सरकारी योजनाकृषी योजना

सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप” वर – MahaDBT Farmer App

ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाईल कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी शेतक-यांद्वारे प्रयत्न होत आहे. कृषि विभागामार्फत शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, शेतक-यांनी शेतकरी योजना संबंधित माहिती मिळविण्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा.

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांनी महाडबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळविणे हे एक व्यासपीठ आहे. छाननीची अंतर्गत प्रक्रिया म्हणून, शेतकर्‍यांना सोडतीची निवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करणे आणि मंजूर पूर्व पत्रा नंतर पावत्या अपलोड करणे आवश्यक आहे. या सुविधा पोर्टलवर शेतकर्‍यांना उपलब्ध आहेत परंतु ही प्रक्रिया जलद व सुलभ करण्यासाठी कृषी विभाग, महाराष्ट्र यांनी हे अ‍ॅप सादर केले असून ते देण्यास उपयुक्त ठरेल.

महाडीबीटी शेतकरी अ‍ॅपची (MahaDBT Farmer App) वैशिष्ट्ये:

  • लॉटरी निवडल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे.
  • मंजुरीपूर्व पत्रा नंतर पावत्याची कागदपत्रे अपलोड करणे.
  • विविध टप्प्यावर अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी.

मोबाईल अ‍ॅपचे नाव : MahaDBT Farmer

महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.mahadbtagri

वरील लिंक वरून मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा किंवा मोबाईल प्लेस्टोर मध्ये “MahaDBT Farmer” असे सर्च करून इन्स्टॉल करा.

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप लॉगिन:

MahaDBT Farmer अ‍ॅप मध्ये लॉगिन करण्यासाठी लॉगिन आयडी/पासवर्ड किंवा आधार कार्ड नंबरने लॉगिन करा.

सर्व शेतकरी योजना आता "महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप" वर - MahaDBT Farmer App
MahaDBT Farmer अ‍ॅप लॉगिन

कागदपत्रे/बिल अपलोड करा:

MahaDBT Farmer अ‍ॅप मध्ये लॉगिन झाल्यानंतर पहिल्या पर्यायामध्ये आपण योजनांची लॉटरी निवडल्यानंतर आणि मंजुरीपूर्व पत्रा नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतो.

सर्व शेतकरी योजना आता "महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप" वर - MahaDBT Farmer App
MahaDBT Farmer – कागदपत्रे-बिल अपलोड करा

मी अर्ज केलेल्या बाबी:

MahaDBT Farmer अ‍ॅपच्या दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्या प्रलंबित अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतो. या मध्ये खालील प्रकारचे अर्ज पाहायला मिळतील.

  • मंजूर अर्ज
  • देयक प्रलंबित
  • नाकारलेले अर्ज
  • छाननी अंतर्गत अर्ज
सर्व शेतकरी योजना आता "महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप" वर - MahaDBT Farmer App
MahaDBT Farmer – अर्ज केलेल्या बाबी

योजनांची लॉटरी निवडल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी किंवा अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी CSC सेंटर/लॅपटॉप/कॉम्प्युटर ची गरज पडत होती. आता आपल्या मोबाईल मधील अ‍ॅप मधून ही सुविधा वापरता येऊ शकते.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप” वर – MahaDBT Farmer App

  • Parmeshar dhone

    वयक्तिक हे app उघडत नाही तरी invalid दाखवतय याच्या साठी कूठला csc सारखाid लागतो का

    Reply
    • लॉगिन आयडी/पासवर्ड mahadbt पोर्टलवरून बनवा किंवा आधार कार्ड नंबरने लॉगिन करा

      Reply
  • Gauro parasgaye

    Login nahi ho rahi hai
    Bahut trai kiya
    Kaise kare please solution

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.