बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देऊन नोंदणी करणेबाबत शासन नियम
शासन परिपत्रक ग्राम विकास विभाग क्र. व्हीपीएम २०१५/प्र.क्र. २३७/पंरा -३ दिनांक १६ नोव्हेंबर, २०१५ अन्वये बांधकाम कामगारांची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत. खालील परिपत्रकासोबत देण्यात आलेल्या नमूना प्रमाणपत्रामध्ये बांधकाम कामगाराने (90 Divas Kam Kelyache Pramanpatra) ९० दिवस काम केल्याचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. या त्रुटीचा गैरफायदा अपात्र लाभार्थी घेत असल्याची शक्यता कामगार आयुक्तांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने सुधारित प्रमाणपत्र देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
ग्राम विकास विभाग दिनांक १६/११/२०१५ च्या सोबतच्या प्रमाणपत्रात बांधकाम कामगाराने ९० दिवस काम केल्याचा उल्लेख नसल्याने, या परिपत्रकासोबत जोडलेल्या सहपत्रातील प्रमाणपत्रात बांधकाम कामगारास नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक कार्यवाही सर्व स्थानिक संस्थांनी करावी. तसेच सदर प्रमाणपत्र देताना कामगारांच्या वास्तव्याचा अधिकृत पुरावा व अधिकृत फोटो असलेल्या ओळखपत्राचा नमुना अर्जासोबत घेण्यात यावा.
९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र – 90 Divas Kam Kelyache Pramanpatra:
शासन परिपत्रक क्रमांक व्हीपीएम २०१५/प्र.क्र.२३७/पंरा -३ दिनांक २२ सप्टेंबर, २०१७ सोबतचे सहपत्र नुसार ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे (90 Divas Kam Kelyache Pramanpatra) प्रमाणपत्र देताना त्यामध्ये बांधकाम कामगाराचे तपशीला सोबत ज्या मालकांकडे काम केलेले आहे त्या मालकाचे तपशील देखील पुढील प्रमाणे असतो.
- प्राधिकरणाचे नाव व पत्ता.
- बांधकाम कामगाराचे नाव/वय.
- ज्या मालकांकडे काम केलेले आहे त्या मालकाचे नांव, पत्ता,कामाचे स्वरूप, कालावधी आणि स्वाक्षरी.
नमुना PDF फाईल – 90 Divas Kam Kelyache Pramanpatra:
- ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे (90 Divas Kam Kelyache Pramanpatra) प्रमाणपत्र नमुना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नमुना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र शासन निर्णय:
- बांधकाम कामगारांची ग्रामीण व शहरी भागात सहजतेने, तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषित करणेबाबत महाराष्ट्र शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- बांधकाम कामगारांची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करणेबाबत महाराष्ट्र शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
खालील लेख देखील वाचा !
- बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर
- बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा (Bandhkam Kamgar Nondani) नोंदणी अपडेट!
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
- नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना
- बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!