आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी योजनामहसूल व वन विभागवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !

राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे (Nuksan Bharpai Status) पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्धतेकरिता प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या पात्र बाधित व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचा निधी प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करुन निधी वितरीत करण्याच्या प्रस्तावास विभागीय प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये मान्यता दिली, त्यानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता आधार प्रमाणीकरण (KYC) केलेल्या पात्र शेतकऱ्यांना द्यावयाचा मदतीचा निधी आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सुधारित कार्यपध्दती सुरु आहे.

संस्करीत झालेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र, मदतीची रक्कम इ. तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी (VK List) संगणकीय प्रणालीवर तयार करण्यात आली असून, ही यादी तहसीलदार यांना पोर्टल वरुन डाऊनलोड करून घेता येईल.

ही यादी ग्रामपंचायतनिहाय देखील उपलब्ध असेल व ती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाहीररित्या प्रसिध्द करण्यात येईल. या विशिष्ट क्रमांक यादीचे वाचन करण्यासाठी संबंधित तलाठी / ग्रामसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा ! Nuksan Bharpai Status:

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती (Nuksan Bharpai Status) ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील वेबसाईट ओपन करा.

https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus

आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन/महसूल आणि वन विभागाची पोर्टल ओपन होईल.

पुढे Check Your Payment Status – (Nuksan Bharpai Status) मध्ये  Vk Number मध्ये तलाठी/तहसीलदार/CSC सेंटर यांच्याकडे लाभार्थी विशिष्ठ क्रमांक मिळेल तो टाकून सर्च करा.

Check Your Payment Status : Nuksan Bharpai Status
Check Your Payment Status – Nuksan Bharpai Status

विशिष्ट क्रमांक सर्च केल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँकेच्या नावासह नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम व पेमेंट (Nuksan Bharpai Status) स्टेट्सचा तपशील आपल्याला पाहायला मिळेल.

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई विशिष्ट क्रमांक यादी:

विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविणे आवश्यक राहिल. लाभार्थ्यांनी ओळख पटविल्यानंतर विभागाने यासाठी खाते उघडलेल्या बँके मार्फत (SBI) रक्कम थेटरित्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.

जर विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र येथे बायोमेट्रिक ओळख पटविण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विशिष्ट क्रमांक यादीमध्ये काही माहिती (नाव, खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) चुकीची आढळल्यास, त्यांना त्याबाबत Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांना अवगत करण्याची सुविधा असेल.

तद्नंतर Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र सदर माहिती दुरुस्तीसाठी संबंधित तहसिलदार यांना पाठवेल. तहसिलदार यांचेकडून सदर माहिती दुरूस्ती झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतर SBI मार्फत रक्कम थेटरित्या त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

  1. अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC करणे अनिवार्य; अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही !
  2. नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
  3. अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत !

हेही वाचा – नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस – E -Panchnama KYC MahaOnline

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.