पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया!
पॅनकार्ड व आधार कार्ड हे सर्वांसाठी खूप महत्वाचे दस्तऐवज आहेत. अनेक सरकारी कामांसाठी पॅनकार्ड व आधार कार्ड हे लागतेच. पण आता सरकारच्या नवीन नियमानुसार पॅनकार्ड आधार कार्ड लिंक (PAN Card Link to Aadhar Card) करावे लागणार आहे व हे सर्वांसाठी अनिवार्य आहे. तसेच मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हे काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल व असे जर नाही केले तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
आयकर विभागाच्या मते जर तुम्ही निष्क्रिय पॅनकार्ड वापरत असाल, तर इनकम टॅक्स कायदा सेक्शन 272B अंतर्गत 10,000 रुपये दंड भोगावा लागेल. तसेच कार्डधारकांनी जर पॅनकार्ड आणि आधार कार्डला लिंक नाही केलं तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रक्रिया: (PAN Card Link to Aadhar Card):
1) पॅनकार्ड आधार कार्डला लिंक (PAN Card Link to Aadhar Card) करण्यासाठी सर्व प्रथम खालील इन्कम टॅंक्सची वेबसाईट ओपन करा.
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar
माहिती भरा!
आपला PAN नंबर टाका
आपला Aadhaar नंबर टाका
नंतर “Validate” किंवा “Link Aadhaar” बटणावर क्लिक करा; म्हणजे तुमचे आधार पॅनकार्ड लिंक (PAN Card Link to Aadhar Card) करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
आधार आणि पॅन आधीपासून लिंक केलेले असल्यास किंवा पॅन इतर आधारशी लिंक केलेले असल्यास किंवा त्याउलट, तुम्हाला पुढील मॅसेज येईल : “PAN is already linked with the Aadhar or with some other Aadhar”.
फी भरावी लागेल (जर अद्याप भरली नसेल तर)
मार्च 2023 नंतर PAN-Aadhaar लिंक करताना ₹1,000 फी भरावी लागते.
सिस्टीम आपोआप तुम्हाला फी भरण्याच्या पेजवर नेईल.
फी खालील माध्यमांतून भरू शकता:
नेटबँकिंग
डेबिट/क्रेडिट कार्ड
UPI
e-Pay Tax (TIN portal)
लिंकिंग कन्फर्मेशन:
फी भरल्यानंतर 2-4 दिवसांनी पुन्हा पोर्टलवर जा आणि “Link Aadhaar Status” तपासा.
आधार कार्ड -पॅनकार्ड लिंक झाले किंवा नाही ते कसे पाहायचे ? (Link Aadhaar Status)
1)आधार कार्ड-पॅनकार्ड लिंक (PAN Card Link to Aadhar Card) झाले किंवा नाही ते पाहण्यासाठी खालील इन्कम टॅंक्सची वेबसाईट ओपन करा.
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status
2) वेबसाईट ओपन झाल्यानंतर आधार कार्ड आणि पॅनकार्ड नंबर टाका
४) त्यानंतर ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.

आता तुम्हाला पॅनकार्ड आधार कार्डला लिंक (PAN Card Link to Aadhar Card) झाले किंवा नाही ते दिसेल.
महत्त्वाच्या सूचना
PAN आणि Aadhaar मध्ये जन्मतारीख, नाव, लिंग यामध्ये फरक असल्यास आधी त्यात सुधारणा करा.
जर लिंक केले नाही तर PAN inoperative (अकार्यशील) होईल.
त्यामुळे इनकम टॅक्स रिटर्न, बँक व्यवहार, इत्यादींमध्ये अडचण येऊ शकते.
या लेखात, आम्ही पॅनकार्ड आधार कार्डला लिंक (PAN Card Link to Aadhar Card) कसे करायचे? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा!
- घरबसल्या मोफत पॅन कार्ड कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
- पॅनकार्ड हरवल्यास काय करावे? तुमचा पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर कसा शोधावा ?
- (PAN 2.0) – पॅन कार्ड वरील मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- ITR म्हणजे काय? आयकर रिटर्नबाबत संपूर्ण माहिती एका क्लिकमध्ये!
- पासपोर्टसाठी असा करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन!
- पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य दाखला) ऑनलाईन काढण्याची प्रोसेस पहा !
- आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे?
- आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
- आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
- तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
- डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रोसेस !
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
- जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर
- रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

