बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करावी? संपूर्ण माहिती व योजना फायदे!
भारतात बांधकाम क्षेत्र हे एक मोठं रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी (Bandhkam Kamgar Nondani) ही एक महत्त्वाची प्रक्रिया ठरते. याच प्रक्रियेला आता संपूर्ण ऑनलाईन स्वरूप देण्यात येत आहे, जेणेकरून अधिकाधिक कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
बांधकाम कामगार कायदा व मंडळ
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवा शर्ती विनियमन) कायदा, 1996 अंतर्गत आणि महाराष्ट्र शासनाच्या 2007 मधील निर्णयानुसार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाचा उद्देश म्हणजे कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा, सामाजिक कल्याण आणि शैक्षणिक गरजांकरिता योजनांची अंमलबजावणी करणे.
ऑनलाईन नोंदणीची गरज
पूर्वी कामगार नोंदणीसाठी ऑफलाइन अर्ज भरावा लागत असे. त्यात वेळ, पैसा आणि कागदपत्रांची झंझट होती. आता सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटलीकरणाच्या दिशेने नेली आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी “Bandhkam Kamgar Nondani” ऑनलाईन पद्धतीने झाल्यास अधिक पारदर्शकता, गती आणि सुलभता प्राप्त होईल.
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करावी? (Bandhkam Kamgar Nondani)
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी (Bandhkam Kamgar Nondani) करण्यासाठी प्रथम खालील लिंक ओपन करा.
https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/registration

नोंदणी करताना पुढील स्टेप्स फॉलो करा:
वेबसाइट ओपन करा.
जवळचे Workers Facilitation Centre (WFC) निवडा.
आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका.
“Proceed to Form” वर क्लिक करा.
अर्जात वैयक्तिक माहिती, पत्ता, कौटुंबिक तपशील, बँक डिटेल्स, योजनेची माहिती, 90 दिवसांचे काम प्रमाणपत्र भरावे.
कागदपत्रे अपलोड करा.
फॉर्म सेव्ह केल्यावर मिळालेला अर्ज क्रमांक जवळच्या सुविधा केंद्रात द्या.
ऑफलाईन पर्याय
ज्यांना ऑनलाईन नोंदणी शक्य नाही, त्यांनी डाऊनलोड लिंक वरून फॉर्म भरून जवळच्या सुविधा केंद्रात अर्ज सादर करावा.
नोंदणीसाठी आवश्यक पात्रता
वय: 18 ते 60 वर्ष
कमीत कमी 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे (मागील १२ महिन्यांत)
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
90 दिवस काम केल्याचा पुरावा
रहिवासी व ओळखपत्राचा पुरावा
पासपोर्ट साईज फोटो (3 नग)
नोंदणी फी – ₹25 + ₹60 (5 वर्षासाठी)
मान्यताप्राप्त बांधकाम प्रकार
रस्ते, पूल, रेल्वे, ड्रेनेज, जलसंपदा
वायरिंग, प्लंबिंग, टाइल्स, सुतारकाम
मॉड्युलर किचन, POP, काच बसवणे
जलतरण तलाव, उद्याने, क्रीडा सुविधा
कल्याणकारी योजना (Bandhkam Kamgar Kalyankari Yojana)
1. सामाजिक सुरक्षा योजना
विवाह अनुदान – ₹30,000
श्रमिक मानधन योजना
जीवन व अपघात विमा
आवश्यक अवजारांसाठी ₹5,000
सुरक्षा कीट
2. शैक्षणिक योजना
इयत्ता 1-7: ₹2,500
इयत्ता 8-10: ₹5,000
पदवी: ₹20,000
अभियांत्रिकी: ₹60,000
वैद्यकीय पदवी: ₹1,00,000
MSCIT कोर्सचा खर्चही दिला जातो
3. आरोग्य योजना
प्रसूती अनुदान: ₹15,000 ते ₹20,000
गंभीर आजारासाठी: ₹1,00,000
अपंगत्व: ₹2,00,000
आरोग्य तपासणी, आरोग्य विमा
4. आर्थिक सहाय्य
अपघाती मृत्यू: ₹5,00,000
नैसर्गिक मृत्यू: ₹2,00,000
गृहबांधणीसाठी: ₹2,00,000
गृहकर्ज व्याज सवलत: ₹6,00,000
नोंदणी नूतनीकरण (Renewal)
नोंदणीची वैधता ५ वर्षांपर्यंत असते. तिचं नूतनीकरण करण्यासाठी ही लिंक वापरा. यासाठी मूळ कागदपत्रांसह जवळच्या सुविधा केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे फायदे
योजनांचा थेट लाभ बँक खात्यात जमा
राज्यसरकारकडून मान्यता प्राप्त दर्जा
कामगारांचा सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण
भविष्याची आर्थिक सुरक्षितता
बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने उचललेलं हे ऑनलाईन नोंदणीचं पाऊल एक दृष्टिकोन बदलणारी प्रक्रिया ठरत आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी “Bandhkam Kamgar Nondani” ही संकल्पना केवळ सरकारी प्रक्रिया न राहता कामगारांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांनी वेळेत नोंदणी करून योजना लाभ घ्याव्यात.
सूचना: नोंदणी किंवा नूतनीकरण करताना अडचण आल्यास जवळच्या तालुका सुविधा केंद्रात संपर्क करा किंवा mahabocw.in या वेबसाइटवर अधिकृत मार्गदर्शन घ्या.
या लेखात, आम्ही बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी (Bandhkam Kamgar Nondani) कशी करायची? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा (Bandhkam Kamgar Nondani) नोंदणी अपडेट!
- बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देऊन नोंदणी करणेबाबत शासन नियम
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
- नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना
- बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Me mazya aai baba che naav register kelo prnru renew kryche hote pn online khup adchani yet ahe kamgar office mdhe namaste koni bolt pn nhi nit serve udhya ye Parwa ye mantat
Please tumhi help kra mala me vinti krto mala shishnsati paise ch grj ahe
Please vel bhetls ekda call me kra
9130860705
Please help kraaa ani Kharche koni help nhi krt office mdhe direct paise magat ahe te purn 10hajar rupay🙏
बांधकाम ठेकेदार रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय प्रोसेस आहे त्या बाबत माहिती मिळावी.
आमच्या जळगांव जिल्हयात ग्रामसेवक 90दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही सिक्का देत नाही आम्ही कोणत्या अधिकारी कडे तक्रार करावी कृपया आपण मला योग्य तो सल्ला द्यावा ही नम्र विनंती
सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव
राजेंद्र भवन,विवेकानंद नगर,जिल्हापेठ, जळगाव-425001
0257-2239716
नवीन डब्ल्यूएफसी:
सहाय्यक कामगार आयुक्त, कार्यालय जळगाव डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट, पहिला मजला कक्ष क्रमांक 5 ते 7 जळगाव 425001
Kupan sathi paise magat aahe kupan watap krit nahit black ne kupan det aahe . solapur haidrabad rod solapur
10
मी केशव भगवान होलगे, मी कामगार नोंदणी केली आहे परंतु त्या अर्जावर ठेकेदाराचा शिक्का मारलेला नसल्याने तो अर्ज पेंडींगमध्ये पडलेला आहे
माला माझी बंध कामगार नोदनी नाही सी करायची आहे उपाय सांगा