शेतीसाठी मिळवा सहज कृषी कर्ज : किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांना पूरक ठरणाऱ्या अनेक योजनांपैकी “किसान क्रेडिट कार्ड” – Kisan Credit Card (KCC Crop Loan) ही एक अत्यंत उपयुक्त योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ कर्जपुरवठा करण्यासाठी खास राबवण्यात येते. शेतमाल उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या खर्चासह अन्य कृषी संबंधित गरजांनाही या योजनेंतर्गत निधी उपलब्ध होतो.
या लेखात आपण KCC बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत – त्याचे फायदे, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
शेतीसाठी कृषी कर्ज किसान क्रेडिट कार्ड योजना – KCC Crop Loan:
किसान क्रेडिट (Kisan Credit Card Crop Loan) कार्ड योजना (KCC) ही भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नाबार्ड (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) व मॅनेज यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना अल्पकालीन व सुलभ कर्ज (KCC Crop Loan) उपलब्ध करून देणे जेणेकरून शेतीसाठी लागणारा खर्च वेळेवर पूर्ण करता येईल.
KCC च्या मुख्य वैशिष्ठ:
उत्पादन खर्चासाठी कर्ज: पिकाच्या लागवडीसाठी व खत, बियाणे, कीटकनाशके यांसाठी लागणारा खर्च.
पीक कापणीनंतरचा खर्च: साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विक्रीसाठी लागणारा खर्च.
शेतीशी संबंधित वैयक्तिक गरजा: शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासाठी मर्यादित रक्कम.
शेतीच्या मालमत्तेची देखभाल व पूरक उद्योगांसाठी निधी.
KCC साठी पात्रता:
ज्या व्यक्तींच्या नावे स्वतःची शेती जमीन आहे.
सहकारी शेती करणारे शेतकरी.
शेती भाड्याने घेतलेली असली तरी काही अटींनुसार पात्र ठरू शकतात.
नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था/समूह.
कर्ज मर्यादा व परतफेड कालावधी
कर्ज मर्यादा: पीक पद्धती, शेती क्षेत्रफळ, स्थानिक खर्चाचा अंदाज (SOF) यानुसार निधी ठरवला जातो.
परतफेड कालावधी: कर्जाची पुनरावलोकन कालावधी ५ वर्षे असून दरवर्षी त्यात बदल होऊ शकतो.
कोलॅटरल फ्री कर्ज: ₹2 लाखांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय उपलब्ध.
वेळेवर परतफेड करणाऱ्यांसाठी व्याज सवलत/अनुदान उपलब्ध.
किसान क्रेडिट कार्डचे फायदे:
बँकेत वारंवार कर्जासाठी धावपळ टळते.
एकाच कार्डने वर्षभर कधीही निधी काढता येतो.
पैसे बँकेत ठेवून व्याज मिळवण्याची सुविधा.
कृषी वस्तू खरेदीसाठी कार्डचा थेट वापर शक्य.
कमी व्याजदर व वेळेवर परतफेडीवर प्रोत्साहन.
किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – KCC Crop Loan:
किसान क्रेडिट कार्डसाठी आता शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यासाठी भारत सरकारचे अधिकृत पोर्टल JanSamarth वापरले जाते. कृषी कर्ज (Kisan Credit Card Crop Loan) – किसान क्रेडिट कार्डसाठी जन समर्थ पोर्टल (JanSamarth Yojana) वरून अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम खालील लिंकवर क्लिक करून पोर्टल ओपन करा.
जन समर्थ पोर्टल ओपन केल्यानंतर वरती डाव्या बाजूला आपली मराठी भाषा निवडा. आपल्याला कृषी कर्ज (KCC Crop Loan) – किसान क्रेडिट कार्डसाठी, आपली पात्रता तपासण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी KCC Crop Loan वर क्लिक करून आपले राज्य व जिल्हा निवडा आणि पुढे जा वर क्लिक करा.

पुढे अर्जदार लॉगिन करण्यासाठी नोंदणी करून लॉगिन करा आणि तुम्ही पात्र असल्यास, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता.

अर्ज भरण्याचे सर्व टप्पे पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सादर करा व त्याचा स्टेटस “My Applications” टॅबमध्ये पाहू शकता.
आवश्यक कागदपत्र:
आधार कार्ड
सातबारा उतारा / जमीन कागदपत्रे
बँक पासबुक
पासपोर्ट साईझ फोटो
मोबाईल नंबर
उत्पन्नाचे प्रमाणपत्र (काही वेळा)
अर्ज सादर केल्यानंतर काय?
अर्ज सादर झाल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो.
बँकेकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
योग्यतेनुसार मंजूरी दिली जाते व कार्ड जारी होते.
ईमेल व मोबाईलद्वारे अपडेट्स मिळतात.
मदत व संपर्क
जर अर्ज करताना अडचण आली तर खालील पद्धतीने संपर्क साधू शकता:
ईमेल: customer.support@jansamarth.in हेल्पलाइन क्रमांक: +91 79690 76111
किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आणि आर्थिक सक्षमीकरणाकडे नेणारी योजना आहे. या योजनेंतर्गत वेळेवर कर्ज (KCC Crop Loan) मिळाल्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता वाढते. आता हे कर्ज (KCC Crop Loan) ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे सहजपणे उपलब्ध आहे, जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोयीचे ठरत आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर आजच JanSamarth पोर्टलवर जाऊन अर्ज करा आणि या सुविधांचा लाभ घ्या.
या लेखात, आम्ही कृषी कर्ज किसान क्रेडिट (Kisan Credit Card Crop Loan) कार्डसाठी ऑनलाईन अर्ज ! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा!
- पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती!
- क्रेडिट-लिंक सरकारी योजनांसाठी जन समर्थ पोर्टलवर असा करा ऑनलाईन अर्ज !
- शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत ₹2 लाख कर्जमाफी, आधार प्रमाणीकरण, लाभार्थी यादी, OTS योजना व संपूर्ण प्रक्रिया!
- शेतकरी कर्जमाफी आधार प्रमाणीकरण: बोटांचे ठसे न जुळल्यास काय? व मयत शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया!
- कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण: कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी तातडीने पूर्ण करा ही महत्त्वाची प्रक्रिया!
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- बँक खाते आधार नंबरला (Bank Aadhaar Seeding) ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
- हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme
- उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांनी उद्योग कर्जासाठी ऑनलाईन करा अर्ज
- पीएम स्वनिधी योजना : फेरीवाल्यांना ५०,००० पर्यंत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
- शेतमाल तारण कर्ज योजना – Shetmal Taran Karj Yojana (MSAMB)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

