वृत्त विशेषसरकारी योजना

घरगुती वीज जोडणी सुरु – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून येत्या दि. १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार या योजनेसंदर्भातील शासन निर्णय १२ एप्रिल २०२१ जारी करण्यात आला.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत या योजनेच्या अनुषंगाने माहिती देताना म्हणाले की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षित घटकांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत. शिक्षणाच्या बळावर व उपेक्षित, शोषितांच्या व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणण्याचे काम त्यांनी केले असून एक प्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जगभरात दि. 14 एप्रिल 2021 रोजी साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्‍याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम दि. 14 एप्रिल 2021 ते दि.6 डिसेंबर 2021 अर्थात बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय या योजनेत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करण्याबाबतच्या उपाययोजनांचाही समावेश असेल.

असा घेता येईल लाभ

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीकरिता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, रहिवासी दाखला आदी असणे आवश्यक असेल. तसेच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफ लाईन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. लाभार्थ्याने 500 रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील. अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील 15 कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल. तसेच जेथे अर्जदारास वीज जोडणीकरीता विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास अशा ठिकाणी महावितरणद्वारे निधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राध्यान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत.विपरीत परिस्थितीत त्यांनी देश व विदेशातून उच्चशिक्षण प्राप्त करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. याच शिक्षणाच्या बळावर शोषित, उपेक्षित घटक व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणले व एक प्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची 130 वी जयंती जगभरात दि .14 एप्रिल 2021 रोजी साजरी होत आहे. या जयंती निमित्त राज्यातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने वीज जोडणी विशेष मोहीम दि .14 एप्रिल 2021 ते दि .6 डिसेंबर 2021 या कालावधीत राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

दि .१४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणाद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठयासंबधी असणाऱ्या तक्रारी/ समस्यांचे निवारण करण्याबाबतही समावेश असेल.

लाभार्थ्यांची अनुज्ञेयता :-

या योजनेतील घरगुती वीज जोडणी करणाऱ्या लाभार्थ्यांची अनुज्ञेयता खालीलप्रमाणे राहील :-

१) लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याचा जाती प्रमाणपत्र आवश्यक राहील.
२) महावितरण कंपनीस वीज जोडणीकरता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे जसे की, आधारकार्ड, रहिवासी दाखला इत्यादी असणे आवश्यक असेल.
३)अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी.

योजनेची कार्यपद्धती:-

१) लाभार्थी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन किंवा ऑफ लाईन अर्ज करील.
२) अर्जदाराने शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
३) लाभार्थ्याने रू.500/- इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील. सदर रक्कम 5 समान मासिक हफ्त्यांमध्येच भरण्याची सुविधा असेल.
४) अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर मा.महाराष्ट्र विदुयत नियामक आयोगाच्या या संदर्भातील अस्तित्वात असणाऱ्या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
५) महावितरणाद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विदुयत पायाभूत
सुविधा उपलब्ध असल्यास पुढील 15 कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
६) तसेच जेथे अर्जदारास वीज जोडणीकरता विदुयत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास अशा
ठिकाणी महावितरणाद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी
उपयोजना सहीत) अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधी मधून प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल
व वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
७) याशिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटीत उद्योगामधील वीज समस्यांचे प्राधान्याने निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर प्रत्येक मंडळातील किंवा जिल्हा स्तरावर अधीक्षक अभियंता अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यक्षेत्रातील कृती दलाची स्थापना करण्यात येईल. अशा कृती दलात त्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योजकांचा समावेश असावा. मुख्य अभियंता स्तरावर याचा दर महिन्यांनी आढावा घेण्यात येईल.
८) या योजनेतील तक्रारीचे निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर समर्पित वेब पोर्टल निर्माण करण्यात येईल.
९) या योजनेची महावितरणद्वारा प्रसिद्धी करण्यात येईल.
१०) या योजनेचे सनियंत्रण व आढावा अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,महावितरणद्वारा आवश्यकतेनुसार
परंतु किमान त्रैमासिकरीत्या घेण्यात येईल यातून झालेली फलनिष्पत्तीचा अहवाल शासनास दर महिन्यास सादर करेल.
११) या योजनेसाठी लागणार निधी महावितरण स्वनिधी / जिल्हा विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना
तथा आदिवासी उपयोजना सहीत)/कृषी आकस्मिकता निधी मधुन करता येईल.
१२) या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर याबाबत यशस्वी गाथा व त्रुटी आढळल्यास त्याचा फलनिष्पत्ती अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.

उद्योजकांचेही प्रश्न सोडवणार:

याशिवाय अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगांमधील वीज समस्यांचे प्राध्यान्याने निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर प्रत्येक मंडळातील किंवा जिल्हास्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यक्षेत्राकरिता कृती दलाची स्थापना करण्यात येईल. अशा कृती दलात त्या कार्यक्षेत्रातील अनुसुचित जाती/ अनुसुचित जमातीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उद्योजकांचा समावेश असेल. मुख्य अभियंता स्तरावर याचा दर महिन्यांनी आढावा घेण्यात येईल.

या योजनेतील तक्रारीचे निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरणस्तरावर समर्पित वेब पोर्टल निर्माण करण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण व आढावा घेऊन शासनास फलनिष्पत्ती अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना; घरगुती वीज जोडणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.