आपले सरकार - महा-ऑनलाईननगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकावृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

11th Online Admission : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२४-२५

२०२४-२५ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी – चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११ वी चे (11th Online Admission) प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता ५ जूनपासून रविवारी १६ जूनपर्यंत महाविद्यालयाचा पसंती क्रमांक भरता येणार आहे. २६ जून रोजी सकाळी दहा वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर २६ ते २९ जून दरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. सध्या पहिल्याच प्रवेशफेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, निश्चित केलेल्या पाच ऑनलाईन प्रवेश क्षेत्रातील (मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती व नाशिक महानगरपालिका) क्षेत्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालयांना लागू राहील व त्यांना या प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य राहील अर्थात, वरील क्षेत्रांतील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जातील.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२४-२५ – 11th Online Admission:

राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश या प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार नाहीत. (अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या इ. ११ वीच्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल). केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी (11th Online Admission), कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम (HSVC) या चार शाखा उपलब्ध असतील.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक – 11th Online Admission Schedule:

  • ५ ते १६ जून – प्रवेशासाठी पसंतिक्रम नोंदविणे, अर्जाचा दुसरा भाग ऑनलाइन सादर करणे, अर्ज लॉक करणे, अल्पसंख्याक, इनहाउस कोट्यासाठी ऑनलाइन पसंती नोंदविणे.
  • १५ जून – अर्जाचा भाग १ सायंकाळी ४ पर्यंत भरता येईल.
  • १८ ते २१ जून – भाग २ भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करणे व भाग २ लॉक करणे. गुणवत्ता यादीत दुरुस्ती करण्यास त्यावर हरकती नोंदविणे. त्याचे संबंधित उपसंचालकांकडून निराकरण करणे.
  • २२ ते २५ जून – प्रवेशासाठी जागांची निवडयादी वेबसाइटवर जाहीर करणे. फेरीचा कटऑफ जाहीर करणे.
  • २६ ते २९ जून – संबंधित जागेवर प्रवेश निश्चित कऱणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे. यावेळी कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेश निश्चित करणे, रद्द करणे, प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरू राहतील.
  • २९ जून – प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविणे.
  • १ जुलै – दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.

पुढील प्रवेश फेऱ्यांच्या संभाव्य तारखा:

  • दुसरी फेरी – २ ते ८ जुलै
  • तिसरी फेरी – ९ ते १८ जुलै
  • विशेष फेरी – १९ ते २६ जुलै

ऑनलाईन अर्ज (Apply 11th Online Admission):

विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी भरता येणार आहे. त्यासाठी आपले शहर निवडावे लागणार आहे. या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर लॉग इन आयडी व पासवर्ड मिळणार आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरावा. त्यानंतर माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून अर्ज प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा दुसरा भाग ५ जूनपासून सुरु होत आहे. अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने निवडावी लागणार आहे.

अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश (11th Online Admission) घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील संकेतस्थळावर भेट द्यायची आहे,

https://11thadmission.org.in

  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी प्रदेश (Region) निवडा.
Choose region to Apply

Student Registration (विद्यार्थी नोंदणी):

आपला प्रदेश (Region) निवडल्यानंतर “Student Registration” वर क्लिक करा.

Student Registration

नोंदणी करताना खालील तपशील भरून Register वर क्लिक करा, नोंदणी केल्यानंतर तुम्हला लॉगिन आयडी मिळेल तो सेव्ह करून ठेवा.

  • Applicant’s 10th School Area – अर्जदाराची 10 वी शाळा क्षेत्र
  • Applicant’s Status – अर्जदाराची स्थिती
  • 10th Standard or Equivalent Examination Board – दहावी किंवा समकक्ष परीक्षा मंडळ
  • Applicant’s Contact Details – अर्जदाराचे संपर्क तपशील
  • Mobile Number – मोबाईल नंबर
  • Password Details – पासवर्ड तपशील

Login:

विद्यार्थी नोंदणी झाल्यानंतर, Proceed to Login क्लिक करा किंवा पुन्हा वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर या आणि “Login” बटन वर क्लिक करा.

Login

आता इथे लॉगिन करण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Login

लॉगिन झाल्यानंतर अप्लिकेश फॉर्म भरून प्रिंट काढायची आहे.

लॉग इन करण्यात अडचण येत आहे?

आपण जर लॉगिन पासवर्ड किंवा अर्ज फॉर्म क्रमांक विसरला असेल तर “Having trouble logging in” लिंक वर क्लिक करून पासवर्ड परत मिळवा. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

क्षेत्रनिहाय वेब पोर्टल:

मुंबईसाठी वेब पोर्टल: https://mumbai.11thadmission.org.in

पुण्यासाठी वेब पोर्टल: https://pune.11thadmission.org.in

नागपूरसाठी वेब पोर्टल: https://nagpur.11thadmission.org.in

अमरावतीसाठी वेब पोर्टल: https://amravati.11thadmission.org.in

नाशिकसाठी वेब पोर्टल: https://nashik.11thadmission.org.in

हेल्पलाईन संपर्काची माहिती:

ईमेल: fyjcadmission.helpdesk@gmail.com

फोन नं.: 9823009841 (9:00 AM to 7:00 PM)

  • Mumbai – mumbai.11thadmission@gmail.com
  • Pune – admissiononline11@gmail.com
  • Nagpur – nagpur.11thadmission@gmail.com
  • Nashik – nashik.11centralize@gmail.com
  • Amravati – amravati.11centralize@gmail.com

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बाबत महत्वाच्या PDF फाईल्स:

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (11th Online Admission) २०२४-२५ संदर्भातील महत्वाच्या PDF फाईल्स खालील लिंक वरून डाउनलोड करा.

  1. वेळापत्रक 2024-25 PDF फाईल
  2. प्रवेशाचे संभाव्य Schedule 2024-25 PDF फाईल
  3. 11वी ऑनलाइन प्रवेश 2024-2025 माहिती पुस्तिका PDF फाईल
  4. स्वयंघोषणा अल्पसंख्याक PDF फाईल
  5. स्वयंघोषणा फॉर्म PDF फाईल

हेही वाचा – Tata Education Trust Scholarship : लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.