवी मुंबई यांनी अनुमती दिलेली आहे. सदर खात्यात महिला व बाल विकास अधिकारी ( जि .प.) यांनी निधी जमा करण्यात येणार आहे.
७. बँक ऑफ महाराष्ट्रच्या (जिल्हा शाखेस) योजना राबविण्यासाठी तालुका किंवा गाव पातळीवरील शाखेमध्ये खाते उघडून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावयाचा असल्यास त्याप्रमाणे त्यांना कार्यवाही करण्याची अनुमती देता येणार आहे. परंतु योजनेचे समन्वय अधिकारी महिला व बाल विकास अधिकारी ( जि .प.) हेच राहणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धती:
सदर योजनेंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिक, महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-‘अ’ किंवा ‘ब’ मध्ये अर्ज सादर करावा.
अर्जासोबत वडील राज्याचे मूळ रहिवासी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र) आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्य्ररेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला), लाभार्थी कुटुंबाने प्रकार-1 चा लाभ घ्यावयाचा असल्यास पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
तसेच दुसरे अपत्य असलेल्या मुलीसाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वैद्यकीय अधिकार्यांचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावीत.
सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बालविकास) यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.
प्रपत्र – अ – माझी कन्या भाग्यश्री अर्जाचा नमुना:
प्रपत्र – अ – “माझी कन्या भाग्यश्री” योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी मुलीच्या वतीने तिच्या पालकांनी करावयाचा अर्जाचा नमुना मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रपत्र – ब – माझी कन्या भाग्यश्री अर्जाचा नमुना:
प्रपत्र – ब “माझी कन्या भाग्यश्री” या योजनेअंतर्गत बालगृहे/शिशुगृहे किंवा महिला व बाल विकास विभागांतर्गतच्या इतर निवासी संस्था येथील संस्थेच्या अधीक्षकाने व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमुना मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रपत्र – क – माझी कन्या भाग्यश्री पालकांचे हमी पत्र:
प्रपत्र – क “माझी कन्या भाग्यश्री” योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी मुलीच्या वतीने तिच्या पालकांनी लिहून देण्याचे हमी पत्र मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि शासन निर्णय पहा.
हेही वाचा – सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!