विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना – Vitthal Rakhumai Warkari Insurance Scheme
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीविठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लक्ष वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात व मृत्यू यासाठी विमा छत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना – Vitthal Rakhumai Warkari Insurance Scheme
आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचे स्वरुप खालीलप्रमाणे असेल :-
(१) दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत / अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी रु.५,००,०००/- (रुपये पाच लाख फक्त) शासनाकडून वारसास सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
(२) याव्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा योजना राबविण्यात येईल. तिचे स्वरुप पुढीलप्रमाणे राहील :-
१) दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व वा विकलांगता आल्यास विमा कंपनीकडून खालीलप्रमाणे प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल :- (अ) दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात / पाय व एक डोळा निकामी झाल्यास रु.१,००,०००/-
(ब) एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास रु.५०,०००/-
२) वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी रु. ३५,०००/- किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल.
३) सदर विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी परिशिष्ट-अ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.
४) सदर विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल.
(३) “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” या योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येईल.
विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेतील अपघात विम्यासंबंधी तरतुदी
विमा रक्कम | रु.१,००,०००/- (कंपनीकडून) |
विमाहप्ता | रु. १८/- (प्रति १ लाख विमा रकमेसाठी) |
विमा कालावधी | ३० दिवस |
विमा रक्कम | १,००,००० (CSI) |
अ.क्र. | अपघाताचे स्वरुप | टक्केवारी | |
1 | अपघातामुळे आलेला मृत्यु | १००% विमा रक्कम (CSI) | |
2 | अपघातात दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक हात / पाय व एक डोळा | १००% विमा रक्कम (CSI) | |
3 | एक हात, एक पाय, एक डोळा | ५०% विमा रक्कम (CSI) | |
4 | कायमचे अपंगत्व / विकलांगता | १००% विमा रक्कम (CSI) | |
वैद्यकीय उपचाराचा खर्च | प्रत्यक्ष खर्च किंवा ३५,०००/- यापैकी जे कमी असेल ते |
१) समूह विमा योजनांच्या प्रचलित नियमानुसार सदर योजना कार्यान्वित करणेसाठी सदरील समूहाचे स्तरावर प्रबंधन करणेसाठी आवश्यक ती यंत्रणा / समिती स्थापन करण्यात येईल.
२) सदरील योजनेकरिता संबंधित विमा कंपनीकडून नाव नसलेले (Unnamed Policy) विमा पत्रक निर्गमित करण्यात येणार असून त्याकरिता वारकरी हा गट विनिर्दिष्ट करण्यात येत आहे.
३) ज्यादिवशी विमाहप्ता भरण्यात येईल त्याच्या पुढील तारखेपासून तीस दिवसांपर्यंत त्याची मुदत राहील.
४) एखादी व्यक्ती सदर कालावधीत मरण पावल्यास ती वारकरी समुदायातील आहे किंवा कसे याची पडताळणी करण्याकरिता सक्षम प्राधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालाकडून तसे प्रमाणित करण्यात येईल.
५) सदर विमापत्रकामध्ये समाविष्ट वारकऱ्याची संख्या समाविष्ट करण्यात येईल.
६) सदर विमापत्रकात खालील कारणांकरिता लाभ देय होणार नाही.
I) आत्महत्या वा तसा प्रयत्न
II) अमली अथवा मादक पदार्थांच्या अंमलाखाली मृत्यू
III) प्रसुती अथवा बाळंतपणादरम्यान मृत्यू किंवा विकलांगता आल्यास
IV) गुन्हेगारी उद्देशाने कोणात्याही कायदयाचे उल्लंघन केल्यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता
V) गुप्त रोग अथवा वेडसरपणा यामुळे आलेला मृत्यू किंवा विकलांगता
(VI) किरणोत्सर्ग,अणुभटटया, युध्द व बंड इत्यादी तत्सम कारणांमुळे उद्भवलेला मृत्यू किंवा विकलांगता.
७) विमा पत्राअंतर्गत वैद्यकीय उपचाराकरिता झालेला प्रत्यक्ष खर्च अथवा जास्तीत जास्त रु. ३५,०००/- विमारक्कम देय राहील.
वित्त विभाग शासन निर्णय : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना राबविण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!