आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी योजनामहसूल व वन विभागवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई स्टेटस 2026 : ऑनलाइन पेमेंट स्टेटस कसे तपासाल? संपूर्ण माहिती!

राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे (Nuksan Bharpai Status) पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्धतेकरिता प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या पात्र बाधित व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचा निधी प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करुन निधी वितरीत करण्याच्या प्रस्तावास विभागीय प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये मान्यता दिली, त्यानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता आधार प्रमाणीकरण (KYC) केलेल्या पात्र शेतकऱ्यांना द्यावयाचा मदतीचा निधी आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सुधारित कार्यपध्दती सुरु आहे.

संस्करीत झालेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र, मदतीची रक्कम इ. तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी (VK List) संगणकीय प्रणालीवर तयार करण्यात आली असून, ही यादी तहसीलदार यांना पोर्टल वरुन डाऊनलोड करून घेता येईल. ही यादी ग्रामपंचायतनिहाय देखील उपलब्ध असेल व ती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाहीररित्या प्रसिध्द करण्यात येईल. या विशिष्ट क्रमांक यादीचे वाचन करण्यासाठी संबंधित तलाठी / ग्रामसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

नुकसान भरपाई स्टेटस 2026 – Nuksan Bharpai Status:

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती (Nuksan Bharpai Status) ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील वेबसाईट ओपन करा.

https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus

आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन/महसूल आणि वन विभागाची पोर्टल ओपन होईल.

पुढे Check Your Payment Status – (Nuksan Bharpai Status) मध्ये  Vk Number मध्ये तलाठी/तहसीलदार/CSC सेंटर यांच्याकडे लाभार्थी विशिष्ठ क्रमांक मिळेल तो टाकून सर्च करा.

नुकसान भरपाई स्टेटस 2026 : Nuksan Bharpai Status
नुकसान भरपाई स्टेटस 2026 – Nuksan Bharpai Status

विशिष्ट क्रमांक सर्च केल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँकेच्या नावासह नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम व पेमेंट (Nuksan Bharpai Status) स्टेट्सचा तपशील आपल्याला पाहायला मिळेल.

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई विशिष्ट क्रमांक यादी:

विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविणे आवश्यक राहिल. लाभार्थ्यांनी ओळख पटविल्यानंतर विभागाने यासाठी खाते उघडलेल्या बँके मार्फत (SBI) रक्कम थेटरित्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.

जर विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र येथे बायोमेट्रिक ओळख पटविण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विशिष्ट क्रमांक यादीमध्ये काही माहिती (नाव, खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) चुकीची आढळल्यास, त्यांना त्याबाबत Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांना अवगत करण्याची सुविधा असेल.

त्यानंतर Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र सदर माहिती दुरुस्तीसाठी संबंधित तहसिलदार यांना पाठवेल. तहसिलदार यांचेकडून सदर माहिती दुरूस्ती झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतर SBI मार्फत रक्कम थेटरित्या त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

शासनाने सुरू केलेली ऑनलाइन प्रणाली शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. नुकसान भरपाई स्टेटस 2026 ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाची आणि पेमेंटची माहिती सहज मिळू शकते. VK Number, आधार KYC आणि योग्य बँक माहिती असल्यास नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यात जमा होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत KYC पूर्ण करून अधिकृत पोर्टलवरून नियमित स्टेटस तपासत राहावे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. नुकसान भरपाई स्टेटस 2026 कसे तपासायचे?

VK Number वापरून अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन स्टेटस तपासता येते.

2. VK Number कुठे मिळेल?

तलाठी, तहसील कार्यालय, CSC सेंटर किंवा ग्रामपंचायतमधील लाभार्थी यादीमध्ये मिळतो.

3. KYC आवश्यक आहे का?

होय. आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण केल्याशिवाय रक्कम जमा होत नाही.

4. रक्कम कोणत्या खात्यात जमा होते?

आधारशी संलग्न आणि पडताळणी झालेल्या बँक खात्यात.

5. माहिती चुकीची असल्यास काय करावे?

CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करावी.

या लेखात, आम्ही नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची (Nuksan Bharpai Status) स्थिती ऑनलाईन चेक कशी करायची? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 2026: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, कोट्यवधींचा निधी मंजूर!
  2. नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस !
  3. अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC करणे अनिवार्य; अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही !
  4. अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत !
  5. अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी !
  6. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  7. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  8. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
  9. किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  10. आंबिया बहार फळ पीक विमा योजना : फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  11. E-Peek Pahani DCS App : ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध!
  12. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – PoCRA Scheme.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.